चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजय देवगण चे सिनेमे ( पैसे देऊन)कोण बघतं ? हा मला नेहमी पडणारा प्रश्न आहे.
>>> मी Happy आवडतो मला तो ऍक्टर.. swag आहे त्याच्यात... आणि स्क्रिप्ट छान असते, शिवाय अपवाद...

मी बघते
तान्हाजी फॅमिली बरोबर आणि नंतर आईबरोबर आईला दाखवायला असा 2 वेळा पाहिला होता थिएटरला(करोनापूर्व काळात थेटरात पाहिलेला शेवटचा.)

मला आवडतो अजय देवगण. फार पुर्वीचा नाही आवडत पण विजयपथ पासून आवडायला लागला, हम दिल दे चुके मधे अजुन आवडला आणि सिंघम एक मधेही खूप आवडला. हे सर्व टीव्ही वर बघितले. सिंघम दोन त्या करीनामुळे बघावासा वाटला नाही, तानाजी नाही बघितला. तसे फार पिक्चर बघितले जात नाहीत.

भुज मधली संजय दत्तची लास्टची फाईट बघितली काय तुम्ही? बाबो बाबो बाबो...असंभव. त्या एकट्याने दोन तीन हजार सशस्त्र सैनिक मारले. ते पण नुसत्या मिनी कुऱ्हाडीने. बॉर्डर पिक्चरमध्ये न घेतल्याचा राग पाकिस्तानी सैनिकांवर काढत होता. संजय दत्तने सगळ्यांना मारलं होतं नन्तर उरलेल्या चार पाच सैनिकांना मारायला आपले साडेचारशे सैनिक कशाला पाठवले? लैच अति दाखवलंय.

त्या एकट्याने दोन तीन हजार सशस्त्र सैनिक मारले. ते पण नुसत्या मिनी कुऱ्हाडीने. बॉर्डर पिक्चरमध्ये न घेतल्याचा राग पाकिस्तानी सैनिकांवर काढत होता. -- Lol Lol

शेरशाह चांगला आहे.. लवस्टोरी चा प्लॉट अगदीच लहान आणि बेअरेबल आहे वाईट आणि स्टेरिओटाईप नाही. बघायला हरकत नाही.

भुज बघितला पहिले पंधरा वीस मिनिटे काय चालय काही कळत नाही आणि आपण का बघीतलाय ते पण कळल नाही शेवट पर्यंत ........ऑस्कर साठी जाईल बहुतेक

शेरशाह आणि भुज दोन्ही पाहिले . शेरशाह चांगला आहे. स्पेशली युद्धाचे सिक्वेन्सेन्स फार चांगले आहेत .एकंदर पिक्चर एन्गेजिंग आणि फास्ट आहे. लव्हस्टोरीचा प्लॉट किंचित रेंगाळतो पण तो छोटासाच आहे.

भुज गोंधळलेला वाटला. खूप सारे सब प्लॉट असल्याने कुठे काय घडतंय काहीच कळत नाही. कसाबसा पाहून संपवला

शेरशाह पाहिला. वन टाईम वॉच नक्कीच आहे. युद्धाचे सिक्वेन्स चांगले घेतले आहेत. प्रेमप्रकरण ओव्हरपॉवर नाही करत मूळ कथानकाला. अजून चांगला ऍक्टर चालला असता पण सिद्धार्थ मल्होत्रा फार वाईट नाही.

शेरशाह मी पण पहिला, मनात सारखे लक्ष्य बरोबर तुलना होत होती, कथेची हाताळणी, हेअरकट, एकूणच वागणे, जरा पटले नाही.
ओव्हर ऑल शिस्तीची कमी आहे, असे वाटले. एक टिपिकल हिंदी सिनेमा वाटला.
आपल्या वार्ताहरांच्या मुळे सैन्याला त्रास झाला असे वाचले होते, ते खरे वाटले.

लिजन्ड ऑफ टारझन
अत्यंत भिकार चित्रपट
आपण हिंदी किंवा साऊथ च्या मुव्ही ला शिव्या देतो
लॉजिक, फिजिक्स आणि कथेचा बाजार उडवतात म्हणून
हे टारझन प्रकरण त्याच्या पाच पावलं पुढे आहे

शेरशाह चांगला आहे.. लवस्टोरी चा प्लॉट अगदीच लहान आणि बेअरेबल आहे वाईट आणि स्टेरिओटाईप नाही. बघायला हरकत नाही. >> +१. थोडा फार फिल्मी प्रकार सोडला तर सिनेमा सुसह्य आहे.

