मीठ
मीठाचा वापर
रॉक सॉल्ट अर्थात शेंदेलोण आणि टेबल सॉल्ट अर्थात नेहमीचे आयोडीनयुक्त मीठ यापैकी स्वयंपाकात कोणते मीठ वापरावे..शेंदेलोण मीठावर कोणतीही प्रक्रीया न झाल्याने त्यातील पोटॅशिअम्,मॅग्नेशिअम हे घटक शाबूत राहतात, त्यामुळे ब्लड्प्रेशर काबुत ठेवायला मदत होते पण टेबल सॉल्ट मधे आयोडीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे आयोडीनच्या अभावामुळे होणारे रोग टाळता येतात अशी माहीती नेटवर वाचली पण नेमक कोणत मीठ खाव हे कळत नाहीये..गरोदर पणात तसेच ईतर वेळी कोणत्या मीठाचा वापर योग्य राहील? आहारतज्ञांनी प्लीज प्रकाश टाका..
दोडक्याच्या सालींची ओली चटणी
साहित्य : अर्धी वाटी दोडक्यांची सालं, अर्धी वाटी शेंगदाणे,अर्धी वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव,अर्धी वाटी कोथिंबीर,५-६ लसणाच्या पाकळ्या,थोडीशी कांदा व लसणाची पात,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,मीठ व एक चमचा लिंबाचा रस आणि चवीपुरती साखर
कृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वरील सर्व पदार्थ एकत्र करून थोडेसे पाणी घालून चटणी वाटून घ्या.
मका कणसाच्या दाण्यांची भजी
मेतकूट – एक झटपट तोंडी लावणे
मेतकूट – एक झटपट तोंडी लावणे
साहित्य : चार चमचे मेतकूट पावडर,ताक,चवीनुसार लाल तिखट,साखर व मीठ, फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग.
कृती: एका चीनी मातीच्या सटात (काचेचा बाउल किंवा स्टीलचे छोटे पातेलेही चालेल)चार चमचे मेटकूटाची पावडर घ्या,त्यात ताक घाला(हवे तसे पातळ करून घेऊन) व कालवून थोडावेळ मुरत ठेवा. थोड्या वेळाने त्यात चवीनुसार साखर,मीठ,लाल तिखट घाला व त्याचेवर तेलाची फोडणी घालून ढवळून घा.
भाजणीचे थालीपीठ
तांदळाच्या पिठाची ताकातील उकड
तांदळाच्या पिठाची ताकातील उकड
साहित्य : अर्धी वाटी तांदूळाची पिठी, कढिपत्त्याची १०-१२ पानं, चवीनुसार मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर,आंबटपणासाठी एक वाटी किंचित आंबट ताक,फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या तुकडे करून, एक चमचा आले-लसणाची पेस्ट
बटाट्यांच्या काचर्या
बटाट्यांच्या काचर्या
आयत्यावेळी कामे वेळात कोणती भाजी करावी असा जर प्रश्न पडला तर त्याचे एकमेव उत्तर म्हणजे बटाट्यांच्या काचर्यां ची भाजी हे होय. त्याचीच रेसिपी आज मी येथे देणार आहे.
साहित्य : माणशी दोन बटाटे,माणशी एक कांदा,चवीनुसार लाल तिखटव मीठ,फोडणीसाठी तेल,मोहोरी,हिंग,जिरे,हळद व ५-६ कढीपत्त्याची पाने.
“ देठी “ –आळूच्या देठांचे भरीत
वांग्याचे दहयातील भरीत
वांग्याचे दहयातील भरीत
साहित्य : भाजलेल्या एका मध्यम वांग्याचा गर (बलक) , एक मोठा बारीक चिरलेला कांदा , फोडणीसाठी तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे, चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे किंवा लाल तिखट , साखर , मीठ, जरुरीप्रमाणे दही , तीन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड असे कूट.