खरं तर गेली वर्षभर, मी दुखण्यामुळे घरातच नैराश्याच्या गर्तेत अडकून पडले होते. ज्या डॉक्टरांनी (डॉ. विनायक देंडगे, पुणे) मला या सगळ्यातून बाहेर काढले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांनी आणि डॉ. राजश्री लाड यांनी लिहिलेल्या अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी हा लेखनप्रपंच.
या धाग्याच्या सुरुवातीच्या अर्ध्या भागात मी माझा स्वानुभव आणि उरलेल्या अर्ध्या भागात पुस्तक परिचय मांडलेला आहे. कारण त्याशिवाय माझी हा धागा लिहिण्यामागे असलेली कळकळ तुम्हांपर्यंत पोचू शकणार नाही असे मला खात्रीने वाटते. असो.
गेल्याकाही वर्षात आरोग्य आणि पर्यावरण विषयी जागृती निर्माण सायकल, लोकांचा कल परत सायकल वापरण्याकडे होत आहे. शक्य तिथे दैनंदिन कामांमधे दुचाकीचा वापर टाळून सायकलचा वापर करायला हवा. अनेक जण अतिशय उत्साहाने आरोग्य, पर्यावरण वगैरे कारणांनी सायकल घेतात खरे पण नव्याचे नऊ दिवस सरल्यावर ती सायकल धूळ खात पडलेली दिसते. कारण रोजच्या कामाच्या रगाड्यात ती सायकल घेऊन अगदी अर्धा किमी जायला पण जिवावर येते. ऑफिस, कामाचे अंतर वगैरे अगदी ८-१० किमीच्या परिघामधे असले तरी १०-१२ तास काम करुन परत एवढे सायकलिंग करायचा कंटाळा येतो. अशा अनेक कारणांनी माझे स्वतःचेही सायकल घेणे लांबणीवर पडत गेले आहे.
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक घटक. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पितो. पृथ्वीवर सर्वत्र एकसारखे हवामान नाही. त्यानुसार माणसाची पाणी पिण्याची गरज वेगवेगळी राहते. अलीकडे काही वृत्तमाध्यमांतून रोज किती पाणी प्यावे यासंदर्भात काही विधाने वाचण्यात आली. वास्तविक निरोगी व्यक्तीने रोज किती पाणी प्यावे याची ठोस शास्त्रीय शिफारस नाही. तरीसुद्धा काही लोक, अमुक इतक्या प्रमाणाच्या वर पाणी पिऊ नका, त्याने मूत्रपिंडावर ताण येईल किंवा अजून अमुक-तमुक होईल, अशा स्वरूपाची विधाने माध्यमांमधून करीत असतात. त्यामध्ये शास्त्रीय तथ्य किती याचा आढावा या लेखात घेत आहे.
माणूस हा एक प्राणी आहे. जीवशास्त्रानुसार प्राण्यांचे प्रजाती आणि जाती ( Genus & Species) असे वर्गीकरण करतात. त्यानुसार माणूस होमो सेपिअन्स या कुळात येतो. ‘सेपिअन’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ ‘शहाणा’ असा आहे. सुमारे २४ लाख वर्षांपूर्वी या कुळाची निर्मिती झाल्याचे मानतात. तिथून पुढे उत्क्रांती होत माणूस आजच्या अवस्थेला पोचला आहे. मानवजातीच्या या अनोख्या इतिहासाचा विस्तृत आढावा युव्हाल नोव्हा हरारी यांनी त्यांच्या बहुचर्चित ‘सेपिअन्स’ या पुस्तकात घेतला आहे. हे विद्वान जेरुसलेम इथल्या विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत.
आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा
थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती
हॅलो मायबोलीकर , मला एक हेल्प हवी आहे
माझी रक्तातली साखर नेहमी जास्तच असते ,मला साखर कमी करण्यासाठी मार्गदर्शन हवंय, स्पेसिअल्ली इन्सुलिनविषयी