चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्हारी सुलू एका वेळी नाही पाहिला. विशेष म्हणजे तुकड्या तुकड्यात पाहतानाही क्रोनॉलॉजिकल ऑर्डर मधे नाही पाहिला. मधले तुकडे सुरूवातीला. शेवटाकडून काही काळ आधीचे दुस-या वेळेला. मग इंटर्व्हलच्या आधीचे मग सुरूवात आणि शेवट मात्र शेवटीच पाहिला. तरीही मला समजला तो मूव्ही आणि आवडला पण.

काल प्राईम वर " पप्पू कांट डान्स साला " पहिला.
विनय पाठक ऑल टाइम फेव्हरेट आहे. इकडेही तो खूप आवडला.
नेहा धुपीया पण सहनीय वाटली.
स्टोरी प्रेडिक्टेबल असली तरी कुठेही बोर वाटली नाही.
एकूणच मुव्ही आवडला.
टीप : ह्या चित्रपटाबद्दलची किंवा कलाकारबद्दलची मतं ही माझी वयक्तिक मतं आहेत.
ती इतरांनी पटावीत असं माझं मुळीच म्हणणं नाही.
किंवा तसा हट्टही नाही.
ज्यांना वाद घालायची खूप हौस किंवा वेळ असेल ते घालू शकतात.

तुम्हारी सुलू मला खूप आवडतो.खूप प्रांजळ पिक्चर आहे.मुख्य म्हणजे अश्या सक्सेस स्टोरी प्रत्यक्षात पाहिल्या आहेत त्यामुळे जास्त.त्यातला जेपी पापड वाला पण धमाल आहे.
त्यातला तो मराठी काकांचा (आयुष्मान बरोबर सगळे शेवटी दिल है के मानता नही म्हणतात तो आणि आधीचा) सीन हमखास 'डोळे पाणी काढू' आहे मुन्नाभाई मधल्या पेस्तन आबांच्या कॅरम सारखा.

Drishyam-2
पहिला भाग इव्हेन्टफुल होता, दुसरा जास्त माइंडगेम आहे. एकदम धीम्या गतीचा आहे. पण जॉर्जकुट्टीची शांत डोक्याने विचार करण्याची प्रवृत्ती पाहता तसं जाणीवपूर्वक केलं असावं.
बघताना सतत प्रश्न पडतो - अरे, दुसरा भाग कशासाठी काढलाय?? नेमकं काय दाखवायचंय??
पण तसंच अभिप्रेत आहे.
काहीच घडत नाहीये, पण कुठल्याही क्षणी काहीही घडू शकतं, या विवंचनेत, या भीतीने जॉर्जकुट्टी आणि त्याचं कुटुंब राहत असतं. ती धाकधूक प्रेक्षक पण अनुभवतात.
स्टोरीत ३ ट्विस्ट्स आहेत. तीन्ही मजा आणतात.

मोहनलाल घरच्यांची काळजी वाहणारा, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असणारा, कायम शांत डोक्याने विचार आणि प्लॅनिंग करणारा मध्यमवयीन संसारी पुरूष वाटतो. (त्या तुलनेत पहिल्या भागाच्या हिंदी आवृत्तीत अजय देवगणचं कास्टिंगच गंडलेलं आहे.)

पहिला भाग पाहिला असेल तर दुसरा नक्की बघा.

मला बघायचाय दृश्यम २. सबटायटल्स आहेत का ?
मामुट्टी आणि मोहनलाल मधे मी कन्फ्युज होते नेहमी.

दृश्यम २ चा शेवट काय आहे नक्की मला झेपलाच नाही.
Spoiler alert- फक्त एक पुस्तक प्रकाशित करून तो कसा काय सुटतो? आणि शेवटी ती सगळी स्टोरी पोलिसांना सांगूही देतो त्या मूव्ही रायटरला? शेवटी शेवटी अडीच तास ते सबटायटल्स वाचून डोकं भंजाळलं होतं म्हणून कळलं नाही कदाचित. कोणी explain करेल का?

पिक्चर ची लांबी खुपच आहे. थोडी कमी करता आली असती फर्स्ट हाफ मधे.

मलाही आवडला दृशय्म २, जरी पहिल्या दृश्यम इतकी तगडी स्क्रिप्ट नसली आणि बर्याच अ. आणि आ. घटना असल्या तरी.
सगळ्यांचे परफॉर्मन्सेस , केरळच्या ग्रीनरीची सिनेमेटोग्राफी सुंदर आहे !
यातली पोलिस ऑफिसर तब्बु पेक्षा खूप भारी आणि रिअल वाटली , तब्बु अगदी खुपली होती डोळ्यात !
अर्थात मोहनलाल बापमाणुस आहे, जबरदस्तं !
लेंथ मधे सिनेमा थोडा लहान चालला असता , तरी नक्की १ टाइम वॉचेबल !

तिकडे फेसबूकवर जनता दृश्यम २ चे कौतुक करताना थकत नाहीये. अर्थात पहिला हाल्फ संथ आणि मग कथानक तुफान वेग पकडते हा सर्वात समान धागा. तसेच मोहनलाल यांचा अभिनय चुम्मा आहे हे देखील प्रत्येकाचे सामाईक मत..
मला पर्सनली हे सर्व वाचून चित्रपट बघायची उत्सुकता निर्माण झाली तरी जराही न समजणारया परकीय भाषेतील चित्रपट समजायला अंमळ उशीर लागणारया परकीय भाषेतील सबटायटल्ससह कसा बघावा हा प्रश्न पडलाय.
त्यामुळे आता हिंदीत डब झाला तर ठिक अन्यथा अजय देवगण तब्बू वर्जनचीच वाट बघावी लागणार..

