हृदयविकार

हृदयसंवाद (१) : प्रास्ताविक व स्वागत

Submitted by कुमार१ on 8 October, 2023 - 23:18

सन 2018 मध्ये मी आपल्या संस्थळावर “ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’वर शिक्कामोर्तब“ हा लेख लिहिला होता आणि त्यावर चर्चाही झाली होती( https://www.maayboli.com/node/65025). त्यानंतर ऑगस्ट 2023मध्ये ध्यानीमनी नसताना मायबोलीकर पुरंदरे शशांक यांनी स्वतःच्या हार्ट अटॅकसंबंधी इथे(https://www.maayboli.com/node/83838#new)अनुभवकथन केले. त्यात त्यांनी ट्रोपोनिनच्या त्या लेखाचा जीवरक्षक म्हणून उपयोग झाल्याचे नमूद केलेले आहे.

विषय: 
शब्दखुणा: 

ट्रोपोनिन : ‘हार्ट अ‍ॅटॅक’ वर शिक्कामोर्तब

Submitted by कुमार१ on 15 January, 2018 - 23:36

आपणा सर्वांना शब्दरुपी तिळगूळ देउन सादर करीत आहे या लेखमालेतील ८वा लेख...
* * *

पहाटेचे पाच वाजलेत. तुम्ही मस्तपैकी साखरझोपेत आहात. नित्यनेमाने तुमच्या मोबाईलमधील गजर सकाळी साडेसहाला वाजणार आहे. पण आज अचानक फोनच्या रिंगने तुम्ही दचकून जागे होता. गजर झालाय की फोन वाजलाय या संभ्रमात तुम्ही फोन उचलता. पलिकडून एकजण घाईघाईत उत्तेजित स्वरात तुम्हाला सांगतो, “अरे, काकांना आत्ताच अ‍ॅडमिट केलंय, आयसीयूत ठेवलंय, तू लगेच निघ”. तुम्हाला त्याच्या परिस्थितीची जाणीव होते आणि तुम्ही तडक तिथे जायला निघता.

विषय: 

दार ठोठावून परतलो : भाग - ०१

Submitted by गामा_पैलवान on 1 August, 2013 - 10:07

लोकहो,

त्याचं असं झालं की अस्मादिक नुकतेच दार ठोठावून परतले. कुठचं दार म्हणून काय विचारता, अहो चक्क यमलोकाचं दार! तर मायबोलीवरील माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, शत्रूंनो आणि शात्रविणींनो (शब्द बरोबर ना?) गुरूवार दिनांक २५ जुलै २०१३ रोजी या नरदेहास हृदयाचा जोरदार झटका आला. एका डॉक्टराच्या शब्दात : You had a nasty and severe heart attack.

सुदैवाने हानी अत्यंत मर्यादित राहिली आहे. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काय झालं त्याची चक्ष्वैसत्यम समयरेखा देतो.

स्थळ : इंग्लंडमधील ब्रायटन येथील माझं घर
दिनांक : २५ जुलै २०१३ अर्थात आषाढ कृ ३ कलियुग ५११५
वेळ : सकाळचे ०७००

०७०० :

मेनोपॉज- ४ : शरीराला होणारे धोके - हृदयविकार

Submitted by रुणुझुणू on 19 June, 2012 - 03:11

.

भारतात (आणि संपूर्ण जगातच) आजच्या घडीला स्त्री आणि पुरूष दोघांमध्येही हृदयविकार हे मृत्युचे सगळ्यांत अग्रेसर कारण आहे !

अयोग्य जीवनशैली आणि मधुमेहाचे वाढते प्रमाण ह्यामुळे हृद्यविकाराच्या प्रमाणात दिवसेंदिवस आणखीनच वाढ होत आहे.

मेनोपॉजच्या वयापर्यंत स्त्रियांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण पुरूषांच्या तुलनेत बरेच कमी असते.
मेनोपॉजनंतर मात्र हे प्रमाण झपाट्याने वाढत जाते.

साधारण ६० व्या वर्षात स्त्री आणि पुरूष दोघांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण सारखे असते !

असे का घडते ?

उत्तर पुन्हा तेच.....इस्ट्रोजेनची कमतरता !

विषय: 

हृदयविकार का होतो?

Submitted by नरेंद्र गोळे on 26 January, 2011 - 21:10

श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. ह्या माहितीचा उपयोग सामान्यज्ञानापलीकडे करू नये. व्यक्तीपरत्वे वैद्यकीय चिकित्सा करवून घेऊनच उपचार घ्यावेत. हा लेख औषधोपचार अथवा आहार विषयक मार्गदर्शक सल्ला देणारा लेख नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. हे लेख ही माझीच अभिव्यक्ती आहे. इथे व्यक्त झालेली माहीती ही कुठल्याही पुस्तकाचे आधारे लिहावी असे प्रयोजन नाही. हे संदर्भलेखन नाही.

Subscribe to RSS - हृदयविकार