भेटशील का पुन्हा..?
भेटशील का पुन्हा... एकदाच... आत्ता?
या नि:शब्द पावसात होऊदेत अनावर आपल्या मनातली वादळं
इतकी वर्षं मनात दबून राहीलेली
कधी अस्फुट कधी न उमजलेली
थोडा वेळ तरी गुंफुदे मला तुझ्या हातात हात
कंगोरे आपल्या बदललेल्या नात्याचे
तुझ्या तळहातावर आहेत शोधायचे
तुझ्या मिश्कील डोळ्यांमधे पाहूदे मला खोलवर
त्यात कदाचित तुझं प्रेम डोकावेल
पापणीची कोर जरा जरा ओलावेल
व्यक्त होऊदेत न बोललेल्या मनातल्या सार्या गोष्टी
शोधूया आपल्या प्रश्नांची उत्तरं
आता तरी सांगूया एकमेकांना खरं...
भेटशील का पुन्हा... एकदाच... आत्ता?