तुझ्या गोष्टी...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तुझ्या डोळ्यातल्या मिश्कील छटा
तुझ्या कपाळावरच्या अवखळ बटा
तुझं नजरेनेच बरंच काही बोलणं
नदीकाठी माझ्याबरोबर नि:शब्द चालणं

कधी बोलता बोलता तुझं भावूक होणं
माझ्या मनातलं सारं तुला ठाऊक होणं
तुझा मनस्वी बेभान जगण्याचा ध्यास
तुझ्या मनातली वेडी शब्दांची आस

माझ्या बंद पापणीला तुझ्या स्वप्नांची सय
माझ्या जगण्याला तुझ्याच साथीची लय
तुझ्या कविता थेट काळजाला भिडणार्‍या
तुझ्या सार्‍याच गोष्टी प्रेमात पाडणार्‍या ...!

प्रकार: