Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
खतरनाक सीन, इथे म्हाळसाने लिहिलंय पण भारी. ते वाचून सीन बघायला घेतला, पूर्ण लक्ष माझं त्या ओढणीकडे होतं. काही म्हणा चुनरी छा गयी.
अरे हा अल्लू अर्जुन.. मी
अरे हा अल्लू अर्जुन.. मी पहिल्यांदा याचे काहीतरी पाहिले. आमच्या शाळेतल्या पोरी व्हॉटसप स्टेटसला याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. असे काही करत असेल तर हक है भाई
अल्लू अर्जुन असतो साउथ डबड
अल्लू अर्जुन असतो साउथ डबड मध्ये, आमच्याकडे लावले जातात ना ते मुवीज. ओळखीचा चेहेरा पण नाव आज समजलं, तो शॉट बघताना खाली वाचलं.
क्लिप पाहिली नाही पण तीच असेल
क्लिप पाहिली नाही पण तीच असेल ती अला वैकुंठपुरमलू मधली. त्यातला एक गुंड हा (अल्लू अर्जुन) नंतर जेथे नोकरी करतो तेथील एच आर हेड निघतो. एरव्ही तो फावल्या वेळात मुलींची छेड काढणे, चुनरी पळवणे वगैरे करत असतो.
काल चांडाळ पाहिला. मिठुनचे न
काल चांडाळ पाहिला. मिठुनचे न पाहिलेले चित्रपट पाहिल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. आदमी आणि चांडाळ नंतर आता जल्लाद राहिला आहे. मिठुनच्या पायाचा स्पर्श जरी झाला तरी व्हिलन हवेत उड्डाण करत असतात आणि मिठुन त्यांना पाय हवेत फिरवून दिशा देत असतो. साऊथने एव्हढी प्रगती अजूनही केलेली नाही. हे पाहून गदगदून आले.
आपणच आपल्यांना नेहमी कमी समजतो.
सीमा ला अनुमोदन...अजिबात
सीमा ला अनुमोदन...अजिबात आवडला नाही सिनेमा..काहीच्या काही ओढून ताणून दाखवलं आहे..
न समजणारी भाषा + सबटायटल्स +
न समजणारी भाषा + सबटायटल्स + चांगला चित्रपट हा सध्या प्रेफरन्स आहे >>> +1
दृश्यम 2 बघायचाच होता, अजय देवगणचा येईपर्यंत थांबण्यापेक्षा. तो पहिला पाहिला मी दुसऱ्या भाषेतला असा. आता वेड च लागलंय सिनेमा वाचत पाहायचा. कन्नड, मल्याळम, तेलगू भाषेतले.
म्हाळसा, सीन विश्लेषण ह ह पु वा केलय सीनपेक्षा. माझं ही लक्ष ओढणीकडे च.
असूरन मधला रक्तपात भीषण होता.
असूरन मधला रक्तपात भीषण होता.
मिठुनच्या पायाचा स्पर्श जरी
मिठुनच्या पायाचा स्पर्श जरी झाला तरी व्हिलन हवेत उड्डाण करत असतात आणि मिठुन त्यांना पाय हवेत फिरवून दिशा देत असतो. >>>
एकदम करेक्ट! पण आजकालच्या पोट्ट्यांना नाही ना माहीत!
अलीकडेच एक पिक्चर आला होता, 'दिल दिया है'. त्यात इंटरवलपर्यंत मिथूनदा एकदम शांत, गिटार वर गाणी वगैरे वाजवत बसले होते. फायटींगचं सगळं काम इम्रान हाश्मीकडे, येडयाला वाटलं तोच हिरो हे. मग कायतरी मोठा लोचा झाला अन इम्रान हाश्मी निघाला एका भयंकर डॉनकडे मिथूनदांना सोबत घेउन. गेटवरच कमांडोंनी आडवलं ना. मग हाश्मी उतरून हाणामारी करायच्या तयारीत लागला उतरायला, मिथूनदा शेजारी बसले असताना. मग मिथूनदा तेला म्हणले, तुला उतरायची कायबी गरज नाही, आणी निस्ती गाडीची काच खाली केली. मंग काय, गाडीत साक्षात मिथूनदा बसलेले बघून गेटवरचे कमांडो गप बाजूला झाले, त्यांनी मिथूनदांचे पिच्चर बघीतले होते ना....
