गोकुळ
दान मोतीयाचं अस रानात सांडलं
भेगाळलं मन चिंब चिंब झालं
गाणं पावसाचं रिमझिम कानात वाजलं
एक झिम्माड सपान डोळ्यात साठलं
चारा मिळता हिरवा, गाय कपिला तुष्टली
राजा, सर्जानेही समाधानी डरकाळी दिली
कुस धर्तीची उजवे , पीक तरारुन आलं
झिम्मा फुगडी खेळत रान वाऱ्यावर डुलं
चांदण लेवून कणसं आभाळी गेली
दौलत कुबेराने रिती मळयावर केली
मोती पवळयाची रास अशी खळयात सांडली
चिंतातुर चेहऱ्यावर हास्य लकेर हिरवी ओली
घर गोकुळ अवघे
यशोदा ताक घुसळीती
लोणी श्रीधर चाखती
नंद कौतुके पाहती
आला आला ... अबे जाईल. नाही रे कसला जातोय, त्या खिडक्या कसल्या सपासप धुतल्या जातायत बघ, पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली. धावतोय, धावतोय लिफ्टकडे त्या काळ्यापांढर्या कॉरिडॉरमधून ... प्रेग्नंट बायकोच्या रूमकडे धावत जावं कोणी आतुर नवर्याने तसं धावतोय ... अजगरासारख्या रात्री श्वासांचा जड आवाज ... लिफ्टची खडखड ... आलो खाली. धाव त्या दारातून, सोड तो सेंट्रलाईझ्ड एसी. आणि मग तुम्हाला दिसतो तो पाऊस. चित्त्यासारख्या झेपा घेत येतोय च्यायला. पाण्यालासुद्धा धरतीची ओढ आहे. हा भिजण्याचा पाऊस नाही. तो सांगतोय तुला, बाजूला सर मुकाट, नाहीतर छिन्नविछिन्न करून टाकेन.
तो आणि ती जेव्हा
पावसात भिजतात
दोघांचीही मनं मोरासारखी
आनंदाने नाचू लागतात
त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून
ती चाखते गरम-गरम चहाची गोडी
तेव्हा तीच असते जगातली
सर्वात सुंदर जोडी
पावसात ते दोघं जेव्हा
एकाच छत्रीतून चालतात
निसर्गातल्या सगळ्याच गोष्टी
गुलाबी रंगात रंगतात
छात्रीमध्ये ते दोघे अजिबात
भिजलेले नसतात
पण प्रेमाच्या वर्षावात त्यांची
मने चिंब भिजलेली असतात
तिच्या थरथरणार्या ओठातून
शब्द फुटत नसतात
पण तिच्या नि:शब्द भावना
त्याला कळून चुकलेल्या असतात