आरोग्य

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )

Submitted by केदार जाधव on 2 April, 2014 - 03:41

ही छोटीशी गोष्ट आहे एका आरोग्याबद्द्ल बर्यापैकी उदासिन असलेल्या चहाबाज माणसाने आपला दिनक्रम फारसा न बदलता , कसलीही औषधे ने घेता , जिमला न जाता , केवळ आहारावर नियंत्रण अन व्यायाम याच्या जोरावर १०५ किलोचे वजन ७७ किलो कसे केले (आणि त्याहीपेक्षा जास्त हेल्दी कसा झालो , वजन हा फक्त सहज मोजता येणारा एक पॅरामिटर आहे) याची .
हे लिहिण्याचा मूळ हेतूच जर मी करू शकतो तर तुम्हीही करू शकता आहे हे सांगणे आहे Happy

हा फोटो जरूर पहा Happy

PhotoGrid_1395201659110_1.png

विषय: 

लेंडीपिंपळीचा काढा..............एक किस्सा!(काढ्याच्या रेसिपीसह)

Submitted by मानुषी on 15 November, 2013 - 04:50

थोडी पार्श्वभूमि...........
माझ्या लहानपणापासून घरात व्यायाम आणि योग्य आहार यावरच भर असल्याने मीही साधारणपणे मुलांना याच सवयी लावल्या, किंबहुना त्या त्यांना लागल्या. जश्या आपापल्या आईच्या, घरात पूर्वापार चालत आलेल्या, बर्‍याचश्या गोष्टी आपण पुढे नेतो.
माझ्या मुलांना लहानपणापासून सर्दीखोकल्यावर लेंडीपिंपळी आणि इतर काही जिन्नस घालून केलेला काढा, पोट बिघडल्यावर बेलफळाचा मुरंबा, असंच काही देत आल्याने माझी लेक उसगावातही शक्यतो याचाच उपाय करते.

ग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 25 October, 2013 - 09:44

''आमचे उत्पादन पर्यावरणपूरक आहे.''

''आम्ही बनविलेले उत्पादन संपूर्णतः नैसर्गिक आणि पर्यावरणास कोणताही धोका न पोहोचविणारे आहे.''

अशा कित्येक जाहिराती आपल्याला टीव्ही, वर्तमानपत्रे, सोशल मीडियावर दिसत असतात. एखादे उत्पादन पर्यावरणपूरक आहे हे 'दिसल्या'वर आजच्या सुशिक्षित, सधन ग्राहकाचा त्या उत्पादनामधील रस वाढतो ही बाब उत्पादन करणार्‍या कंपन्या व जाहिरातदार नेमकी जाणून आहेत. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाची हानी, प्रदूषण इत्यादींबद्दल वाढती सतर्कता जशी ह्याला कारण आहे तशीच 'ग्रीन' किंवा 'पर्यावरणपूरक' उत्पादने खरेदी करणे हे सामाजिक प्रतिष्ठेचे समजले जाण्याची मानसिकताही त्यामागे आहे.

स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय !!!

Submitted by पियू on 15 September, 2013 - 12:51

प्रिय माबोकरांनो..

खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.

आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..

मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.

विषय: 

आगळे बंध योगाचे !!

Submitted by भ्रमर on 21 May, 2012 - 11:35

नमस्कार

मायबोलीकर कल्पु यांनी एक विपु लिहीली होती की योगाभ्यासामध्ये असलेल्या 'बंध' या विषयावर मला काही लिहीता येईल कां. त्यावेळी कामांची गडबड असल्याने वेळ नव्हता. थोडी उसंत मिळाल्यामुळे माझ्यापाशी असलेली माहिती आपणां सर्वांसमोर मांडतो आहे. ईतर जाणकारांनी देखिल यात आपली भर घालावी ही विनंती.

सुपरवूमन सिंड्रोम

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 April, 2012 - 02:15

काही दिवसांपूर्वी एक लेख वाचनात आला. त्यातील ''सुपरवूमन सिंड्रोम'' या शब्दाने माझे लक्ष वेधून घेतले. मग जालावर थोडी शोधाशोध केल्यावर या विषयाशी संबंधित पुष्कळ लेख मिळाले. बरीच अभ्यासपूर्ण माहिती वाचनात आली. उपयुक्त वाटली. त्याच माहितीचा सारांश येथे देत आहे.

