Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27
आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर
पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहान कुठे आहे.
अहान कुठे आहे.
वैकुंठपुरम >>> नवऱ्याला आवडेल, साउथचे पिक्चर तोच बघत असतो. पण नेफ्ली नाहीये आमच्याकडे.
मिठुनच्या पायाचा स्पर्श जरी
मिठुनच्या पायाचा स्पर्श जरी झाला तरी व्हिलन हवेत उड्डाण करत असतात आणि मिठुन त्यांना पाय हवेत फिरवून दिशा देत असतो. >>>
मग मिथूनदा तेला म्हणले, तुला उतरायची कायबी गरज नाही, आणी निस्ती गाडीची काच खाली केली. मंग काय, गाडीत साक्षात मिथूनदा बसलेले बघून गेटवरचे कमांडो गप बाजूला झाले, त्यांनी मिथूनदांचे पिच्चर बघीतले होते ना.... >>> हे सगळे "दिल दिया है" नावाच्या चित्रपटात आहे हे आणखी विशेष. वरती पा.आ. यांच्या वर्णनात नावे तरी चांडाळ वगैरे आहेत. म्हणजे काय दिसणार आहे याचा अंदाज येतो.
पण "दिल दिया है" मधे हे? उद्या डीडीएलजे मधे अमरीश पुरी हात सोडत नसताना प्लॅटफॉर्मच्या दुसर्या बाजूने मिथुन येतो व त्याला बघून अमरीश पुरी काजोलला सोडून देतो असे दाखवाल.
Btw मिथुन चर्चा भारी
Btw मिथुन चर्चा भारी
मला मिथुन रंजिता जोडी फार आवडायची. त्या दोघांचा आणि राखी पण आहे असा धुंद (का धुआ) नावाचा चित्रपट कोणी पाहीला आहेका, कसा आहे. मला बघायचा आहे.
Netflix वर SEVEN नावाचा तमिळ
Netflix वर SEVEN नावाचा तमिळ चित्रपट पाहिला..
(BTW हॉलीवूडचा पण सेम नावचा चित्रपट आहे..तो पण चांगला आहे पाहिला नसेल तर पाहा.. आय थिंक अपरिचित हा चित्रपट ह्या वरूनच Inspired होऊन बनवला असेल)
मला हा चित्रपट फार आवडला.. कसले खतरनाक ट्विस्ट आहेत.. English SUBTITLES सोबत बघू शकता्.. सस्पेन्स चांगला राखलाय.. शेवटच्या अर्धा तासापर्यत अंदाज बांधताच येत नाही.. सस्पेन्स असला तरी चित्रपट डार्क शॅडोत न ठेवता ब्राईट आणि कलरफूल आहे हे वेगळपण आवडल़..
आणि खरं सांगायचं झालं तर मला हिरोचे कपडे आणि कलर कॉम्बिनेशन फार आवडलं..
त्या दोघांचा आणि राखी पण आहे
त्या दोघांचा आणि राखी पण आहे असा धुंद (का धुआ) नावाचा चित्रपट कोणी पाहीला आहेका, कसा आहे. मला बघायचा आहे.
>>> धुआं .... तेव्हा (८०च्या दशकात कधीतरी) तो भारी सस्पेन्स, मिस्ट्री वगैरे वाटला होता. भलताच आवडला होता. गेल्या वर्षी पुन्हा पाहिला तर सो-सो वाटला.
उद्या डीडीएलजे मधे अमरीश पुरी
उद्या डीडीएलजे मधे अमरीश पुरी हात सोडत नसताना प्लॅटफॉर्मच्या दुसर्या बाजूने मिथुन येतो व त्याला बघून अमरीश पुरी काजोलला सोडून देतो असे दाखवाल >>>
वैकुठपुरमुलू - खूप स्लो आहे
वैकुठपुरमुलू - खूप स्लो आहे हिंदीत नाही मिळाला म्हणून ओरिजिनल लँग्वेज मध्ये पाहिला कळायला थोडा कठीण गेला पण इतका स्लो कि बस रे बस .
