बेल वाजली.
तो बेडरूम मधून गडबडीत बाहेर आला आणि त्यानं दार उघडलं.
समोर जित्या उभा होता.
"आधी हे तुझं जॅकेट घे बाबा. खूप दिवस झाले नेलं होतं, त्यावरून तुझ्या वहिनीनं माझं किती डोकं खाल्लं सांगू.." - जित्या हसत म्हणाला.
"अरे आत तर ये.. बाबा आहेत आतमध्ये..थांब बोलावतो"
"हम्म.. तुमची स्वारी कुठे?"
"असंच बाहेर चाललोय जरा.." - जित्याला उत्तर देणं टाळत तो आवरण्यासाठी आतमध्ये निघून गेला.
दार वाजलं म्हणून काकूनं दार उघडलं. समोर सत्तर पंच्याहत्तर वय असणारी एक व्यक्ती उभी होती.
"ओळखलंस का मालती काकू? " तो हसून म्हणाला.
कापऱ्या हातानं काकूनं चष्मा लावला. पाठीचा कणा वाकल्यामुळे तिला त्याच्या उंच देहाकडे नीट बघतासुद्धा येत नव्हतं. तिनी नकारार्थी मान हालवली.
"काकू, मी शरद.. शरद सगरे, साताऱ्यात होतो तुमच्याकडे तीन वर्ष.. आता तरी आठवतंय का काही? "
काकूच्या डोक्यातल्या आठवणींची धावपळ सुरू झाली.
'शरद सगरे' हे नाव आज खूप वर्षांनी कानावर पडलं होतं. फक्त नाव नव्हे तर साक्षात ती व्यक्ती समोर उभी होती.
सखे इतके दिवस आपण घालवले सोबत
पण तुला नाही कळली माझ्या प्रेमाची कुवत!
आता तू तोडला माझ्याशी संबंध,
म्हणून घातले स्वतःवर निर्बंध!!
प्रिये तू आता एक काम करशील का.....
माहित आहे का तुला तुझ्यासोबत राहता-राहता!
मि घातला बराच पैसा खर्ची
आता माझ्या तोंडाला लागली आहे मिरची!!
त्यातले तू काही परत करशील का?
कॅन्टीन च्या समोस्याचे राहू दे
पण रेस्टॉरंट मधल्या पिझ्झाचे परत करशील का?
कोल्ड्रिं्स चे हवे तर राहू दे
पण पाइन ऍपल शेक चे परत करशील का?
प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?
१. जिम लावावी, बॉडी बिल्डींग करावे
२. कवी/ कवयित्री व्हावे
३. व्यसनी व्हावे
४. दुनियेला आग लावावी
कृपया नीट सल्ला द्या. विषय अत्यंत नाजूक व गंभीर आहे. पालतूगिरी करू नये.
( फालतू लोकांनी इकडे फिरकूच नये )
मला होईल तो होऊच दे तू त्रास आता
तुझ्यावाचून मी घेईन सारे श्वास आता...
तुझी जागा कुणाला मी कधी देणार नाही
मनाजोगा हवा आहे गळ्याला फ़ास आता
खर्या प्रेमामुळे आयुष्य़ जर बर्बाद होते
कसा ठेवू इथे कोणावरी विश्वास आता
जिथे जावे तिथे येतो थवा हा आठवांचा
नकोसा वाटतो एकांत या देहास आता
मुळाशी घाव तू घालून गेली काळजाच्या
पहा होणार नाते आपले खल्लास आता
जसा उद्धार सीतेचा कधी जाळात झाला
तसा होणार का उद्धार माझा खास आता...
पुन्हा नाही दिसायाचा तुला संतोष वेडा
प्रिये तू मोकळे हासून घे बिंधास आता...