प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?

Submitted by पाटलीण बोवा on 19 January, 2019 - 22:40

प्रेमभंग झाल्यावर काय करावे ?

१. जिम लावावी, बॉडी बिल्डींग करावे
२. कवी/ कवयित्री व्हावे
३. व्यसनी व्हावे
४. दुनियेला आग लावावी

कृपया नीट सल्ला द्या. विषय अत्यंत नाजूक व गंभीर आहे. पालतूगिरी करू नये.
( फालतू लोकांनी इकडे फिरकूच नये )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगीच रोनाधोना करून आत्मक्लेश करणे, कवी होऊन लोकांना पिडणे, जिम लावून लोकांचे खिसे भरणे व दुनियेला आग लावून अग्निशामक दलाला कामाला लावणे या आपल्या मूळ ध्येयाशी विसंगत गोष्टीत वेळ न घालवता पुढचे प्रेमपात्र हेरावे व आधीची स्ट्रॅटेजी बदलून नव्या स्ट्रॅटेजीने हल्ला करावा.

प्रेम वगैरे काही नसते हो, आकर्षण किंवा सवय असते.
साधनाजी सहमत आहे आपल्या कमेंट शी.
बस ट्रेन और लडकी(का) एक गयी दुसरी आती है..

>>>>> धागा काढायचा होता
प्रेमात धोका होऊन प्रेमभंग झाले की काय करावे>>>>>>>
समाधी घ्यावी!!!!!!

आधी प्रेमात उद्गारवाचक शद्ब कोणते उच्चारणार हे समजले म्हणजे व्यवस्थित सल्ला देता येईल ( मी फालतू किंवा पालतू नाही).
१. अगबाई
२. बरं बुवा
३. अगं बुवा
४ . अय्या
५. अरे
६. अय्यारे
७. इश्श
८. बाप रे
९. इश्शबा

जीवनातील विविध भंग आणि घात यांपैकी प्रेमभंग ही एक क्षुल्लक बाब आहे. तिला प्रचंडच ओव्हरहाइप केल्या गेलंय.
अशा क्षुल्लक बाबींकडे दुर्लक्ष करणे शिकावे.
प्रेमभंग झाल्यास काही दिवस रोज रात्री छान मसाला दूध जायफळाची पूड टाकून प्यावे आणि छान झोप काढून उत्साहाने कामावे लागावे. लक्षात येईल की आपल्याला स्वतःकडे द्यायला भरपूर वेळ आहे.
जिम लावावी, लायब्ररी लावावी, नवे मित्र मैत्रिणी मिळवावेत, वेगवेगळी आव्हाने स्वीकारावीत आणि पूर्ण करावीत खूप काही आहे आयुष्यात करायला.

तसेच हे गाणेही ऐकावे. एकेकाळी प्रेमभंग झालेल्या व्यक्तींना या गाण्याने बराच दिलासा दिलाय म्हणे, रिलीज झाले तेव्हा खूप गाजले होते.

मस्त बाईक काढावी, इच्छित स्थळ न ठरवता १०० १५० किमी रपेट मारून यावी. ४ ५ दिवस सलग केल्यास पाठ दुखायला लागते आणि माणूस प्रेम भंग वगैरे विसरतो.

प्रत्येक मराठी संस्थळावर धागा काढून सल्ला मागावा.
अवांतर: परवा स्पाईसजेटच्या फ्लाईटमध्ये, भारत मॅट्रिमोनीची चक्क जाहिरात केली त्यांनी निवेदन संपल्यावर. मार्केटिंगची हद्द झाली अगदी. Uhoh

भारत मॅट्रिमोनीची चक्क जाहिरात केली त्यांनी निवेदन संपल्यावर. मार्केटिंगची हद्द झाली अगदी. >>>>
नेहमी असते त्यांची! मात्र त्यांच्या छोट्या फ्लाईट छान वाटतात. नावंही मसाल्यावरून दिलेले असतात... तेजपत्ता, दालचिनी वगैरे!

उपाशी बोका, तुमच्याकडून याच अपेक्षा होत्या
किरणुद्दीन , ज्याला टिंगल सहन होते त्यानेच चेस्टामस्करी करावी.

उपाशी बोका, तुमच्याकडून याच अपेक्षा होत्या
किरणुद्दीन , ज्याला टिंगल सहन होते त्यानेच चेस्टामस्करी करावी.>>>>>>
सही पकडे!!!!!!!

पुढचे प्रेमपात्र हेरावे व आधीची स्ट्रॅटेजी बदलून नव्या स्ट्रॅटेजीने हल्ला करावा.
>>>>

आकर्षणाबाबत हे शक्य आहे.
प्रेम असेल तर अवघड आहे. ईतके सोपे नसते विसरणे आणि नवीन मुलाच्या/मुलीच्या शोधात निघणे...
कोणी फ्रस्ट्रेट होते, कोणी आत्महत्या करते, कोणी व्यसनाच्या आहारी जाते, कोणी डर वा अंजामचा शाहरूख खान बनते... कारण कभी हां कभी ना चा शाहरूख बनने सोपे नसते !

