मात

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दिवस ज्याला समजले ती कुट्ट काळी रात आहे
शह दिला मी वाटताना मीच खाल्ली मात आहे

वादळांना कोंडले नेहमीच मी माझ्या उरी
जग समजले मात्र माझी कोडग्याची जात आहे

डाव नियतीचाच झाला, खेळले जेव्हाही मी
आपले ज्यांना समजले त्यांनी केला घात आहे

तोडूनी बेड्या पळाले, वाटले सुटले आता
मान पण माझी अडकली अजुनही फासात आहे

विषय: 
प्रकार: