चला , वजन कमी करूया -- भाग २

Submitted by केदार जाधव on 16 April, 2019 - 01:55

आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा Happy

थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती Happy

१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )
https://www.maayboli.com/node/48355

चला , वजन कमी करूया

https://www.maayboli.com/node/50148

००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की

आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .

आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .

आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .

कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .

गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .

हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ? Happy

त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?

आणि आजपासून गुण मोजायला सुरू करू. फक्त एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.

कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू

रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे

जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण

त्यामुळे आता रोजचे गुण १०.

म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अ‍ॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अ‍ॅड करत जाईन .

काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल

आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा . Happy

२६.०४.२०१९

केदार जाधव ८८/१००
अतरंगी १०९/१२०
राजकूमारी ६/१०

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार १५ एप्रिल :

१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही ४/४

२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा) १/१
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे १/१
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो ०/१
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे १/१
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे १/१
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे १/१

टोट्ल ९/१०

मला वजन कमी करायचं नाहीए. गरज नाही.
पण वरच्यातलं २ आणि ३ सोडलं तर सगळं पाळलं जातं.
२ नियमितपणे होत नाही आणि ३ चं प्रमाण कमी आहे.
४ मध्ये डायजेस्टिव्ह / हाय फायबर बिस्किटं चालत असतील, तर तेही पाळलं जातंय.

मला वजन कमी करायचं नाहीए. गरज नाही.
पण वरच्यातलं २ आणि ३ सोडलं तर सगळं पाळलं जातं.
२ नियमितपणे होत नाही आणि ३ चं प्रमाण कमी आहे.
४ मध्ये डायजेस्टिव्ह / हाय फायबर बिस्किटं चालत असतील, तर तेही पाळलं जातंय.

>> भरत , २ ही महत्वाच आहेच , पण माझामते ३ कडे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ वेट लक्ष द्या अशी विनंती . दुर्दैवाने आपल्याकडे चपाती , बटाट्याची भाजी , भात अन शिकरण हे पूर्ण जेवण म्हणून चालत ,वरण , आमटी पित नाहीत जनरली , पण हे जेवण ९५% कार्ब्ज आहे . Sad
खर तर वरच्या उपायात नवीन किंवा वेगळ काहीच नाही , पण आपल्याला सगळ कळत पण वळत नाही , म्हणून प्रत्येक गोष्टीच अकाऊंट ठेवल तर चुका कमी होतात Happy

रोज इथे लिहीत जाईन, खूप छान धागा

आज माझी एकादशी आहे, बघू संध्याकाळपर्यंत किती प्लस मायनस होतात ते ....

मी ओवर वेट आहे, वजन कमी करायचे आहे.. वरील गोष्टी पाळल्या जाव्यात म्हणून कान उपटायला कुणीतरी हवं होतं खरंच...

रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , >>>>> हे नसते रोजच्या आहारात.उसळ केली तरी २ वाट्या खाऊ शकत नाही.हिरव्या भाज्या/ फळभाज्या जास्त खाल्ल्या जातात.आजपासून वरण प्याले पाहिजे.

१ वाटी हरबरा उसळ
१/२ वाटी तांदूळजा भाजी
काकडी टोमॅटो कोशिंबीर अर्धी वाटी
दूध्याची भाजी १/४ वाटी ( मूगडाळ घालून)
१.५ वाटी ताक

पोळी भात कटाप - हे मगाशी आं ब्याच्या ३ फोडी खाल्याचे पापक्षालन म्हणून Happy

नानबा ,

आंब्याच्या दिवसात १ आंबा नक्की खा, फक्त ३ ४ नको , अन साखर घातलेला अन फायबर (शिरा) काढलेला आमरस नक्की नको Happy