युट्युब वर मुवि explained in hindi असते
ते बघितले

इतका काय आवडला नाही

मढे उकरून कुत्रे ठेवा
मग ते मढे उकरल्यावर दुसरे हाडुक ठेवा

कायच्या काय आहे

फॉरेन्सिक लॅब च्या रक्षकाला दारू पाजून आत जा म्हणे
कायच्या काय
फॉरेन्सिक लॅब मोठ्या राजधानीत असतात , गावात नसतात, आणि असे अंधारे वगैरे तर अजिबात नसतात

explained in hindi

व्हिडीओ बनवणार्याना शांततेचे नोबेल दिले पाहिजे

दुसऱ्या दिवशी लगेच सगळी सगळी स्तोरी सांगून टाकतात

वेळ अन पैसा वाचवतात व शांती प्रदान करतात

https://youtu.be/UQUllf0PALc

मलेना ही एक इटालियन फिल्म आहे. २००० सालची.
१३ वर्षाच्या मुलावर मलेना नावाच्या अत्यंत सुंदर महिलेचा काय प्रभाव असतो. त्याच्या भावना नेमक्या काय असतात ? ते प्रेम असतं का ?
मलेना ही एकटी राहते. तिचा नवरा आर्मीत आहे.
एकमेकात गुंतणारे असे कथेचे अनेक धागे आहेत. पण एकट्या महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोण कसा असतो हे सर्वात प्रभावी आहे.
तिचा नवरा आर्मीत आहे म्हणून रिस्पेक्ट पण ती सुंदर आहे म्हणून वळणा-या नजरा. ती अप्राप्य असल्याबद्दलचं वैषम्य.
नवरा मारला गेला हे समजल्यानंतर दया दाखवणा-या आशाळभूत नजरा.
आणि नंतर तिच्याबद्दल उठलेल्या अफवांमुळे बदललेल्या नजरा. बदललेली वागणूक
शेवट खूप वेगळा आहे.
इतकेच पुरे. मी कुणाकडून तरी मिळवून पाहिला त्यामुळे तुम्ही शोधून पहा.

नेलपॉलिश आवडला. >>>>>>>>>>> कुठे बघितला.

दृश्यम २ आहे छान पण सबटायटल्स वाचता वाचता दमछाक होते.

Nail polish >> zee5.
काही काही गोष्टी अंगावर आल्या, पण वेगळा विषय आहे
कोर्टातले सीन्स, युक्तिवाद मस्तच. एकदम संयत.उगाच भाषणबाजी नाही.
सगळ्यांंची कामे आवडली.

Nail polish.. झी ५
spoiler...

पाहिला . मस्त एक्दम..!
शेवटचा सीन पाहिल्यावर..मला वाटतयं की तो चारु बनण्याचं नाटकच करतोय..
पण एक प्र्श्न..
जर तो नाटक करतोय तर.. स्वतः वर खुनाचा आरोप का घेईल?
म्हणजे चारुला वीरने च मारलंय हे का कबूल केलं?

बाकी ..त्याचा अभिनय छानच आहे..!

म्हणजे चारुला वीरने च मारलंय हे का कबूल केलं >>>> कारण वीर आता परत येणार नाही. , त्याला अटक होण्याची शक्यता नाही.

Girl on the train बघितला.. अजिबात नाही आवडला.. परिणीती चा रोल, डायलॅाग सगळंच पकाऊ वाटलं.. शेवट तर अगदीच बकवास.. सुरूवात ते शेवट, काहीच पटण्यासारखं नव्हतं .. दोन तास वाया गेले त्याचं दु:ख

त्रिभंग आवडला.पटला.जिथे आईबाप योग्य नात्यात, रुटीन मध्ये नाहीत तिथे मुलं एकदम दुसरं टोक शोधतात, आपल्या उणिवा पूर्ण करणारी माणसं शोधतात हे पटलं.
सर्वांचे अभिनय मस्त.त्यातल्या त्यात मिथिला पालकर आणि तो आत्मचरित्र लेखक(कुणाल कपूर ना) यांची पात्रं आवडली.वैभव तत्ववादी ला फारसा वाव नाही.तन्वी आझमी सगळीकडे व्यवस्थित अभिनय करते, इथेही.काजोल कधीकधी अंजली च्या पात्रातून बाहेर आली नाही असं वाटतं.पण छान दिसते.

मलाही आवडला नेलपॉलिश.
चारू आणि चारूच्या प्रसंगातील लोकेशन या दोन्हींचे सौंदर्य फार मस्त वाटले.
कोर्टाचा निर्णय देखील ऊत्त्तम. जर तो नाटक करत असला तरी आता त्याला आयुष्यभर त्याच भुमिकेत अडकावे लागणार. ते सुद्धा ईतरांच्या नजरेखाली ट्रीटमेंट घेत. मृत्यु बरा वाटेल एखाद्याला यापेक्षा..

Girl on the train बघितला.. अजिबात नाही आवडला.. परिणीती चा रोल, डायलॅाग सगळंच पकाऊ वाटलं.. शेवट तर अगदीच बकवास.. सुरूवात ते शेवट, काहीच पटण्यासारखं नव्हतं .. दोन तास वाया गेले त्याचं दु:ख >>>> अगदी अगदी !
कुठे ते पुस्तक आणि कुठे हा सिनेमा. त्याचं भारतीयीकरण करण्याच्या नादात काहीच्या काही केलय !

Girl on the train बघितला.. अजिबात नाही आवडला.. same here...itka kajal laun kon firta? mrut vyakti cha phone heroine aslyane pariniti lach sapadto. police zoplelech asatat.. too many goof ups

Pages