भिजणे

पावसाविषयी असूया

Submitted by पाषाणभेद on 6 July, 2019 - 20:59

पावसाविषयी असूया

पाहून माझे खुप हाल झाले
पावसाने केले तुझे केस ओले

गवतावर पडताच पाऊल शहारले अंग
भान हरपले जगा विसरले भिजण्यात दंग

पाऊस फिका पडला थेंब पडताच गाली
तुझ्या केस झटकण्याने तुषार पडले खाली

ओली करून साडी पाऊस मातलेला
बरसतो पुन्हा झिम्माड तुझ्या अंगाला

गिरकी घेतली, उड्या मारल्या, हात पसरले
विषाद वाटला माझाच तु पावसाला कवेत घेतले

पाषाणभेद
०७/०७/२०१९

शब्दखुणा: 

चिंब चिंब ... टिंब टिंब ...

Submitted by भास्कराचार्य on 10 July, 2017 - 16:28

आला आला ... अबे जाईल. नाही रे कसला जातोय, त्या खिडक्या कसल्या सपासप धुतल्या जातायत बघ, पळ पळ लवकर ... लगेच काढ हेडफोन्स ... घे ती किल्ली ... चल खाली. धावतोय, धावतोय लिफ्टकडे त्या काळ्यापांढर्‍या कॉरिडॉरमधून ... प्रेग्नंट बायकोच्या रूमकडे धावत जावं कोणी आतुर नवर्‍याने तसं धावतोय ... अजगरासारख्या रात्री श्वासांचा जड आवाज ... लिफ्टची खडखड ... आलो खाली. धाव त्या दारातून, सोड तो सेंट्रलाईझ्ड एसी. आणि मग तुम्हाला दिसतो तो पाऊस. चित्त्यासारख्या झेपा घेत येतोय च्यायला. पाण्यालासुद्धा धरतीची ओढ आहे. हा भिजण्याचा पाऊस नाही. तो सांगतोय तुला, बाजूला सर मुकाट, नाहीतर छिन्नविछिन्न करून टाकेन.

विषय: 
Subscribe to RSS - भिजणे