व्यक्तिमत्व

व्यक्तिमत्व

'दर्शन' - श्रीमती बी. जयश्री यांच्या गायनाचा व मुलाखतीचा कार्यक्रम

Submitted by माध्यम_प्रायोजक on 25 June, 2014 - 05:59

उद्या, म्हणजे गुरुवार दि. २६ जून रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात ’दर्शन’ या एका अभिनव उपक्रमाची सुरुवात होत आहे. ज्येष्ठ कन्नड अभिनेत्री व गायिका श्रीमती बी. जयश्री यांचं गायन आणि नंतर श्रीमती ज्योती सुभाष व श्री. नासिरुद्दीन शाह यांनी त्यांची घेतलेली मुलाखत असा या उपक्रमातला पहिला कार्यक्रम आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. उमेश कुलकर्णी यांची ’अरभाट निर्मिती’, ज्येष्ठ अभिनेत्री श्रीमती ज्योती सुभाष यांची ’चैतन्यवेध’ आणि सातत्यानं उत्तमोत्तम नाटकं प्रे़क्षकांसमोर आणणार्‍या तरुण रंगकर्मींची ’नाटक कंपनी’ या संस्थांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

मायबोलिवर सर्वात हुशार कोन आहे ?

Submitted by Babaji on 20 June, 2014 - 13:57

इथ आल्यापासुण निट वाचतो आहे. बरेच जन माज्यापेक्षा हुशार आहेत. मिर्चि ताईंच्या धाग्यावर तर सगलेच हुशार लोक जमले अस्म वाटत. माज्यासारख्यांन्ना हे सगलं नवीन आहे. डोक्यावरुन जात आहे. पन यान्च्यापेक्षा पन हुशार लोक असतिलच. जुन्या लोकान्ना सर्वात हुशार कोन ते बरोबर माहित असल. एकच नसल तर दोन चार पाच सात धा काय असतिल त्यान्चि माहिति दिलि तर नविन लोकाना त्यान्च्याकडुन बरच काय काय शिकता येइल.

शब्दखुणा: 

दादा क्लिन : चक्रमव्ह्युह भेदला

Submitted by Babaji on 15 June, 2014 - 01:27

.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे

काय घडतंय मुस्लिम जगात - भाग १२ वा मगरेब देश; ट्युनिशिया, मोरोक्को, लिबिया आणि अल्जेरिया

Submitted by शबाना on 31 May, 2014 - 11:17

इजीप्तबरोबरच उत्तर आफ्रिकेतले इतर प्रदेश लिबिया, मोरोक्को, अल्जिरीया आणि ट्युनिशिया हे ही नावाला ऑटोमन साम्राज्याचे भाग होते, परंतु या प्रांतात इथल्या अधिकाऱ्यांचे, मनसबदारांचेच शासन होते. युरोपशी भौगोलिक आणि आर्थिक संलग्नता या प्रांतांची होती आणि त्याचेच रुपांतर नंतर युरोपीय वसाहतवादी देशांनी या प्रांतांना जोडून घेण्यात किंवा आक्रमण करून काबीज करण्यात झाले. वसाहतवादाचा यांचा अनुभव आणि नंतरचे राष्ट्रीय उठाव यातही बरेचसे साधर्म्य आहे. मोरोक्को पासून सुरुवात करूयात. मोरोक्को हा अटलांटिक आणि भूमध्य समुद्रकिनार्यांवर वसलेला बराचसा डोंगराळ आणि वाळवांटी प्रदेश.

द रिटर्न ऑफ नौटंकी! आप का क्या होगा?

Submitted by केदार on 27 May, 2014 - 10:55

तर एकदाच गंगेत घोड न्हाल अन केजरीवालांनी बॉन्ड भरला आणि ते जेल मधून बाहेर आले एकदाचे ! आणखी एक यु टर्न केजरीवालांनी मारला.

आता परत काही दिवसात आणखी एक नौटंकी सुरू होणार ह्याची खात्रीच जणू !

कुणावरही आरोप केल्यावर पुरावे द्यावे लागतात, हे त्यांना मुळी मान्यच नव्हते. मै केजरीवाल हूं, असे त्यांनी न्यायालयालाच त्या दिवशी सुनावले होते. न्यायालय म्हणाले की तुम्ही बॉन्ड भरा व निघा, तर ही पद्धतच चुकीची आहे (बॉन्ड वर परोल) आणि मी त्याविरोधात लढणार असे काहीसे म्हणून त्यांनी जेल मध्ये जाणे स्विकारले.

