चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(तसं इतके प्रतिसाद वाली चर्चा झालीय तर स्पॉयलर सहित असा वेगळा धागा काढायला हरकत नव्हती)

पिक्चर मुलांबरोबर बघता येईल का?10 प्लस मुले.

ओह
मग जाऊदे.शेरनी बघू वीकेंड ला.

१८+ लोकांनी पण बघू नये तर १०+ ला काय म्हणू .... >>>>
एवढा काही वाईट नाहीये. वन टाइम वॉच आहे.
अनू, जरा रक्तपात, किसिंग सीन्स वगैरे आहेत. त्यामुळे, शक्यतो लहान मुलं नकोत.

ओके
जरा दोन्ही चे ट्रेलर बघून ठरवता येईल.

एवढा काही वाईट नाहीये. वन टाइम वॉच आहे. >>+1
10 + मुलं असतील तर शेरनी आवडेल मुलांना .
सान्वी, नीलकंठ मास्तर पण छान आहे, स्वातंत्र्य पूर्व काळातील आहे . अधीर मन ... गाणं खूप आवडतं त्यातलं.

अधीर मन ... गाणं खूप आवडतं त्यातलं>>>>>>>.+ १००००
श्रेया घोषाल नेहमीच आवडती.
बघु का मग नीलकंठ मास्तर, वर्णिता?

प्राईमवर आहे.
मी बघतेय,अर्धा झाला. चांगला वाटतोय.

एवढा काही वाईट नाहीये. वन टाइम वॉच आहे. >> Lol इतक्या लोकांनी इतकी पिसं काढली तरी आहेच का! Happy गंमत जाऊ दे, वन टाईम काय, रिपीट बघायला ही आवडेलही कुणाकुणाला. व्यक्ती तितक्या प्रकृती. मी आपलं मला जे वाटलं ते सांगितलं.

स्पॉयलर ----
हसीना दिलरुबा मधे हात कापण्याचे एकमेव कारण म्हणजे ते गोंदण. तो रिशीचा होता हे प्रेक्षकांच्या डोक्यात घुसवून शेवटचा सस्पेन्स बनवण्यासाठी हाताचे प्रकरण जोडले असे वाटते. तो शॉट किती वेळा येतो ते आठवा. बाकी एकदा पोलिसांची चौकशी रिशी मेला अशा अँगलमधे नेल्याने फोरेन्सिक मधे हात धारदार शस्त्राने कापला आहे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष झालय. त्याच वेळी फोरेन्सिक रिपोर्ट मधे रिशीवर आधी जड शस्त्राने वार झाला होता हे सापडते हे येते. पण एकंदर एंगेजिंग सिनेमा होता नि सगळ्यआंचेच रोल्स परफेक्ट झालेत. रिशीची आई नि रानिची मावशी रॉक्स !

10 प्लस मुले.

इतकी मुले कोणाला असतात आजच्या जमान्यात?

मी प्रतिसाद लिहिताना विनोदी अंगानेच लिहिला होता मुद्दाम पण खरंच सांगतो आधी जेव्हा तुमचा प्रतिसाद वाचला ना तेव्हा वाटलं एखादी ट्यूशन टीचर किंवा एकत्र कुटुंबातली महिला ग्रुपने मुलांना सिनेमा दाखविणार आहे की काय? मग खालचा प्रतिसाद वाचल्यावर हा आकडा वयाबद्दल आहे हे कळलं..

त्यातही एक फॅक्ट अशी की एकट्या दुकट्या मुलाला पालकांनी एखाद्या गंभीर विषयावरचा सिनेमा दाखविला आणि समजा त्यात एखादा
अ‍ॅडल्ट सीन आला तरी ते मूल कथेचा भाग म्हणून त्या सीनचा सिरीयसनेस समजून घेतं पण तोच सिनेमा बरीच टीनेज मुले एकत्र पाहत असली तर फक्त सीन मधला वात्रटपणा पुन्हा पुन्हा चघळत बसतात त्याचमुळे ग्रूपमध्ये मुलांना सिनेमा दाखवावा का? अशी शंका असलेला तो प्रश्न वाटला होता मला.

मी आज दुसऱ्यांदा पाहिला... सस्पेन्स माहीत होतेच पण बाकी dialogs एन्जॉय केले..
पैसे वसूल चित्रपट आहे.. विक्रांत मेस्सी च्या आईने भारी काम केले आहे...