मी डाएट करत नाही . पण नवरा आणि साबा करतात . डाएट करणाऱ्या लोकांबद्दल मला खूप आदर आहे . खूप संयम आणि निग्रह असतो यांच्याकडे!
यात मी २ पैसे ऍड करू का ? करतेच >> मधल्या वेळी पटकन भूक भागवायला १ वाटी चुरमुरे / १ मूठ चणे /२ साधे खाकरे /शेंगदाणे गूळ/ यातले काहीतरी सोबत असू द्यावे .
उसळ करायला जमली नाही तरी कडधान्य शिजवून (जनरली मूग /मसूर पटकन शिजतात )त्यात खाताना १ टोमॅटो , (हवा असेल तर कांदा ), कोथिंबीर ,१ खाकरा चुरून , बाकी मीठ , मिरची /तिखट अशी भेळ करून खावी .
काहींना अजिबात तेल नको असेल तर कोशिंबिरीत शेंगदाणा कुटाऐवजी चणे /फुटाण्याचं कूट घालायचं

केदार तुम्ही पालेभाज्या लिहिले नाही.

वजन कमी करण्या साठी मी दीक्षित पद्धत वापरतोय. (त्यावर इथे चर्चा नको. खूप झालीय Happy )
नं १ सोडून बाकी सगळे दररोज पाळले जाते.
नं १ पण जेंव्हा करतो तेंव्हा चांगला करतो. Happy

हा धागा नेहमी वर राहिला तर बराच हुरूप येइल.

anjali_kool >> मस्त आहेत टीप्स . मारी बिस्किट (तीही प्रमाणातच ) हाही दुपारच्या ऊगीचच्या भुकेवर चांगला इलाज आहे . उगाच कुरतडत बसायच . Happy

केदार तुम्ही पालेभाज्या लिहिले नाही. > हो . फळ , भाज्या अस असायला हव होत

शेंगदाणे गूळ>>>> अरे हे चालेल का?चालत असेल तर मला पळेल. >
वजन कमी करणे हा हेतू असेल तर नाही . तसे दोन्ही घातक (जंक) नाहीत , पण कॅलरीज आहेत , चुर्मुरे , फुटाणे जास्त चांगले पर्याय आहेत

ओह!

वजन कमी करणे हा हेतू असेल तर नाही . तसे दोन्ही घातक (जंक) नाहीत , पण कॅलरीज आहेत , चुर्मुरे , फुटाणे जास्त चांगले पर्याय आहेत>>अगदी बरोबर
शेंगदाणे गूळ रोज रोज नाही चालणार आणि ज्या दिवशी खाणार तेव्हा प्रमाणात म्हणजे छोटी मूठ शेंगदाणे आणि सुपारी इतका गूळ .. चणे फुटाणे नसतील किंवा थोडा बदल हवा असेल तर

१६.४.१९

९/ १०

खरे तर १०/१० चे लक्ष्य होते पण साईट वर ऐन भुकेच्या वेळेस आलेले पकोडे आणि खारी पॅटिस पाहून मोह आवरला नाही......

16-04-2019
6/10
व्यायाम सोडून बाकी सर्व पाळले

मस्त धागा केदार आणि खूप मोटिव्हेटिंग.
माझं वजन दीड वर्षांपुर्वी 78 किलो झालं , 5.7 " ऊंची असल्याने आधी तेवढा खास फरक पडला नाही. पण ज्या वेळी दुकानात आवडलेला एक सुंदर ड्रेस मला झाला नाही व नेमका तोच ड्रेस मैत्रीणीला एवढा छान बसला तेव्हा कुठे तरी छोटासा धक्का बसलाच. परत दोन दिवसांत कपाट आवरतांना लक्षात आलं की आपले 75% छान छान कपडे आपण आज घालू ऊद्या घालू करून ठेवलेत कारण माझं वजन. त्या दिवशी ठरवले की काहीही करून वाढवलेले एक्स्ट्रा किलो ऊतरलेच पाहिजेत.

