चित्रपट कसा वाटला - 4

Submitted by कटप्पा on 14 May, 2020 - 12:27

आधीच्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद गाठले म्हणून हा नवीन धागा .
तेवढेच माझे नाव पहिल्या पानावर Happy

पूर्वीचा धागा - https://www.maayboli.com/node/62306

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, आम्हीपण असेच केलेले. सुरुवातीला सिनेमा बघितला की अरे ह्या पुस्तकातील हे फार इंटरेस्टिंग होतं पण घेतलंच नाही असे संवाद झडत. मग मग हे कमी होत गेलं.
आता पुस्तकांची तर पारायणं झालीच पण सिनेमांची ही होतात. चित्रपट बनवताना काय काढायला नको होतं अशी ही चर्चा अनेकदा होते.
हॅपॉ पुस्तके फारच भारी लिहिली आहेत, पण चित्रपट ही उत्तम आहेत असं हल्ली मला (कदाचित त्यालाही) वाटतं.

सिंहासन हा पुढारलेली इमेज असलेल्या लोकांनी बनवलेला आहे पण त्यातील स्त्रियांचे चित्रण व इमेज अग दीच किळस वाणी वाटली .

सी एम ची बायको एकदम पारंपारिक बायको मागे राहून नवर्‍याची काळजी करणा री.
सी एम ची गर्ल्फ्रेंड एका फोन वर लगेच अव्हेलेबल ते ही हॉटेल मध्ये स्लीवलेस ब्लाउज घातलेली त्यातल्या त्यात मॉडर्न दिसणारी स्त्री.
अर्थमंत्र्याची सून हिचे अर्थ मंत्र्याबरोबरच रिलेशन शिप चालू आहे व ते ही नवर्‍याच्या समोर. हे अगदीच कसेतरी होते बघताना. नवर्‍यावर उघड अन्याय होतो आहे ह्या अर्थाने.
एक अतिशय सडू चेहर्‍याची मोलकरीण ही नाना पाटेकरची बायको आहे. हे गरीब झोपडीत राहणा रे कुटुंब. ही पैसे साड्या पर्फुम साठी एका माणसा बरोबर संबंध ठेवून आहे. ह्यांच्या घरी ती काम करते. पण काम उरकल्यावर तो माणूस सरळ तिला अपशब्दात शिव्या देतो. आता
मेड व मालकाची पण प्रांजल रिलेशन शिप- मेड चा आउटलुक दाखवणार्‍या पण वेब सीरीज येतात त्या पार्श्व भूमीवर हे फार विचित्र वाट्ते
दोन्ही बाजूने शोषणच आहे. वर हे नवर्‍याला माहीत आहे तो सरळ तिला सर्व कामे सोडायला सांगतो.

एक मिसेस चंद्रात्रे ही कायम कोणालाही उपलब्ध आहे व फायद्यासाठी तसे प्रयत्न करत असते असे दाखवले आहे. हिच्याही लो कट ब्लाउजचा
शॉट आहे. अंगभर साड्या नेसण्याच्या काळात हा शॉट जरा शॉकिन्ग आहे पण आता कालबाह्य वाटतो.

दिगू ची शेजारीण आधी खालून वर बादल्या भरून पाणी आणते व त्यात कपडे धूत असते नंतर काही वेळाने एका शॉट मध्ये त्यालाचि विचारते कपडे द्या साबण् पण द्या माझी मोलकरीण धुवून ठेवेल!!!

कास्टा ची सेक्रेटरी त्याच्या प्रेमातच. पण तसे बोलत नाही. ही फुल कोपरापरेंत चा ब्लाउज व कॉटन साडी. अ‍ॅक्टिविस्ट लुक.

फक्त एका शॉट मध्ये एक स्त्री शिक्षण मंत्री असून प्रश्नाला उत्तरे देत आहे असे दाखवले आहे.

पानीट कर ची बायको टिपिकल गृहिणी. अज्ञानी नवरा स्म गलिन्ग करतो ते काही तिला माहीत नाही व कळून घ्यायचे पण नाही. हातात पैसे आले की खूष. - पुस्तकातही असेच आहे पण तिची बॅक स्टोरी दिली आहे

एकूण निराशाजनक चित्रण स्त्री पात्रांचे. एनीवेज.

पूर्वीच्या काळात कपडे प्रतिकात्मक असायचे
म्हणजे पारंपारिक साडी म्हणजे सोजवळ बाई
सलीव्ह लेस म्हणजे व्हॅम्प , फ्री , खलनायिका इ

ते पूर्वीचे ड्रेस कोड होते

सिंहासन खूप पूर्वी पाहिला होता. राजकारण तेव्हाचे आणि आताचे काही फरक नाही फक्त आता मुंबईत फ्लायओव्हर्सची संख्या वाढली.