, गाडीत साक्षात मिथूनदा
, गाडीत साक्षात मिथूनदा बसलेले >>>
इथे वाचुन आम्ही रुही बघितला.
इथे वाचुन आम्ही रुही बघितला. आम्हाला तर आवडला . २ घटका करमणूक
असूरन बघावा वाटत होत पण भीषण रक्तपात वै असेल तर नाहीच जाणार त्या वाटेला
रूही प्राईमवर आहे का?
रूही प्राईमवर आहे का?
रूही मस्त आहे ... फुल्ल टीपी.
रूही मस्त आहे ... फुल्ल टीपी...
असुरन मधे रक्तपात आहे. पण
असुरन मधे रक्तपात आहे. पण शोले मधे पण होता. अनेक मसाला चित्रपटात असतो. असुरन मधे वास्तवदर्शी चित्रण आहे. काल्पनिक नाही. या घटना नेहमी कुठे ना कुठे घडत राहतात.
मंदार
मंदार
pariyerum perumal movie
काल नीना गुप्ताला पाहुन सरदार
काल नीना गुप्ताला पाहुन सरदार का ग्रँडसन हा अशक्य पीळ सिनेमा पाहिला. कैच्याकै अचाट कथा, प्रचंड जाड झालेला आणि ते ही चालवुन घेतलं असतं एक वेळ, पण अभिनयशुन्य अर्जुन कपुर, एकही लक्षात रहाण्यासारखं गाणं नाही, की सुंदर लोकेशन नाही, काहीच नावाजण्यासारखं नसलेला टूकारेस्ट मूव्ही. नेटफ्लिक्सवर आहे. अजिबात पाहुच नका.
त्याउलट आज नेटफ्लिक्सवरच एक अतिशय सुंदर हिंदी सिनेमा 'अहान' पाहिला. मला अतिशय आवडला. टोकाची OCD असलेला अरिफ झाकरिया ( Mr उझी) आणि त्याच्या शेजारी रहाणारा डाऊन सिंड्रोम असणारा तरुण मुलगा आबुल मामाजी (अहान) यांच्या वेगळ्याच मैत्रीची किंवा निनावी नात्याची छानशी कथा आहे.
ओळखीचे चेहरे आहेत, पण रूढ अर्थाने जे नावाजलेले बॉलिवुड कलाकार म्हणता येतील असे कोणी नाहीत. पण अभिनय 10 पैकी 10. उत्तम कथा. आणि फार न ताणता फील गुड असणारी साधीशी. अबुल मामजीने अतिशय छान अभिनय केला आहे. सिनेमा पहाताना पाहिल्या काही मिनिटातच तो आपल्याला एवढा आवडुन जातो. मधेच काही वेळेस त्याचे उच्चार किंवा अर्धवट वाक्य बोलल्याने थोडेसे कळत नाहीत, त्यामुळे सबटायटल्स सकट पाहिला तर ठीक राहील. पण मला त्याची बोलण्याची पद्धत एवढी गोड आणि निरागस वाटली.
चुकवु नये असा सिनेमा.
मीरा +१ दोन्ही चित्रपटांसाठी.
मीरा +१ दोन्ही चित्रपटांसाठी.
सरदार का ग्रँडसन बघुच शकलो नाही. प्रचारकी बथ्थड आहे. नीना गुप्ता आहे म्हणून अर्धातास सहन केला. बायको अर्जुन कपूरचा आहे याहुन चांगलं एक्स्पेक्ट करुच शकत नाही हे वारंवार सांगत असतानाही नेटाने बघितला आणि बंद केला.
अहान चांगला आहे. पण शेवट जरा लवकर आणायला हवा होता. त्यात चॅलेंज्ड मुलांचा जो टिपिकल स्टिरिओटाईप दाखवतात त्याला छेद दिला आहे ते खूप आवडलं. 'ए-टिपिकल' म्हणून एक नेटफ्लिक्सवर शो आहे त्याची आठवण झाली. (त्याच्याशी संबध नाही/ तसा जॉन्राही नाही)
अहान मुलांसोबत बघता येईल काय
अहान मुलांसोबत बघता येईल काय ?