मला हसीन दिलरुबा सस्पेन्स पार्ट सोडून खूप आवडला बघायला, शेवटची काही मिनिटे सोडून सिनेमा मस्तं आहे Happy
तापसी, विक्रान्त, हर्षवर्धन राणे आणि तापसीचे सासु-सासरे सगळ्यांचं अ‍ॅक्टिंग भारी !
>>>> अ‍ॅग्री.. १ टाईम वॉच नक्कीच आहे, असे अजून मुव्हीज बनले पाहिजेत म्हणजे हळू हळू अ.आ. गोष्टी कमी होतील Happy

मला पण ह.दि. शेवट सोडून आवडला.
विक्रांत मेसीसाठी बघा, असं म्हणेन.

वरती कुणीतरी वि.मे. टाइपकास्ट होण्याबद्दल लिहिलंय. मला उलट ता.प.च टाइपकास्ट झाल्यासारखी वाटते आहे आता.

**** स्पॉयलर ****

विक्रांत मेसीचं पात्र अबोल, लाजरंबुजरं असलं तरी तो अत्यंत हुशार दाखवलाय. गरज पडल्यास तो पाताळयंत्रीपणाही करू शकतो, त्याचं डोकं तिरकं चालू शकतं, हे दर्शवलं आहे आधी. त्यावरून, शेवटी तो पट्कन एक प्लान अंमलात आणतो, असा विचार केला मी.
तरी हात तोडून, पाण्यात उडी मारून आणि वर जिवंतही राहणे हे काही पटलं नाही. अति रक्तस्त्रावाने बेशुद्ध पडायला हवा तो. (बॉलिवूड सिनेम्यांमध्ये मनगटाची एक नस कापून लोकं आत्महत्या करतात. Uhoh )

मी पाहिला एकदाचा , एक सासु सोडली तर बाकी सगळे थोडे थोडे विकृत वाटले. तापसीचे सगळ्यात विकृत, मगं विक्रांतचे ,नंतर हर्षचे...रेल्वे स्टेशनवरचे बिग्रेड पुस्तक वाचून बिग्रेड कथा तयार केली आहे. हे स्वतःच उद्धृतही केलंय. Wink
कामं सगळ्यांची चांगली आहेत हा एक प्लस पॉईंट आहे. कुठे कुठे क्राईम पेट्रोलची/ सिआयडीची आठवणही आली. प्रेमप्रेम डोक्यात गेलं , लग्न झालंय तर एवढे प्रेमप्रेम(?) करायची गरज नाही, चिल Proud शिवाय सगळं किती सोयीचे होते, जसं आग लागली की मागेच नदी, जे लफडं सासुसासऱ्यांना कळलं नाही ते रोडरोमिओंना माहिती, मोठे फ्रिझर व तंगडी तयार, व पुढे जाऊन आग लावता येण्यासाठी, डोमेस्टिक वॉयलेंस करता येण्यासाठी आधी विक्रांतला इंजिनिअर दाखवणे , तिच्या सासुनी कटकट करावी म्हणून तिला स्वयंपाक न येणारी दाखवणे, यडा रिक्शेवाला उतरवून सुद्धा तिच्या मागेमागे जाणे, साक्षीपुरती शेजारीण व खिरीचे आमंत्रण, सगळं manipulated वाटलं. मला तर ते रूमच्या मधोमध असलेले लाल कपाटही खटकले , होमिओपॅथी का केली तेही कळलं नाही, याचा वापर पुढे होईल वाटले पण झाला नाही.
तापसीच्या साड्या व ड्रेसेस अफाट सुंदर.

@सीमंतिनी
कसली धमाल आहे ही सी , मी टोटल फिदा..
ऐसा नही करते है रानी Biggrin
एकदम जबरदस्त.

जे लफडं सासुसासऱ्यांना कळलं नाही ते रोडरोमिओंना माहिती
>>> ते हर्ष चे मित्र असतात. आणि अशा गोष्टी मित्राना सांगतात जनरली..

फायनली धुआ बघितला, राखी, मिथुन, रंजिताचा.

बोअर आहे, शेवटी दहा मिनिटं बघितला असता तरी चाललं असते. तरी पुढे पुढे ढकलत बघितला.

गरज पडल्यास तो पाताळयंत्रीपणाही करू शकतो, त्याचं डोकं तिरकं चालू शकतं, हे दर्शवलं आहे आधी

>>>> हे कधी दाखवलयं ??

हे कधी दाखवलयं ??>>> त्याला तिच्या आणि मावस भावाबद्दल कळते तेव्हा तो तिला शिक्षा म्हणून जिन्यात पाडणे, गॅसचा भडका असे काही प्रकार करून इजा करत असतो.

Pages