वैकुठपुरमुलू>>>>>> डायलॉग
अलावैकुंठपुरमुलू>>>>>> डायलॉग ओरीएंटेड मुव्ही असल्याने तेलुगू येत नसेल तर अजिबात च कळत नाही तो सिनेमा.
आम्ही सहपरिवार थिएटरमधे पाहायला गेलो होतो.
मुलाला तेलुगु समजत नाही तो बोअर झाला आणि पूर्ण सिनेमा भर विचारत होता.. 'पण पाहायचा कुणाला होता हा मुव्ही'
'पण पाहायचा कुणाला होता हा
'पण पाहायचा कुणाला होता हा मुव्ही' Lo हा हा हा
मी सबटायटल्स वाचूनच पाहिला.
मी सबटायटल्स वाचूनच पाहिला. संवाद वाचेपर्यंत काहीतरी भारी हुकले आहे इतके होण्याइतका फास्ट नाही त्यामुळे चालले. जनरल मनमोहन देसाई फॉर्म्युला प्लस "बावर्ची" लॉजिक या दोन्हीचे मिक्स आहे. त्या बुट्टा बोम्मा गाण्याचे खूप कौतुक ऐकले होते. चांगले आहे पण इतके काही खास नाही.
तेव्हा (८०च्या दशकात कधीतरी)
तेव्हा (८०च्या दशकात कधीतरी) तो भारी सस्पेन्स, मिस्ट्री वगैरे वाटला होता. >>> हो हो, मी शाळेत होते. मला पोस्टर बघून बघावासा वाटत होता पण फार कमी पिक्चर बघायचे त्यावेळी थिएटरमध्ये जाऊन. टीव्हीवर लागतील ते बघायचे.
धन्यवाद ललिता प्रीती.
कुठे आहे, youtubeवर आहे का.
'पण पाहायचा कुणाला होता हा मुव्ही' >>>
झिम्मा मराठी मूवी कसा आहे?
झिम्मा मराठी मूवी कसा आहे? कोणी पाहिला असेल तर सांगा.
वेलकम टु कराची पाहिला काल..
वेलकम टु कराची पाहिला काल.. झी ५ वर.. अतिशय कॉमेडी आहे.. डोकं बाजूला ठेवून, सह परिवार बघण्यासारखा आहे.!
एकदा नक्की पहा.
मला मिथुन रंजिता जोडी फार
मला मिथुन रंजिता जोडी फार आवडायची.
>>>>>>>>>
रण्जीत आणी रण्जीता एकत्र आहे एका चित्रप टात
उद्या डीडीएलजे मधे अमरीश पुरी
उद्या डीडीएलजे मधे अमरीश पुरी हात सोडत नसताना प्लॅटफॉर्मच्या दुसर्या बाजूने मिथुन येतो व त्याला बघून अमरीश पुरी काजोलला सोडून देतो असे दाखवाल. >>>
ते ही इतक्या सरळपणे नाही, मिथूनदा आहेत ते. अमरीश पुरीने काजोलच्या हाताला धरुन ठेवल्यावर मिथूनदा ट्रेनच्या गार्डच्या डब्याला धरुन ट्रेनच पकडून ठेवतील, आणी प्रवासी बोंबलायला लागल्यामुळे अमरीश पुरीने काजोलला सोडल्यावर मगच ट्रेनला सोडून आत जाउन बसतील.
'पण पाहायचा कुणाला होता हा मुव्ही' >>>
अन्जू, हो, मी यूट्यूबवरच
अन्जू, हो, मी यूट्यूबवरच पाहिला.
धुंवा मी थेटरात जाऊन पाहिलेला
धुंवा मी थेटरात जाऊन पाहिलेला. तेव्हा रिव्ह्यू बिव्यु वाचून जायचे वगैरे काही माहीत नव्हते. मैत्रिणी जमल्या की जो मिळेल तो पिक्चर बघायचा .. मला तेव्हा धुंवा आवडलेला, आता बघितला तर हसायला येईल कदाचित.