सरदार का ग्रँडसन >>> या सिनेमाकडून थोड्या अपेक्षा होत्या.
अहान मुलांसोबत बघता येईल काय
अहान मुलांसोबत बघता येईल काय ? >> हो.
ओसीडी मुळे शेजार्याच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्याला डाउन सिन्ड्रोम असलेला अहान उंटाच्या ओझ्यातली शेवटची काडी प्रकारे कारण बनतो. आणि तोच माणसातील सहृदता दाखवत निरागस संबंध जोडायला कारण ही बनतो. नात्यातील प्रवास आणि जीवनात काही गोष्टींना मुरड घालुन ते सुसह्य करायचा प्रयत्न... असं काही आहे. फील गुड आहे.
थँक्स अमित !
थँक्स अमित !
आवडेल असं वाटतयं.
चॅलेंज्ड मुलांचा जो टिपिकल
चॅलेंज्ड मुलांचा जो टिपिकल स्टिरिओटाईप दाखवतात त्याला छेद दिला आहे ते खूप आवडलं. >>> अगदीच. आणि म्हणुन आवडला.
अस्मिता, लहान मुलं आजुबाजुला असताना पहायला अगदीच हरकत नाही. Objectionable किंवा embarrass होईल असा एकही शॉट नाही, पण मुलांना घेऊन बसलात तर त्यांना मात्र आवडण्यासारखा नाही.
सरदार का ग्रँडसन कडुन का बरं अपेक्षा होत्या? फार मोठा अपेक्षाभंग होईल बरं
सरदार का ग्रँडसन कडुन का बरं
सरदार का ग्रँडसन कडुन का बरं अपेक्षा होत्या?
नीना गुप्ता मुळे किंवा टिपी लालसेने
जिन्दगी ना मिलेगी दोबारा
जिन्दगी ना मिलेगी दोबारा नावाचा नितान्त सुन्दर चित्रपट आठवतोय? तर त्यात लास्ट सिनला जेव्हा तिघ फरहानने सेट केलेल्या चॅलेन्जसाठी
त्या बैलाच्या पुढे पळत असतात तर त्यातला सुटुन आलेला एक बैल म्हणजे अर्जुन कपुर.
अर्जुन कपुर आधी बरा होता की.
अर्जुन कपुर आधी बरा होता की.
मला टू स्टेट्स मध्ये त्याचं काम आणि ' की &का' मध्ये त्याचा लुक आवडला होता. पण या सिनेमामध्ये नुसताच वाईट अभिनय नाही तर वाईट दिसला पण आहे.
म्हाळसा आणि मंदार - तुम्ही
म्हाळसा आणि मंदार - तुम्ही दोघं धन्य आहात असले मूव्हीज तुम्हाला सापडतात, तुम्ही ते बघता ह्यातच तुमची महानता आहे (तुम्हारी महानता इसलिये हैं कि तुम्हे खुद पता नही कि तुम इतने महान हो )
मंदार, महानता बघितला का?
मंदार, महानता बघितला का?
मंदार, ती लिंक लै भारी.
मंदार, ती लिंक लै भारी. धन्यवाद अजून एक चित्रपट बघणार मिशन मोड मधे.
म्हाळसा म हा न सीन आहे.
म्हाळसा म हा न सीन आहे.
Submitted by फेरफटका on 19
Submitted by फेरफटका on 19 May, 2021 - 12:29>> अला वैकुंठपुरम सारखे मुव्हिज म्हणजे एंटरटेनमेंट,रोमॅन्स,इमोशन्स,ॲक्शन,कॅामेडी ह्यांचं पॅकेज..अर्थात कॅामनसेन्स कमी असतो पण इमोशन्स भरभरून असतात..मला आवडतात असले चित्रपट.. अल्लू अर्जुन आवडत नाही पण ह्यात त्याचं कॅरेक्टर एकदम जबरदस्त आहे.. हिंदीत आला तर शाहिद कपूरने तो रोल घ्यावी हिच इच्छा.
Pages