मीठाचा वापर

Submitted by कुसुमिता१२३४ on 17 December, 2015 - 06:03

रॉक सॉल्ट अर्थात शेंदेलोण आणि टेबल सॉल्ट अर्थात नेहमीचे आयोडीनयुक्त मीठ यापैकी स्वयंपाकात कोणते मीठ वापरावे..शेंदेलोण मीठावर कोणतीही प्रक्रीया न झाल्याने त्यातील पोटॅशिअम्,मॅग्नेशिअम हे घटक शाबूत राहतात, त्यामुळे ब्लड्प्रेशर काबुत ठेवायला मदत होते पण टेबल सॉल्ट मधे आयोडीन जास्त प्रमाणात असते त्यामुळे आयोडीनच्या अभावामुळे होणारे रोग टाळता येतात अशी माहीती नेटवर वाचली पण नेमक कोणत मीठ खाव हे कळत नाहीये..गरोदर पणात तसेच ईतर वेळी कोणत्या मीठाचा वापर योग्य राहील? आहारतज्ञांनी प्लीज प्रकाश टाका..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझे तरी मत मिठ कमीत कमी वापरावे... माझे मत शेंदेलोण च्या बाजुने आहे.... करोडो वर्षापुर्वीचे अस्ल्याने केमीकल्स कमी, जरी त्यात आयोडिन नसले तरी मी त्यालाच प्राधान्य देतो... आयोडिन दुसर्या पदार्थातुन मिळवु शकतो आपन......
कारण या शतकात मानवाने समुद्र फार प्रदुषित करुन ठेवला आहे... अगदी सा़खर कारखाण्याच्या मळि पासुन ते इतर उद्योगा पर्यंत.. पारा व अनेक घातक केमीकल्स समुद्रात सोडली जातात... आणि महा नगरांचा मानवि मैला दे़खील.... ... या कारणाने ते स्वच्छ.. सुध्द वाटत नाही... हे.मा.वै. म...

शेंदेलोण मीठ मी फळे वगैरेवर वरून शिवरायला वापरते. बाकी भाजीत, वरणात ते वापरल्यास मला आवडते तशी चव येत नाही हेमावैम. तिथे मला समुद्री मिठच लागते.

सायो, शोध सुविधा चालते गं आता.. काही दिवसांपूर्वी फक्त लाईन्स यायच्या, आता जुने धागे दिसतात.

मीठ म्हणून शोधल्यावर काही धागे सापडले. ते साहित्याशी संबंधित आहेत पण ते स्वयंपाकी साहित्य नाही.

मिठाला वाहलेला एक धागा दिसला. तो बीचा असल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी मिठाव्यतिरिक्त इतर माहितीही तिथे दिलेली आहे. अभ्यासकांनी जरूर शोध सुविधा वापरून तो शोधावा.

खडेमिठ साफ करून मिक्सरमध्ये बारीक करून तव्यावर थोडा वेळ गरम करते. त्यामुळे ते फॅक्टरी मिठासारखे फ्री फ्लोईनग होते. फक्त पावसाळ्यात मात्र ही मात्रा चालत नाही. ते आपसूक परत दमट होते. पण मी तसेच वापरते. टेबलावर वेगळे मीठ आम्हाला लागत नाही त्यामुळे फ्री फ्लोविंग नसले तरी चालते.

मी तर फक्त मायबोलीचेच नमक खाते. ऐसी मिपा वगैरे बघत पण नाही.
जुबां पे लागा नमक इश्क का हे गाणे ऐकू नये. भलभलते विचार येउन बीपी वाढते.

हिमालयन ख्डे मीठ मिळते ते घेते. पिंकीश कलरचे काही खास रेसीपीज साठी. नाहीतर टाटा नमक झिंदाबाद.
पण कंझं प्शन अगदी कमी. ५ ग्राम डेली.

मी तर फक्त मायबोलीचेच नमक खाते. ऐसी मिपा वगैरे बघत पण नाही.
जुबां पे लागा नमक इश्क का हे गाणे ऐकू नये. भलभलते विचार येउन बीपी वाढते.>>>>>>

Happy Happy Happy