माझं प्रेम...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीसारखं
अस्तित्व मिटवून घेणार्‍या पाऊस सरीसारखं
माझं प्रेम...
पुन्हा पुन्हा किनारी धावणार्‍या लहरीसारखं

कृष्णाच्या आभासात जगणार्‍या मीरेसारखं
आकाशाला कधीच न भेटणार्‍या धरेसारखं
माझं प्रेम...
गोडवा देत विरघळणार्‍या साखरेसारखं

मौन ठेवून मागितलेल्या जोगव्यासारखं
जळतानाही प्रकाश देणार्‍या दिव्यासारखं
माझं प्रेम...
आपल्या मधल्या एकमेव दुव्यासारखं...!

प्रकार: