चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संदीप पिंकी फरार पाहिला.
परिणती चोप्रा सुंदर दिसलीय. अर्जुन कपूर ची ऍक्टिनग पण मस्त.
मला पिक्चर आवडला.काही सीन डिटेल मध्ये दाखवणे घाबरवणारे(आक्षेपार्ह नाही) वाटले.पण एकंदर चित्रपट आवडला.

इले सिअम की काय नावाचा सायन्स फिक्क्षन टाइप सिनेमा अर्धा बघितला. अर्धा आज जमले तर बघीन उत्साह राहिला तर. अगदीच फॉर्मुला पिक्चर आहे. एक तर मॅट डेमोन. म्हणजे काहीतरी राडा असणारच. व २१५४ मधली स्टोरी आहे पण अगदी आज पण घडू शकते त्या टाइप आहे. इलेसिअम हे पृथ्वीच्या वर फिरणारे अति श्रीमंता साठींचे जग आहे. इथे सर्व ग्रीन सर्व लोक व्हाइट व मेड बे सुविधा मुळे कायम तरूण व निरोगी.
इतर गरीब गुरीब व सर्व एथ्निसिटीचे लोक पृथ्वीवर दाटीवाटीने, गरिबीत उपासमारेत चोर्‍या मार्‍या करत जगत आहेत. हे आजचेच जीवन वाट्ते.

म्याट ह्या पैकीच एक आहे. इलेसिअम ची रक्षा ंमंत्री ज्योडी फॉस्टर एकेकाळची गुणी अभिनेत्री आहे. अतिशय कृर पणे येणार्‍या इमिग्रंट विमानांना उडवून लावते. तर ह्या इलेसिअम काउ न्सील चे विश्व अध्यक्ष होल्ड युअर ब्रेथ " प्रेसिडेंट पटेल" नाम फॅमिलीअर लगता हैना..

तिला रागवतात व परत असे काही केलेस तर कडक अ‍ॅक्षन घेइन असा दम देतात. ती अश्या सिचुएशन मध्येमीच तुमचे रक्षन करेन असे म्हणून त्याला उडवून लावते. पुढे लै मारामार्‍या डोक्यातच प्रोग्राम स्टोअर करणे व तो एन्क्रिप्ट करणे इलेसिअम व पृथ्वी करांची मारामारी व मेड बे आरोग्य सेवेचा हक्क सर्व प्रुथ्वी करांना मिळणे असा संघर्ष आहे.

त्यात म्याट ची जुनी लहान पणची मैत्रीण हिला एक गोड मुलगी आहे तिला नेमका लुकेमिया झालेला आहे व त्या साठी तिला मेड बेची गरज पडते.
मग हे सर्व पब्लिक तिथे जाते परत मारामारी कंप्युटर मध्ये प्रॉग्राम घालून क्लायमॅक्क्ष व शेवटि गोड. म्हणजे सर्वांना हेल्थ केअर चा हक्क मिळतो.
झिंदाबाद.

मॅड मॅक्स ओरिजिनल, व मॅड मॅक्क्ष दोन पण प्राइम वर आलेले आहेत. ते बघायच्या क्यु मध्ये आहेत. काल अनेक दिवसांनी परत मॅट्रिक्स री लोडेडच पाहिला कार चेस संपेपरेन्त. जे ओळखीचे ते बरे वाटते.

अवांतर ते वरील मटन करी तुटलेला हात चर्चा बघून माबोवर कोणताही बाफ लंच करताना उघडायला शंका वाटू लागली आहे. Wink

गॅस सिलेंडर ब्लास्ट मधे बाकी सगळ्या बॉडीचा कोळसा झाला, हात का नाही जळला?>>>>> कारण आईस बकेट मध्ये हात ठेवल्याने जळाला नसेल

गॅस सिलेंडर ब्लास्ट मधे बाकी सगळ्या बॉडीचा कोळसा झाला, हात का नाही जळला?>>>>> कारण आईस बकेट मध्ये हात ठेवल्याने जळाला नसेल आणि तापसी नील च्या पुर्ण बाॅडी वर केरोसीन टाकते त्यामुळे पुर्ण बाॅडी कोळसा होते ....

जून सिनेमा पहिला . सुंदर आहे. मनातल्या गोष्टी एकमेकांशी व्यक्त करतात दोन पात्रं . त्यातून उलगडला जातो पूर्ण सिनेमा . खूप दिवसांनी चांगलं व सकस पाहायला मिळालं मराठी मधे.

ओके.

मी काल असाच अचानक नेफ्लि सजेशन मधे दिसला म्हणून "साहिब बीबी और गँगस्टर रिटर्न्स" पाहिला. नॉट बॅड. एन्गेजिंग आहे. गुड अ‍ॅक्टर्स.
स्टोरी पुढे कसा टर्न घेईल याची उत्सुकता टिकून रहाते पूर्ण वेळ. याचा प्रिक्वेल पण होता, पण तो नाही पाहिलेला मी.