दुसर्‍या दिवसापासून सोडलेली पहिली गोष्ट साखर. चहा किंवा काॅफी साखरेशिवाय. महिना लागला सवय व्हायला.
दुसरे सोडलेले पदार्थ म्हणजे बिस्किटं, अगदी मारी, शुगर फ्री, टोस्ट, खारी सगळीच. आणि बेकरी पदार्थ.
विकतची लोणची , साॅस एरिएटेड ड्रींक्स बंद. अगदीच कधी गोड खायची हुक्की आली तर गुळाचे पदार्थ, तेही महिन्यातून एकदा. होटेलिंग महिन्यात एकदा. तिथे काय खाताय याच भान. डीप फ्राय गोष्टी वर्ज्य किंवा महिन्यात एकदा. रोज भरपेट घरचा नाश्ता, व घरचाच जेवणाचा डबा , भातासकट. रात्री चपाती किंवा भाकरी, भात भाजी किंवा आमटी जे असेल ते. रोज फळे, भाज्या व सॅलड मस्ट. 45 मिनिटे वाॅक रोज .
मधल्या वेळेत म्हणजे नाश्ता आणि दुपारचे जेवण याच्या मधे भुक लागली तर मोठा डबा सॅलडचा रोज नेते. संध्याकाळी चहा सोबत चणे मुरमुरे मिक्स किंवा चना सॅलड चाट. आता वजन 59 किलो आहे.

ओके मग ५९ म्हणजे योग्यच आहे. फार कमी नाही. ५-७" उंचीला ५९ किलो म्हणजे २०.४ येतोय BMI. ठीकच. मला वाटलं फार कमी आहे कि काय.

मागील एक वर्षात १८ किलो वजन कमी केले (९३ पासुन ७५)

सोमवार ते शुक्रवार चा प्लॅन
सकाळी १ वाटी नो फॅट योगर्ट आणी प्रोटिन बार किंवा दुध-पोहे किंवा मुसली-दुध (तेल -तुप, मीठ , तिखट वर्ज, दुधात साखर नाही, मुसली किंवा बार मध्ये थोडीशी साखर.)
ऑफीस मध्ये २ कप बिना साखरेची कॉफी,
दुपारी ऑफीस कॅटीन किंवा बाहेर जेवण
संध्याकाळी ६.३० वाजता वाटीभर उपमा, पास्ता , मॅगी किंवा ओट्स , एक सफरचंद किंवा संत्री.
रात्री काही नाही.

शनिवार -रविवार
सकाळचा नास्ता नाही दोन वेळा घरी जेवण, तेल -तुप याचा वापर कमी. दोन वेळा चहा किंवा कॉफी. सगळ्याबरोबर चहा -कॉफी घेताना थोडी साखर. रात्रीचे जेवण ८ च्या आत.

व्यायाम फक्त ३ दिवस शुक्रवार, शनीवार आणि रविवार :
दररोज ८ किमी पळणे : ~१ तास आणि ४ किमी ब्रिस्क वॉक : ~३५ ते ४० मिनिटे.
कधी कधी न पळता स्विमिंग पुल मध्ये १ तास .

प्रोग्राम ठरवताना अर्धा किलो किंवा आठवड्याला २००० कॅलरीज कमी करायचे ध्येय होते. रोजचे कॅलरी खर्च होतात त्यानुसार रोजचा डायट ठरवला. किती कॅलरी खर्च होतात ते फिटबिट वरुन ठरवले आणि किती कॅलरी पोटात जातात यासाठी गुगलची मदत घेतली.
दर सहा ते आठ आठवड्यानंतर एक आठवडा सुट्टी . मनाला जे वाटेल ते करायचे . यात काहीही कधीही खाणे, व्यायाम नाही. या काळात अर्धा ते एक किलो वजन वाढते. ( ब्रेक न घेता वजन कमी केले असते तर एका वर्षात २६ किलो वजन कमी झाले असते).
एकदा का वजन ७० किलो झाले की प्रोग्राम बदल्याचा विचार आहे. नवीन प्रोग्राम आजुन ठरवला नाही. नवीन र्पोग्राम मध्ये ७० किलो च्या आसपास वजन ठेवण्याचा प्लॅन आहे.
दिवेकर चे पुस्तक वाचले होते, दिक्षिताचा प्लॅन पण ऐकला होता पण माझा वजन कमी करण्याचा प्लॅन स्वताच बनवला. एकावे जनाचे करावे मनाचे Happy

Pages