शक्ती मिलमधील घटनेच्या निमित्ताने ....
या आणि अशा घटना आता सर्रास कानावर येऊ लागल्या आहेत. लोकांची मानसिकता, सिनेमा-टिव्हीचा तरूण पिढीवर होणारा परिणाम, झटपट पैसे, सुख मिळवण्याची लालसा, त्याकरता कसलीही चाड न बाळगता कोणत्याही थराला जाण्याची वाढत चाललेली प्रवृत्ती अशा अनेक घटक याला कारणीभूत आहेत.
कधी तर वाटतं स्त्रिया बलात्काराला न घाबरता गुन्हा नोंदवत आहेत त्यामुळे हे असले गलिच्छ मनोवृत्तीचे गुन्हेगार गुन्हा करायला घाबरण्याऐवजी गुन्हा करून त्या स्त्रीला मारूनही टाकतील. भयंकर त्रास होतो हे सगळं सतत वाचून......
१३ ऑगस्ट १९९३ - स्टॉकहोममधील नगर सभागृह एका देखण्या समारंभात रंगलं होतं. गेली कित्येक वर्षे नोबेल पुरस्कार समारंभाचं साक्षीदार असलेलं हे सभागृह्. सी. व्ही. रमणांनंतर ६३ वर्षांनी एका भारतीयाचा या सभागृहात स्वीडनच्या राजाच्या हस्ते सन्मान होत होता. ही भारतीय व्यक्ती म्हणजे जलतज्ज्ञ डॉ. माधव आत्माराम चितळे. चाळीसगावसारख्या एका छोट्याशा गावात डॉ. चितळे यांचा जन्म झाला. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हीलची पदवी प्राप्त करून चितळे यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला.
जीपीएस डिवाइस कुठ्ला चांगला आहे? खरंच उपयोग होतो का? ठाणे ते भोपाळ मोटार घेउन जायचे आहे. म्हणून चाउकशी
कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?
"एक अतिशय हुशार, होतकरू तरुण मुलगा आकाशात उंच उडायचं स्वप्न बाळगुन २००० किमी पेक्षा जास्त प्रवास करत देहरादूनला पोचला. भारतीय हवाई दलात पायलट व्हायचं हेच त्याचं स्वप्न होतं, बऱ्याच काळापासून मनात जपलेलं! आकाशात उंच उडायचं स्वप्नं! देहरादूनमध्ये भारतीय हवाई दलाची निवड समिती आज पंचवीस मुलांची मुलाखत घेणार होती. मुलाखतीतच त्याला जाणवलं की इथे आपल्या बुद्धीपेक्षा व्यक्तिमत्व, तंदुरुस्ती याला महत्व दिले जातेय. पंचवीस पैकी आठ मुलांची निवड झाली आणि तो नेमका नवव्या स्थानावर होता. हवाई दलात जाण्याची, आकाशात उंच उडण्याची त्याची संधी हुकली होती. निराशेने त्याला घेरलं.
मला इंटरनेट घ्यायचे आहे. घरच्या वापराकरता हवे आहे पण खालील गोष्टी असाव्यात.
१> fast speed
2> wireless network
3> good & uninterrupted service
4> reasonable price (as for home use)
या व्यतीरीक्त जर telecom service provider असेल तर चांगले. MTNL/ vodaphone वगैरे कसे आहेत?
यासाठी गा. पै. यांचे शतशः आभार. त्यांचे बघून (आणि त्यांनी हे कसे करावे ह्याबद्दल लिहिलेल्या एका प्रतीसादावरून मला ह्याची स्फूर्ती लाभली. )
सानी यांनी मला प्रश्न विचारला की प्रतीसादामधे आधीच्या प्रतीसादाची लिंक (अनुबंध) कशी देतात? त्यावर हे कसे करावे असे सांगणारा लेख लिहील्यास सर्वानाच याचा लाभ होयिल असे वाटले म्हणून ह लेखन-प्रपंच. सानी यांचे लेखनासाठी प्रवॄत्त करण्यासाठी आभार.
लोकहो,
त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.
सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.
स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००
०७०० :
माझ्याकडे सॅमसंग टॅब २ ७.० आहे. ज्याची अंतर्गत स्टोरेज कॅपॅसिटी ८ जीबी व बाह्य स्टोरेज कॅपॅसिटी १६ जीबी आहे. मी मुख्यतः या टॅबचा उपयोग ईबुक्स वाचण्यासाठी करते. कोबो व बुकगंगा हे दोन इबुक रिडर्स मी वापरते. हे दोन्ही रिडर्स टॅबचे इनबिल्ट स्टोरेज वापरत आहेत, जो ४.४९ जीबी दाखवत आहे. या दोन्ही रिडर्समध्ये भरपुर प्रमाणात ईबुक्स डॉउनलोड केल्यामुळे माझी इनबिल्ट स्टोरेज कॅपॅसिटी खुपच कमी झाली आहे.