शब्दखुणा: 

शब्दावाचून संवाद साधणारे व्यंग्यचित्रकार - श्री. शि. द. फडणीस

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
4 वर्ष ago

शिवराम दत्तात्रय फडणीस, म्हणजे शि. द. फडणीस यांची व्यंग्यचित्रं बघत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. दिवाळी अंकांची मुखपृष्ठं, पुलं, चिंवी यांसारख्या लेखकांची अप्रतिम पुस्तकं, शालेय पाठ्यपुस्तकं यांतून शिदंची चित्रं घराघरांत पोहोचली. अनेकांना व्यंग्यचित्रांनी आकर्षून घेतलं ते शिदंच्या चित्रांमुळे. रोजच्या जगण्यातली विसंगती टिपणारे प्रसंग, निर्विष विनोद ही त्यांच्या चित्रांची बलस्थानं. व्यंग्यचित्रं ही नेहमी वेडीवाकडी असतात, त्यांत नेहमी बोचरी टीका असते, असे समज शिदंच्या चित्रांनी खोटे ठरवले.

प्रकार: 

इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन श्री नितीन गडकरी यांना क्लीन चिट

Submitted by नितीनचंद्र on 12 May, 2014 - 02:20

Nitin Gadkari.jpg

आत्ताच झी न्युजवर आणखी एक बातमी झळकली. आर.टी.आय कार्यकर्ते श्री सुमीत दलाल यांनी आर.टी.आय या अतर्गत श्री नितीन गडकरी यांची चौकशी प्रल्ंबित आहे का असा माहितीचा अर्ज फेब्रुवारी २०१४ मध्ये केला होता.

या संदर्भात आपला अर्ज बाद करण्यात आला आहे असे इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन कळवण्यात आले. हा अर्ज का बाद केला याचा खुलास इनकम टॅक्स डिपार्टमेंट कडुन केले गेला नाही.

प्रांत/गाव: 

सर्वात मोठा प्रज्ञाशोध

Submitted by नरेंद्र गोळे on 24 April, 2014 - 00:24

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध - बिगेस्ट टॅलँट हंट - असल्याचे सूचित करणारी एक (बहुधा हिरोची) जाहिरात दूरदर्शनच्या कुठल्याशा वाहिनीवर परवा पाहण्यात आली आणि विचारांचे एक मोठेच आवर्त मनात घोंगावू लागले. खरंच हा शोध आहे तसाच! म्हणूनच तो तशा प्रकारे लक्षात आणून देणार्‍या जाहिरात-संहिता-लेखकाचे (कॉपी-रायटरचे) मनःपूर्वक आभारच मानायला हवेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, प्रज्ञावंत उमेदवारांना, त्यांच्या मतप्रणालीचे समर्थन करणार्‍या पक्षांना, त्यांना मते देणार्‍या मतदारांना आणि एकूणच निवडणूक यंत्रणेला हा प्रज्ञाशोध असल्याची जाणीवच नसल्याचे दिसून येते.

एका 'सेक्युलर' कॉलेजाची गोष्ट

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

भारतातल्या प्रत्येक शहरात असतो, तसा अकोल्यातही एक महात्मा गांधी पथ आहे. मदनलाल धिंग्रा चौकातल्या बसस्थानकापासून जुन्या शहराकडे जाणार्‍या या रस्त्यावर शास्त्री मैदानासमोर एक उंच, मोठी आणि देखणी इमारत उभी आहे. ‘श्रीमती मेहरबानू कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्स’ अशी या इमारतीवर पाटी आहे. आत शिरलं की एक प्रशस्त जिना आणि समोर कोनशिला. या कोनशिलेवर अकोला गुजराती समाजानं ५ फेब्रुवारी, २००८ रोजी संमत केलेला एक प्रस्ताव कोरला आहे- ‘श्रीमती मेहरबानू ज्यूनिअर कॉलेज ऑफ सायन्स’ ही एक निधर्मी शिक्षणसंस्था आहे.

प्रकार: 

काय घडतंय मुस्लिम जगात ? भाग १०. आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU

Submitted by शबाना on 21 April, 2014 - 11:10

या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.

http://www.maayboli.com/node/48375
http://www.maayboli.com/node/48417
http://www.maayboli.com/node/48419
http://www.maayboli.com/node/48436
http://www.maayboli.com/node/48520
http://www.maayboli.com/node/48629
http://www.maayboli.com/node/48631
http://www.maayboli.com/node/48638
http://www.maayboli.com/node/48639
http://www.maayboli.com/node/48640

आंतरराष्ट्रीय पटलावर तुर्कस्तान आणि EU

Pages

Subscribe to RSS - व्यक्तिमत्व