नाते

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

तुझ्यातून स्वत:ला सोडवू पाहते
आणि तुझ्यातच गुंतत जाते मी
सरली माया सारी तरीही
उगाच स्वप्ने पाहते मी

वाटेवरती आयुष्याच्या
निघून तू गेलास पुढे
रोज तरीही न चुकता
तुझी वाट पाहत राह्ते मी

कुणास ठाऊक भविष्यातले
कोण राहील कुणासवे
तू माझा अन् तुझीच मी हे
तरीही गाणे गाते मी

हातात माझ्या हात तुझा पण
दिलास दुसरा हात कुठे?
घट्ट धरून मग त्या हाताला
तेच समजते नाते मी!

विषय: 
प्रकार: 

खूपच सुन्दर लिहिले आहे, निमिशार्धात ते जगलेले क्षण पुन्हा एकदा जगलो, धावत जाउन तिला सामोरे व्हावे असे वाटले, पण .... कुठे जाउ ?