थर्ड क्लास सिनेमांनी मला अनेक दर्जेदार लेखकांशी ओळख करून दिली. Prithviraj हा असाच एक. झटपट वाचा आणि लोटपोट व्हा !!!

***

तर मंडळी....
.
.
व्हिएफएक्स नं तरूण केलेलं एक अजय देवगण असतंय.
आणि व्हिएफएक्स च्या बी पाक पलीकडं गेलेलं संजय दत्त असतंय.
संजय दत्त पीके पिक्चरमधल्या गेटअप मधे असतंय.
तेच्या कडं एक कापाकापी करणारी कुऱ्हाड असत्या.
त्या कुऱ्हाडीनं ते लाकडं सोडून माणसं कापत असतंय ती बी समदी शत्रूची.
तेजं कामच असतंय ते.

अजय देवगण भुज एअरपोर्ट चं प्रमुख सरदार असतंय.
आणि तरी बी पाकिस्तान ची विमानं आली की ओम्नीच्या पत्र्यापासनं तयार केलेल्या विमानभेदी तोफेवर चढून विमानं उडवायचं काम तेला असतंय.
सात आठ विमानं आली तरी ते एक किंवा दोनच उडवत असतंय.
आणि तेच्या बॉस ला लगेच "मी एवढी ईमानं उडवली हौ" म्हणून फोन करत असतंय.
शास्त्रच असतंय ते..

आता अजय देवगण,संजय दत्त हाय म्हणल्याव सोनाक्षी सिन्हा आलीच.
ती धाडशी स्त्री असती.
तशी ती नेहमीच असती.
पण ह्यात ती विळ्या कोयत्यानं डायरेक बिबट्या कापती.

तर मंग पाकिस्तानी ईमानांनी भुज एअरपोर्ट च्या रनवेवर ह्ये मोठ्ठी मोठ्ठी भगदाडं पाडलेली आसत्यात.
त्ये मुजवायचं काम देवगण नं सोनाक्षी सिन्हा ला आन तीच्या गावकऱ्यांस्नी "राजीव गांधी समद्या हाताला काम योजने" अंतर्गत दिलेलं असतंय.
त्ये काम बी एका रात्रीत सपवायचं असतंय.
गावातली घरं फोडून ती दगडं वापरून गावकरी समदं खड्डं मुजिवत्यात.
अजय देवगण आन तेची बायडी दोघं बी सोत्ता रोडरोलर फिरीवत्यात.
कुटं शिकलीत ईचारू नगा..मी बी ईचारलं न्हाई..

तवर तिकडनं पाकिस्तानी ईमानं येऊन रनवेवर अजून मोठ्ठी मोठ्ठी भगदाडं पाडत्यात.
त्यी भगदाडं बी गावकरी परत मुजिवत्यात.
डांबर कुठनं आणत्यात ते तुमी ईचारू नगासा..मी बी ईचारलं न्हाई.

आता अजय देवगण हाय म्हणल्यावर शरद केळकर बी आला.
फॅमिली मॅन आणि तान्हाजी मधे फिट दिसणारा केळकर हितं सुज आलेला सोल्जर झालाय.
त्यो 120 माणसास्नी घेऊन पाकिस्तान ची हजारो मान्सं कापून काढतोय.
त्यातले दोनशे तीनशे चारशे तर एकटा संजय दत्तच कापून काढतोय.
ते बी तेच्या कुऱ्हाडीनं.
आता त्यो कुऱ्हाड फिरीवतोय म्हणल्यावर समदी पाकडी बी दंबूका फेकून तेच्यासमोर चाकू घेऊनच येत्यात.
का ते तुमी ईचारू नगासा..मी बी ईचारलं न्हाई.

ते तिकडनं केळकर च्या मदतीसाठी पाचशे सैनिक एकाच विमानात कोंबून एक सरदारजी निघालेला असतोय.
अजय देवगण चा जो बॉस असतोय कनी तोच ह्या सरदाराचा बी बॉस असतोय.
बॉस ईचारतोय,"का रे मान्सा,
मायूस का हाईस?"
तर सरदारजी म्हंतोय,"पाचशे जण घेऊन ईमान उडंल का माह्यं ?"
तर बॉस म्हंतोय,"जा की शान्या तेला काय हुतंय?"