श्रीराम लागू आणि रिमा यांचे सासरे-सुनेचे संबंध खर्या आयुष्यातील राजकारण्यावर आहे असे ऐकले होते. बाकी खर्या राजकारणात बायकांना काय स्थान असते?

सिंहासन चित्रपटाबद्दल एक निरीक्षण असे होते की सगळी पात्रे स्क्रीनवर येतात ते हातात सिगारेट घेऊनच. तेंव्हा सिगारेट ओढणे हे फॅड होते का? की त्या काळी इंग्रजी चित्रपटांमध्ये सिगार होत्या म्हणून इकडे सिगारेट? काही सीन्स मध्ये सिगारेट ही बळेच घुसवली आहे असे वाटते.

पूर्वीच्या काळात कपडे प्रतिकात्मक असायचे
म्हणजे पारंपारिक साडी म्हणजे सोजवळ बाई
सलीव्ह लेस म्हणजे व्हॅम्प , फ्री , खलनायिका इ

ते पूर्वीचे ड्रेस कोड होते >>>>>>>> पुर्वीचे नाही, अजूनही हाच ड्रेस कोड थोडा फेरफार करुन मराठी- हिन्दी सिरियल्समध्ये चालू आहे.

सिंहासन बत्तीशी शाळेत असताना वाचलं होतं. लक्षात नाही आता. पण त्यात यातलं काही नव्हतं हे नक्की. >>>>>> सिंहासन बत्तीशी आणि सिंहासन दोन वेगळी पुस्तके आहेत हो. इथे सिंहासन पुस्तकावर आणि त्यावर बेतलेल्या चित्रपटावर चर्चा चालू आहे.

चिल पीपल ते झाड सोडले आता. परत ब्लॉक बस्टर बघणे चालू केले. मराठी सिनेमे अवॉइड.

फोटो प्रेम थोडा बघायचा प्रयत्न केला पण नीना चा कुबट चेहरा बघूनच बोअर होते आहे. म्हातार्‍यांचे तेच तेच घरगुती प्रॉब्लेम्स वर काढलेले पिक्चर बोअर असतात.

नेटफ्लिक्सवर सिल्व्हर स्केट्स नावाचा रशियन सिनेमा इंग्रजीत डब पाहिला. नेत्रसुखद अर्थाने प्रेक्षणीय आहे!!! गोष्ट अति अति बॉलीवूडीय पण बर्फाळ प्रदेश आणि नाताळचे वातावरण याने इतका सुंदर वाटतो बघायला की बस्स्स.....

प्राईम वर आम्ही दोघी म्हणून एक सिनेमा दिसला. कोणी बघितलाय का? कसा आहे? मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आहेत.

सी >> हल्ली सगळीकडेच बॉलीवुडी गोष्टी बनवण्याचे प्रमाण वाढलेले आहे. आपला टकल्या (जाळ अ‍ॅक्शन करणारा) नाही का फॅमिली फॅमिली करत ९ भाग काढतो आहे एकाच सिनेमाचे.

प्राईम वर आम्ही दोघी म्हणून एक सिनेमा दिसला. कोणी बघितलाय का? कसा आहे? मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट आहेत. >>> मला आवडला होता, मी टीव्हीवर बघितलेला. पहीला काही भाग हुकला.

आपला टकल्या (जाळ अ‍ॅक्शन करणारा) नाही का फॅमिली फॅमिली करत ९ भाग काढतो आहे एकाच सिनेमाचे. >>>>>> कोण?

आम्ही दोघी लिस्टमधे केला अ‍ॅड. विकेंडला नक्की बघणार.
पिकासो प्राईमवर नाही दिसला. कुठे बघायला मिळेल?

बादवे, आपलीमराठी.कॉम साईट बंद झाली का?

आहे प्राईम वर
प्रसाद ओक (स्पेलिंग ओ ए के) असा सर्च स्ट्रिंग दिला की येतो.

प्रसाद ओक (स्पेलिंग ओ ए के) असा सर्च स्ट्रिंग दिला की येतो. >> बरेच लॉजिकल झाले हे प्राइमच्या मानाने. पूर्वी पद्मावत शोधायला बाजीराव मस्तानी सर्च मधे द्यावे लागे. पद्मावत दिले तर येत नसे.

फारएन्ड, चोराची पावलं चोरांना कळतात तसं डेव्हलपर्स च्या मनीचे गुज एकमेकांना कळते. Happy युनिकोड सपोर्ट नीट दिलेला नसणार सर्च ला.किंवा पिक्चर टाकताना टर्म्स.
उद्या कोकण किंवा गनेश फेस्टिव्हल सर्च स्ट्रिंग देऊन पिकासो आणि हृतिक चा अग्निपथ मिळाला तरी नवल नाही.
अजूनही तो माय क्लायंट वाईफ काही सर्च मध्ये सहज मिळत नाही. (आमचे ग्रह वाईट होते म्हणून होम पेज वर लिस्ट मध्ये आलेला होता तो आम्ही पाहिला.)

Pages