लिंगाणा
शिवसहस्त्र नामावलीतील 'चंद्रमौळी' या तेराव्या नावाचा महिमा अनुभण्याचा योग आला तो गेल्या वर्षीच्या माघ कृष्ण सप्तमीला.. सह्याद्रीच्या खांद्यावर ध्यानस्थ बसलेल्या लिंगाण्याच ते दुर्गम रुप म्हणजे तालमीतल्या मातीत रंगलेला मल्लंच जणू... त्याच्या कातील धारेवरिल चढाईतील जरब इतकी की, शड्डू ठोकत आव्हान देणार आखाड्यातला नरविरच भासावा... घोटीव शरिरबंधावर रुंद कपाळीचा कडा, वार्यालाही थारा न देणारा निमुळता माथा आणि त्यावर झळकणारी सप्त्मीची चंद्रकला... वाह!