अत्तर
------------------------------------------------
संध्याकाळची वेळ होती . राजू घराबाहेर होता. पोरांशी खेळत .मुलांचा आरडाओरडा चालू होता. खेळ रंगात आला होता.
त्याचे वडील तालुक्याच्या गावाला गेले होते. ते आले. येताना त्यांनी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या. त्यांच्या हातातली बंदाची पिशवी चांगलीच फुगलेली दिसत होती.
राजू तेरा- चौदा वर्षांचा होता . तो स्वतःला मोठा समजू लागला असला , तरी त्याचं पोरपण मध्येच उठून दिसायचं.वडिलांना येताना पाहून त्याने खेळणं सोडलं. तो पळत पळत त्यांच्या मागे आला.
गावात बालवाडी पासून ते डीएड पर्यंतच सगळं शिक्षण उपलब्ध होतं. पण तरीही मला माहीत नाही वडिलांच्या मनात काय आलं आन त्यांनी पहिलं मला पहिली ते चौथी बोर्डिंग, मौजे खामगाव नंतर पाचवी ते सातवी मौजे चारे आणि परत आठवीला तालुका बार्शी जिंदाबाद ! नशिबात आई-बाप हायेत तरी च्यामायला रांडंच पोर बोडकच ! मी सोलापुरी आणि शिव्या अस्सल कोल्हापुरी भले शाब्बास ! असोत , नाही म्हणलं तरी साला आनंद आणि दुःख एकाच वेळेस झालेलं. आनंदी या साठी कि तालुक्याचं ठिकाण , मोट्ठी शाळा , एका एका वर्गाला आठ आठ तुकड्या , नवा गणवेश , नवं दप्तर पण दुःख यासाठी कि परत बोर्डिंग ! मंझी बोडकंपन संपायलाच तयार नाही.
सांज थांबता दारात
तुझे आठवती बोल
शब्द शब्द सुगंधित
काय अत्तराचे मोल?
दरवळे दरवळ
माझी लवते पापणी
हुरहुर अनिवार
झुरे शुक्राची चांदणी
सांज ढळता ढळता
रात्र उलगडे अशी
होते कावरी बावरी
प्रीत जागते उशाशी
घेते मिटून पापणी
तुझी लागते चाहूल
जरा जडावता डोळे
पांघरते प्रीतभूल
तुझ्या भेटीचे अत्तर
रोज परिमळे इथे
नको विचारुस कधी
"माझी आठवण येते??"
मी मानसी
नमस्कार , माझ्या ईतर की कहानी या धाग्यावर नमुद केल्याप्रमाणे मी स्वत: प्युअर इसेंशियल तेलांपासुन बनवलेली अत्तरे सर्वांना खुपच पसंत पडतायत ती म्हणजे त्यांच्या गुणवत्तेमुळे. सुगंधही बराच वेळ दरवळत असल्याने अत्तरांचा खप वाढलाय, यासाठी मी उच्च दर्जाचा कच्चा माल वापरला आहे. तसेच या कच्यामालाचे औषधी गुणधर्मही आहेत. फ्रॅग्रन्स अॅंड फ्लेवर्स डेव्हलपमेंट सेंटर — कनौज (गव्हर्नमेंट आॅफ इंडीया) तुन ट्रेनिंग घेतल्याने सिंथेटीक आॅईल्स आणि नॅचरल इसेंशियल आॅईल यातील फरक कळु लागल्याने नैसर्गिक अत्तरे तुमच्यापर्यंत पोहोचवता आली. वरील अत्तरांच्या सर्व आॅर्डर्स पुर्ण केल्या.
वैशिष्ट्ये
सुगंधी सुगंधी मी.... वाह... परफ्युम , अत्तरचं नाव आलं की बर्याचजणी मोहरुन जातात.. त्यातली मी ही एक. पण बर्याच जणांचा यात वेगवेगळा चाॅईस असतो. कुणाला फ्लोरल आवडतो , कुणाला वुडी तर कुणाला मस्की. माझं आपलं एकच गणित.. छान वास म्हणजे
परफ्युम किंवा अत्तर. परफ्युम , डिओ खुप वापरले पण आताशा त्याची अॅलर्जी होउ लागली , ५-६ तासांनी काखेत खाज येउ लागते अल्कोहाॅल मुळे. मग बरं होईपर्यंत हाल.. काखेचे अन् जीवाचेही...
टपटप पडती धरणीवरती शुभ्रफुलांचे सडे
खुलून येते लख्ख चांदणे रिमझिम बरसते
हसू लागते फूल बहरते हिरव्या माळावरचे
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....१....
श्वासात दरवळते अत्तर मोहरत्या स्पर्शाचे
झुळूक गंधाची येते नंतर कळी उमलते
नदीत झरते जळात झुलतेे इंद्रधनु उमटते
जाहले इतकेच की, तिने आभाळ पाहिले ....२....
............... वैजयंती विंझे -आपटे
बासरीत श्वास तुझे, नाद तनातच माझ्या
भाव अंतरीचे तुझे, शब्द मनातच माझ्या
हा अबोल संवाद अंतराशी अंतराचा
दोघा वेढुन उरतो, गंध जणु अत्तराचा.......