दही-मिरची (झटपट तोंडीलावणं)
Submitted by योकु on 20 June, 2017 - 12:44
मेतकूट – एक झटपट तोंडी लावणे
साहित्य : चार चमचे मेतकूट पावडर,ताक,चवीनुसार लाल तिखट,साखर व मीठ, फोडणीसाठी तेल,मोहरी,हळद व हिंग.
कृती: एका चीनी मातीच्या सटात (काचेचा बाउल किंवा स्टीलचे छोटे पातेलेही चालेल)चार चमचे मेटकूटाची पावडर घ्या,त्यात ताक घाला(हवे तसे पातळ करून घेऊन) व कालवून थोडावेळ मुरत ठेवा. थोड्या वेळाने त्यात चवीनुसार साखर,मीठ,लाल तिखट घाला व त्याचेवर तेलाची फोडणी घालून ढवळून घा.
बटाट्यांच्या काचर्या
आयत्यावेळी कामे वेळात कोणती भाजी करावी असा जर प्रश्न पडला तर त्याचे एकमेव उत्तर म्हणजे बटाट्यांच्या काचर्यां ची भाजी हे होय. त्याचीच रेसिपी आज मी येथे देणार आहे.
साहित्य : माणशी दोन बटाटे,माणशी एक कांदा,चवीनुसार लाल तिखटव मीठ,फोडणीसाठी तेल,मोहोरी,हिंग,जिरे,हळद व ५-६ कढीपत्त्याची पाने.