बायका लिहा-वाचायला शिकू लागल्या, घराबाहेर पडून नोकरी-व्यवसाय करू लागल्या, स्वतंत्रपणे अर्थार्जन करू लागल्या.... पण त्यानुसार त्या करत असलेल्या घरातील पारंपारिक कामांमध्ये काही फरक झाला का?

आहारातून आरोग्याकडे..

Submitted by हेम on 21 March, 2012 - 12:07

ऑक्टो. २०१० मध्ये पावसाळ्यात बंद असलेलं जॉगिंग सुरु केलं तेव्हा वजन होतं ६५ किलो. साधारणपणे दररोज ६ कि.मी. आरामात धावणं व्हायचं. मार्चात उन्हाच्या चाहुली तिव्र व्हायला लागल्या की जॉगिंग थांबायचं. जेवणामध्येही बदल नाही. दरवर्षीचा हा सरासरी परिपाठ. आता डोंगर चढायचा खुळा छंद असल्याने, व हा सिझन भटकण्याचा असल्याने शारीरीक क्षमतेसाठी हे पाळावं लागायचं. ही क्षमता कमी पडली तर ट्रेकमध्ये 'बघणं' कमी व दमणं जास्त होतं. मार्चात जॉगिंग थांबवलं तेव्हा वजन झालेलं ६९ किलो... !!

खबरदरि आणि काळ्जी

Submitted by मेधा किरीट on 20 March, 2012 - 03:59

खबरदारी आणि काळजी - एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक आधी तर दुसरी नन्तर. आधी कोणती? अंड आधी का कोंबडी तस आहे हे!
आज मराठी माणुस जगभरात पसरलेला आहे पण पालक मात्र भारतात. त्यांची सेवा करावी असे वाटते पण जमत नाही . खास करून्अ म्हातारपणामुळे येणार्‍या दुर्बळतेचे काय? काळ्जी वाट्ते पन विचारपूस करण्या शिवाय हातात काही नसत.
पण मुलुंड पूर्व मध्ये रानडे काका या तरूणाने (वय ८०) व त्याच्याबरोबर् च्या सहकारी एक उपक्रम सुरू करत आहेत. काळ्जी पे़क्ष्या खबरदारी बरी.
स्वातन्त्रवीर सावरकर स्मारक मुलुन्ड च्या वतीने येथील सिनीयर सिटिझन्स चि काळ्जी घेण्यासाठि सन्स्थेचे सदस्य व्हा. एक प्रकारची विमा पॉलिसी.

गुलमोहर: 

अमराठी डॉक्टरांशी संवाद कसा साधावा?

Submitted by dhaaraa on 16 February, 2012 - 23:16

तसा हा प्रश्न आमच्यासाठी बराच जुना आहे. (एरवी 'मराठी लोकांचं हिंदी'सारखा टीपी करण्याचा विषय, पण यावेळी गंभीरपणे विचारतेय.)

अन्नभेसळ, अन्नसुरक्षा आणि आपण

Submitted by चंपक on 12 January, 2012 - 04:15

नुकताच मी खाद्य पदार्थांशी निगडीत व्यवसाय सुरु केला ! (त्याची निगडी प्राधिकरणात शाखा पण आहे!:)) खरे तर अपघातानेच. माझा एक मित्र एम. एस्सी. नंतर ग्लेनमार्क कंपनी मध्ये संशोधक म्हणुन नोकरी करत होता. पण ५ वर्षांचा नोकरी नंतर त्याला रुटीन कामाचा कंटाळा आल्याने तो नोकरी सोडुन गावी शेती करु लागला. मी भारतात परतल्यावर त्याची भेट घेतली तेंव्हा त्याने "नैसर्गिक्-सेंद्रिय शेती" (सेंद्रिय अन्न म्हणजे इंग्रजीत ऑर्गॅनिक फुड) बद्दल सांगितले. तो अन त्याचे सोबतचे शेतकरी असे जवळपास ३०० शेतकरी एका अध्यात्मिक गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. त्यांना पुरक म्हणुन श्री.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - आरोग्य