>>>>>>>>>>>हे शक्य आहे.
प्रेम असेल तर अवघड आहे. ईतके सोपे नसते विसरणे आणि नवीन मुलाच्या/मुलीच्या शोधात निघणे>>>>>>>
वा s s हा विचार खूप काही शिकवून जातो, घाईघाईत सल्ले देणाय्रांना!!!!

>>>>>>चा शाहरूख व्हावे.... सोपे आहे...>>>>>>मीच काय तो/ती मायबोलीवरील शहाणा/शहाणी म्हणून मिरवणाऱ्या परीस हे केव्हाही चांगले!!!

सोडून गेलेल्या प्रियकर/प्रेयसी मध्ये किती वाईट गुण होते त्यामुळे किती वाटोळे झाले /होणार होते हे लक्षात घेऊन खुश व्हावे.

मायबोली चा शाहरूख व्हावे.... सोपे आहे...
>>>>

कुठलाही शाहरूख होणे सोपे नाहीये.
मायबोलीचा शाहरूख होणे त्याहून अवघड.
एका म्यानात दोन तलवार नाही राहू शकत..

सोडून गेलेल्या प्रियकर/प्रेयसी मध्ये किती वाईट गुण होते त्यामुळे किती वाटोळे झाले /होणार होते हे लक्षात घेऊन खुश व्हावे.
>>>>>

जिथे प्रेम असते तिथे असे विचार मनात येऊच शकत नाही.
एकवेळ मैत्रीत हे शक्य आहे. कारण मैत्रीची व्याख्याच तशी आहे. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. मदत केली नाही तर मग तू कोण कुठला मित्र..
पण प्रेमात मात्र समोरून प्रेम मिळो न मिळो आपले प्रेम अबाधितच राहते. आणि राहावे. तरच ते प्रेम !

प्रेम ही एक उथळ भावना नाहीये मित्रांनो. जर कधी झालेच नसेल तर तुम्ही ते समजू शकत नाही. मी समजवू शकत नाही.

बस ट्रेन और लडकी(का) एक गयी दुसरी आती है..
>>>>

यात जे लडका लडकी म्हटलेय ते प्रेमाचे नाते नसून सेक्शुअल सॅटीसफॅक्शन मिळवायला ओपोजिट सेक्सची वा आपले जे सेक्शुअल ओरिएण्टेशन आहे त्यानुसार व्यक्ती मिळाली की गरज भागली या पठडीतील रिक्वायरमेंट आहे.

काही दिवस शोकमग्न व्हावे आणि विसरून जावे. पुढे चालावे. निसर्गाला सुद्धा हेच अपेक्षित आहे. बारावा विधी यासाठीच असतो. कि दु:ख विसरून लोकांनी पुढे जावे. प्रेमभंग वगैरे झालेल्यांनी सुद्धा अगदीच सहन होत नसेल तर बारावे वगैरे घालायला हरकत नाही. मित्रमैत्रीणीना बोलवा. गोडधोड करून खावू घाला. फोटो पूजा करा. कारण ती व्यक्ती आपल्याला मेल्यासारखीच असते. आणि पुढे चला. नवीन कोणतरी बघा.

Sambandh.jpg

हे प्रेमात पडणारे सुंदर चेहरे बघूनच का प्रेमात पडतात.
>>>>>

अहो तेच तर मी म्हणतोय, निव्वळ सुण्दर चेहरा बघून वाटणारे आकर्षण असेल तर ते त्या व्यक्तीपासून दूर जाऊन विसरता येते. पण प्रेम विसरणे अवघड असते.

माझे स्वत:चे प्रेम चेहरा रंगरूप वजन ऊंची वगैरे कुठलेही बाह्य सौंदर्य न बघता झाले आहे. आणि आजूबाजूला नजर टाकली तर अश्या कैक जोड्या दिसतील.

कारण प्रेम सौंदर्य बघून होत नाही तर आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो तीच आपल्याला जगातली सर्वात सुंदर व्यक्ती वाटते. मग ईतर जगाचे सौंदर्याचे निकष लावता ती काय कशी दिसते हू केअर्स Happy

कारण प्रेम सौंदर्य बघून होत नाही तर आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात असतो तीच आपल्याला जगातली सर्वात सुंदर व्यक्ती वाटते. +१११११११

काही दिवस शोकमग्न व्हावे आणि विसरून जावे. पुढे चालावे. निसर्गाला सुद्धा हेच अपेक्षित आहे.
>>>>>

निसर्गाला हेच अपेक्षित असते तर त्याने माणसाला फक्त मेंदू दिला असता. मन आणि भावना नाही.

एखाद्याला कोणाच्या आठवणी जगायला पुरेश्या असतील तर अश्यांना उगाच सहानुभूती दाखवू नये. त्यांना गरज नसते Happy

Pages