तर मग सरदारजी कुतून विमानाचं स्टेअरिंग वर वडतंय.
आता तुमी म्हणशीला विमानाचं स्टेअरिंग कुतून वडायला ते काय ट्रक हाये का?
पण तुमी तेवढ्यासाठी पिक्चर बगाच.
नाय तुमी हसून लोळलासा तर ही पोष्टच मागं घेतो.
तर मग सरदारजी एवढं कुतूनबी विमान उडंना म्हणल्यावर बॉस ला फोन लावतंय,
"अवो उडंना की ईमान !!!"
तर बॉस म्हंतय,
"शान्या,
पन्नास सैनिकास्नी काढ की भाईर !!!"
मग ते सरदारजी पाचशेतल्या पन्नास सैनिकास्नी ईमानातनं भाईर काढून ईमान आकाशात उडीवतंय.

तिकडनं अजय देवगण फोन करून ईचारतंय,
"निगलंस का?"
तर ते म्हणतंय,"निगलोय खरं,
पर ईमानाचं चाक तुटलंय."
देवगण म्हंतय,
"शान्या मी मराठा हाये,
ट्रक चालिवतो रनवेवर,तू ट्रकवर ईमान घाल."

सरदारजी ईमान आणतंय,ट्रकावर घालतंय,ईमान थांबतंय.
ईमानातनं 450 सैनिकं भाईर पडत्यात आन धडाधड गोळ्या घालून उरलेल्या धा-पंधरा पाकड्यास्नी यमसदनी पाटिवत्यात.
आन मंग साठा उत्तराची अजय देवगणनं पैशे घालून काशी केलेली कहानी संपतीया आन आपण गडाबडा लोळून हसतोया.
लय मज्जा येतीया..
आमी बगिटलो.
तुमीबी बगा..

#भुज

- पृथ्वीराज नलवडे.

रे देवा Rofl आम्हाला तर झोप येत होती बघताना , तरी पूर्ण दोन तासपण नाहीये तरी संपेना‌‌ .

अजय देवगण आन तेची बायडी >>> त्या बायडीवर फारच अन्याय झालाय की वो. धा वर्सं झाली म्हनं लग्नाला तरी नववधू सारखी तरतरीत ठेवली सवताला आणि जेमतेम एक रोमॅंटिक गाणं सुरु व्हायच्या आतच संपवलं की वो. तरी बिचारीनं रोडरोलर चालिवला तेपण तोंडातून पूर्ण पिच्चरभर एक चकार शब्द न काढता. डोळे पाणावले माझे तर.

आणि संजय दत्त जिवंत राहतो हं एवढ्याशा मारमारीनंतर . कादाचित मला झोपेत कळलं नसेल. बापरे , की तो ऑलरेडी भूतबित होता? Uhoh

बॉर्डर पिक्चरमध्ये न घेतल्याचा राग पाकिस्तानी सैनिकांवर काढत होता. संजय दत्तने सगळ्यांना मारलं होतं नन्तर उरलेल्या चार पाच सैनिकांना मारायला आपले साडेचारशे सैनिक कशाला पाठवले? लैच अति दाखवलंय.>>>>>>>>
Lol
कहर !बोकलत कहर !!
तुम्ही अजून कोणकोणत्या धाग्यावर प्रतिक्रिया टाकल्यात जरा सांगता का ?
एकदम वाचून घेईन म्हणतो Happy

आशुचँप, लईच भारी ल्यून रैले रौ तुमी!!! Happy

मुळात तू तो सिनेमा पूर्ण पाहिल्याबद्दल तुला रेड अँड व्हाईट ब्रेव्हरी अ‍ॅवॉर्ड द्यायला हवं. मी १५ व्या मिनीटाला नाद सोडला.

ओ मी नाही हो तो
मी फक्त शेअर केला आहे
पृथ्वीराज म्हणून आहेत एकजण त्यांनी लिहिलं आहे

एकदम स्पॉण्टेनियसली डोक्यातील विचार एका फटक्यात उतरवल्यासारखे मस्त जमले आहे ते. सगळे पाकडे बंदुका टाकून चाकू घेउन येतात ते, किंवा बॉस ने मायूस का विचारणे, विळ्याने डायरेक बिबट्या, व्हीएफएक्स वाला अजय देवगण वगैरे टोटल लोल आहे.

हो

Pages