त्याच कथेवर एक जुना चित्रपटही आहे असे वाटतेय. नंतर ऋषी कपूर-किमी काटकरचाही आलेला, ditto story....
मूळ कुठल्यातरी इंग्रजी सिनेमात असणार हे नक्की.
वर कोणीतरी विचारलंय फोटो
वर कोणीतरी विचारलंय फोटो प्रेम बद्दल. मी पाहिला, मला नाही आवडला तितका. नीना कुलकर्णी चा अभिनय as usual सुन्दर ...
फोटो फ्रेम>>>>>
फोटो फ्रेम>>>>>
मी पण सुरु केला पाहायला , अर्ध्यात सोडला.बोअर झाला.
नीना कुलकर्णी चा अभिनय as usual सुन्दर ...>>>>>>+१
कोणता धुआ
कोणता धुआ
ऋषी कपूर किमी , सस्पेन्स मुवि खोज
तो एका इंग्लिश पिक्चरवर होता , द चेस ऑ शेडो की कायतरी
https://en.m.wikipedia.org/wiki/Dhuan
हा धुआ , मिथुन चा आहे.
मंदार
मंदार
मिथुन गरिबांचा अमिताभच नाही तर अशक्तांचा रजनीकांत पण आहे. ' डडळज' मिथुनच्या नशिबात असता तर वेगळ्या उंचीवर(?) गेला असता. किती किफायतशीर असावं एका माणसाने
डडळज जतीजळ
डडळज
जतीजळ
माझे काका मिथुनचे फैन आहेत.
माझे काका मिथुनचे फैन आहेत. ते नेहमी म्हणतात की गोविंदा आल्यामुळे मिथुन सुपरस्टार होता होता राहिला.
बूटाला चिखल लागू नये याची
बूटाला चिखल लागू नये याची काळजी घेऊन हाणामारी करणारा हिरो.
https://youtu.be/TjJ14q9DO9s?t=158
इथली चर्चा वाचून द ग्रेट
इथली चर्चा वाचून द ग्रेट इंडियन किचन बघितला . Amazon prime वर . तिला सारखे स्वयंपाक आणि काम करताना बघून मलाच दमल्या सारखे झाले . ज्या कोणाला प्रत्यक्षात असे करावे लागत असेल आणि दुसरा पर्यायच नसेल त्यांच्याविषयी वाईट वाटले. बाकी घर वगैरे छान घेतलंय . वेगवेगळे पदार्थ बघून गुलाबजाम पिक्चर ची आठवण झाली .
सायकल पहिला नेटफ्लिक्स वर ,
सायकल पहिला नेटफ्लिक्स वर , एकदा पाहण्या सारखा आहे
पटकथा अजून थोडी चांगली असती तर अजून उंचीवर गेला असता
छायाचित्रण सुंदर आहे , कोंकण छान दाखवलय (अमलेंदू चौधरी)
चित्रपटात एक positivity आहे , ह्रिषीकेश जोशी भाऊ कदम प्रियदर्शन जाधव आणि सर्वच कलाकरांचे काम मस्त
संदीप और पिंकी फरार... prime.
संदीप और पिंकी फरार... prime... नक्की बघा...
अर्जुन आणि परिणीती ने खूप सुंदर काम केले आहे... स्पेशली अर्जुन ची एकटिंग अप्रतिम आहे...
छान चित्रपट...
अर्जुन ची एकटिंग अप्रतिम आहे.
अर्जुन ची एकटिंग अप्रतिम आहे.
हा उपरोध आहे का?
का माहीत नाही पण च्रप्स
का माहीत नाही पण च्रप्स लिहितात ते नेहमी उपरोधाचे वाटते जसे जान्हवी खूप सुन्दर दिसते. अर्जुन ची एकटिंग अप्रतिम आहे वगैरे.
पण नन्तर ते डिफेन्ड करतात. सो नसावे तसे.
च्रप्स मुद्दाम चार चौघांच्या
च्रप्स मुद्दाम चार चौघांच्या मते जे नॉरमल असेल त्याच्या विरुद्ध लिहितात असे जाणवले आहे.. असो आवड एकेकाची
Pages