हो तोच. यात जिमी शेरगिल, इर्फान खान, माही गिल, सोहा अली खान आहेत. पहिला पाहिल्रेला नसल्याने त्याच्या तुलनेत हा कसा आहे कल्पना नाही.

रॉक द कस्बा - याच थिम वर आमीर खानचा एक चित्रपट बघितलाय असं वाटतंय, बट धिस वन हिट्स आउट ऑफ दि बॉलपार्क. बिल मरी इज आउटस्टँडिंग, सो इज ब्रुस विलिस (केट हड्सन इज अंडर्युटिलायज्ड, बाय्दवे). सत्यघटनेवर आधारीत आहे बहुतेक; तालिबान -> अमेरिकन बुटस ऑन द ग्राउंड -> लोकल वॉरलॉर्ड्स अशी काहिशी पार्श्वभूमी आहे. बघा, आवडेल तुम्हाला. नेफिवर आहे...

मोगरा फुलला पाहिला.. फॉर या चेंज स्वप्नील जोशी ने छान काम केले आहे.. बेयरिंग मस्त पकडले आहे...
आवडला.. 10/10...

तुफान बघितला, खूपच प्रेडिक्टेबल..उथळ वाटला.
शिवाय कारण नसताना धर्माची फोडणी. वेळ गेला नुसताच.

तूफानच्या ट्रेलरलाच मी त्या धाग्यावर लिहिले होते की प्रेडीक्टेबल दिसत आहे.
बायकोलाही हे म्हटलेले. तरी तिने पाहिला. मी तिला विचारलेही नाही कसा आहे आणि तिने सांगितलेही नाही कसा आहे.
तरी मूड आला तर बघेन कधीतरी. कधीकधी एखादा पिक्चर बघून त्याला शिव्या घालण्यातही मजा असते म्हणून. फक्त त्या फरहान अख्तरला सहन करता येत नाही जास्त. तसा अभिनय वाईट नाही करत पण आपण काहीतरी भारी अभिनय करतोय असा जास्तीचा आव असतो उगाच. जावेद अख्तर यांच्यासारखेच आहे त्याचे. ते सुद्धा काही वाईट लिहीत नाहीत. पण आपण काहीतरी भारीच लिहीतो असा आविर्भाव असतो.

हो.तुफान पाहिला.धर्म, भावनिक प्रसंग यात मूळ बॉक्सिंग साठीची मेहनत, स्ट्रगल हरवलाय.तो जेमतेम 20 मिनिटं किंवा 40 मिनिटं असेल.
त्यात जो दुःखी ट्विस्ट नंतर आणला तो अनावश्यक होता.
गाणी बोअर(ऐकायला) आहेत.
फरहान गुंड वाटत नाही.आधी पासून कॉर्पोरेट वाटत राहतो. कदाचित भाषा असेल.
म्हणजे,चांगले कलाकार,फरहान ची बॉडी वगैरे गोष्टी जुळून येऊनही पिक्चर आवडला नाही.

जवानी जानेमन पाहिला! विचित्र आहे! (स्पॉयलर्स अ‍ॅलर्ट)
तापसी नवर्याच्या भावाबरोबर झोपते, नवरा सोडुन द्यायच्याऐवजी तिला मारायचा प्रयत्न करतो त्यावर तिचे
लॉजिक की प्रेम खुप आहे म्हणुन तो मारायचा प्रयत्न करतो. (हे प्रेम कुठेच दाखवले नाही!)
नंतर ते दोघे त्या भावाला मारायचा प्रयत्न करतात का तर तो तापसीला सोडुन गेला म्हणुन.
या सर्व व्हिलन्स मध्ये तोच जरा कमी व्हिलन वाटतो आणि त्यालाच बिचार्याला शेवटी मारला आहे.

Lol जवानी जानेमन (सैफचा) काय नि हसीन दिलरूबा (तापसीचा) काय... दोन्ही एकूणात "ये क्या सितम हुआ, ये क्या जुलम हुआ " गटातच आहेत.

जवानी जानेमन (सैफचा) काय नि हसीन दिलरूबा (तापसीचा) काय... दोन्ही एकूणात "ये क्या सितम हुआ, ये क्या जुलम हुआ " गटातच आहेत
<<<
Rofl

हसीन दिलरुबा आताच पाहिला.तापसी चे ड्रेस आणि साड्या सुंदर आहेत, स्पेशली हर्षवर्धन राणे ला चहा देतानाची मोरपंखी साडी.

एकंदर फारच व्याप करावे लागले असं वाटलं.अजून सोपे मार्ग शोधता आले असते Happy

Pages