ईतर की कहानी

Submitted by कविता१९७८ on 9 September, 2020 - 04:30

सुगंधी सुगंधी मी.... वाह... परफ्युम , अत्तरचं नाव आलं की बर्‍याचजणी मोहरुन जातात.. त्यातली मी ही एक. पण बर्‍याच जणांचा यात वेगवेगळा चाॅईस असतो. कुणाला फ्लोरल आवडतो , कुणाला वुडी तर कुणाला मस्की. माझं आपलं एकच गणित.. छान वास म्हणजे
परफ्युम किंवा अत्तर. परफ्युम , डिओ खुप वापरले पण आताशा त्याची अॅलर्जी होउ लागली , ५-६ तासांनी काखेत खाज येउ लागते अल्कोहाॅल मुळे. मग बरं होईपर्यंत हाल.. काखेचे अन् जीवाचेही...

पण परफ्युमचा मोह काही आवरेना !!! मग आठवलं अत्तर... कानामागे आणि मनगटावर रोलाॅन फिरवलं की सुगंधच सुगंध... वाह. पण त्यातही बरीचशी अत्तरे खुपच उग्र , एकदा आॅफीसमधे लावुन गेले , माझ्या पाठीमागे बसणार्‍या गृहस्थाला कुठल्याही वासाची अॅलर्जी , शिंकुन शिंकुन ते घरी गेले हाफ डे सुट्टी घेउन. आणी ते ही बंद झालं. आता काय करावं बरं???? अशा मनस्थितीत असताना अचानक डोक्यात एक विचार चमकला..आपण स्वत:च अत्तर बनवलं तर?????? वाह !!!! अत्तर असं बनवायला हवं जे माईल्ड असावं म्हणजे मला रोज वापरता येईल आणि कुणाला त्रासही होणार नाही. झालं ... माझ्या उत्साही मेंदुला खाद्य मिळालं... ते ही गुपचुप कारण घरच्यांना कळालं तर??? कारण मला प्रत्येक गौष्ट शिकायची हौस आणि घरातले बाकीचे अगदि निरुत्साही. मी एका क्षणाला इथे तर दुसर्‍या क्षणाला तिथे. मी माझी सर्व हौसमौज पुर्ण केली. माया परांजपेंचा ब्युटी पार्लरचा डिप्लोमा केला, मेंदीचा कोर्स केला , डिझायनर हॅंडबॅग्ज बनवायला शिकले , 200 कीमी प्रवास करुन ट्रेक आॅर्गनाईझ केले . रेकी शिकले , पाॅझिटीवीटीचे सेमिनार सुरु केले, फोटोग्राफी शिकले .... आणि घरच्यांचं उद्योगी मुलगी हे लेबलही लावुन घेतलं!

उद्योगी मन काही केल्या स्वस्थ काही बसेना , भरपुर अभ्यास केला. आणि २-३ टिपीकल अरोमा आणी ३-४ माझे स्वत:चे काॅम्पोझिशन असे ब्लेन्डस वेगवेगळ्या काचेच्या बाटल्यात बनवत ठेवले. आवश्यक इतके दिवस ठेवल्यावर एकदाच्या बाटल्या उघडल्या. वाह सुगंधी सुगंधी... पुर्ण घर दरवळु लागले...

दुसर्‍या दिवशी आॅफीसमधे घेउन गेले. मागच्या अॅलर्जीवाल्या गृहस्थाला काही सुगावा लागु न देता पाच सहा जणांच्या मनगटावर रोलाॅन फिरवले. संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या , कुणाला अत्तर माईल्ड वाटले तर कुणाला स्र्टाॅंग , तसंही प्रत्येक माणसाची सुगंधाबद्दलची आवड निवड वेगळीच असतो म्हणा.. अचानक मागच्या अॅलर्जीवाल्या गृहस्थाचं लक्ष गेले आणि मी दचकलेच.. आता हा काय गोंधळ घालेल या विचारात असतानाच तोच म्हणाला , मला नाही आला वास आणि मी व्यवस्थित आहे , हे ऐकताच माझा जीव भांड्यात पडला...

मैत्रिणीकडे रुद्राभिषेक होता , तिचे पंडीतजी बनारसचे , एक दिवस आधी तिने माझे अत्तर त्यांना दाखवले होते , त्यांनी लगेचच अगदि पुजेसाठी लागणार्‍या छोट्या अत्तराच्या बाटल्यांची आॅर्डर दिली आणी म्हणाले आपको एक दिन मै अपने पुजासामग्री के दुकानपे ले जाउंगा और उसको बोलुंगा ये ईतर की बाॅटल ईन्होने बनाई है, इसे कहते है ईतर , दो पैसे ज्यादा लो लेकीन अच्छी चीज बेचो. भगवान के चीज मे मिलावट मत करो.. वाह ऐकुनच खुप बरं वाटलं मला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख.
थोडे अजून लिहा कविता,
अत्तर बनवताना काय अनुभव आले, काय अडचणी आल्या यावरही लिहा.

मस्तच ग केपी
अत्तरांचे फोटोही येऊदेत सोबत

सध्या मुलाच्या नॅनी ने ग्रुह उद्योग चालू केला आहे रोल ऑन्सचा..त्यातले good vibes (rose based) आणि sweet dreams (Lavender based) खास आवडीचे! मला सुगंधी घरे,बाथरूम्स सुद्धा फार आवडतात..सो कुठेही गेले कि essential oils घेणे must असते.

छान लेख.. अत्तरांचे फोटोही येऊदेत सोबत -> ++१