आधीचा धागा एडीट करता येत नाही , म्हणून हा नवीन धागा
थोडी पार्श्वभूमी ? (Background) हवी असल्यास खालील धागे पहा ही विनंती
१०५ किलो ते ७७ किलो एक प्रवास (माझे वजन कमी करण्याचा प्रयोग )
https://www.maayboli.com/node/48355
चला , वजन कमी करूया
https://www.maayboli.com/node/50148
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
आजपासून मी डाएट करणार ... रोज १ तास चालणार ... नक्क्की म्हणजे नक्क्क्की
आज मित्राच्या वाढदिवसाची पार्टी आहे , एक दिवस दाबून खाल्ल तर काय होतय , उद्या कव्हर करू .
आज खूप उशिर झाला उठायला , आज फिरण कॅन्सल .
आज घरी पुरणपोळ्या केल्या होत्या , पाच हाणल्या .
कित्ती हा पाऊस , आज राहू दे फिरायच .
गेले १ महिना वजन कमी करायचा प्रयत्न करतोय , पण १ किलोही कमी झाल नाही , जाऊ दे , ये अपने बसकी बात नही .
हे चित्र अनेकांच्या बाबतीत सारखच असत .
वजन कमी करायच असणार्या सगळ्यानाच इच्छा तर खूप असते , सुरूवातही बर्याचदा केली जाते , पण नंतर नंतर आता जाऊ दे , आपल्याच्यानं नाही होणार हे वर गाडी येते . हे टाळायच असेल तर एक तर मनावर संयम हवा किंवा कुणीतरी चेक ठेवणार हव . ते घरातील कुणी असेल तर सर्वोत्तम , पण आपल्याच माणसाला त्रास (?) कसा द्यायचा (उदा . त्याला आवडते पुरणपोळी असू दे , काल फार दमला होता तो आज राहू दे) म्हणून ते माणूस तुम्हाला सारख माग लागत नाही . आणि मग काय ?
त्यासाठी हा धागा . ज्याना ज्याना वजन कमी करायचय (हेल्दी वे , नो क्रॅश डाएट) त्यांचा इथे ग्रुप बनवूया .
प्रत्येकाने काय आज चांगल केल , काय चुकल याची रोज लिस्ट देऊया . चांगल करणार्याच अभिनंदन करू अन एखादा सारख चुकायला लागला त्याचे कान पकडूया , काही शंका असतील तर एकमेकाना विचारूया .
क्या बोलते भाई (और बहन ) लोग ?
आणि आजपासून गुण मोजायला सुरू करू. फक्त एक लक्षात ठेवा, इथे नाही लिहिले तरी तुमचे रोजचे गुण स्वतः लिहून ठेवा . एखाद दिवस काही नाही केल तर ०/१० . हे खूप महत्वाच आहे.
दर आठवड्याला ज्यांचे ७५% पेक्षा कमी असतील त्यांचे कान पकडण्यात येतील . शिक्षा काय ते नंतर सगळे मिळून ठरवू.
कोण किती चांगल करतय आणि कुणाचे कान उपटायचे आहेत हे ठरवण्यासाठी खालील पद्धत वापरू
रोज तुम्ही खालील बाबी कशा पाळता ते पाहा .
१ . रोजचा व्यायाम न चुकवणे (व्यायामाचा प्रकार अन वेळ प्रत्येकाने आपापल्या सोयीने ठेवा ) जे ठरवेल त्यापेक्षा थोडा कमी जास्त किंवा वेगळा झाला तरी चालेल . पण चुकवायचा नाही
२. रोजच्या आहारात २ फळे / फळभाज्या अथवा २ वेळा सॅलेड असणे (फळात केळ्/चिक्कू कमीतकमी ठेवा)
३. रोजच्या आहारात २ वाट्या मोड , डाळी , उसळी , सोया , कमी तेलाच पिठल/ झुणका (२ अंड्यांचा पांढरा भाग , चिकन किंवा फिश रोस्टेड , शिजवलेले किंवा फार कमी तेल , पनीर ) असणे
४. बेकरी प्रॉडक्ट्स न खाणे (एखादा ब्राऊन ब्रेड अन ४ मारी इज ओके) केक्स , चॉकलेट्स , शीतपेये ,मैद्याचे पदार्थ नो नो
५. बाहेरचे खाणे (ऑफिसामधले जेवण , नाश्ता वगळता) मोस्टली हॉटेलिंग टाळणे
६. रात्री ९ नंतर हेवी जेवण न घेणे अन जेवण व झोप यात किमान १:३० तास अंतर ठेवणे
७ चहा , कॉफी किंवा इतर पदार्थातून डायरेक्ट साखरेचा इनटेक ३ छोट्या चमच्यापेक्षा जास्त नसणे
जर व्यायाम नाही चुकवला तर ४ पैकी ४ गुण अन इतर सर्व क्रमांक पाळले तर प्रत्येकी १ पैकी १ गुण
त्यामुळे आता रोजचे गुण १०.
म्हणजे जर तुम्ही आज व्यायाम केला अन इतर क्रमांक नाही पाळला तर तुमचे ४/१० गुण . हे रोज लिहित जा . जर २-३ दिवसानी आला तर त्या दिवसाचे मिळून १२/२० किंवा १५/३० असे लिहा .
शक्य असल्यास आधीच्या गुणांमधे अॅड करून लिहा .
मी थोड्या अंतराने ते हेडर मधे अॅड करत जाईन .
काही शंका असतील तर विचारा . याचा फायदा म्हणजे तुम्ही किती कन्सिस्टंट आहात ते कळेल , अन इतरांचे पाहून हुरूप ही येईल
आणखी एक , ही काही स्पर्धा नाही , तेव्हा प्रामाणिकपणे आपले गुण लिहा .
२६.०४.२०१९
केदार जाधव ८८/१००
अतरंगी १०९/१२०
राजकूमारी ६/१०
०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
थॅंक्स भरत, बम्प अप करतेय.
थॅंक्स भरत, बम्प अप करतेय.
चांगली आहे यादी..
चांगली आहे यादी..
व्यायाम आणि आहार दोन्हींचा ट्रॅक ठेवायला
बहुदा २००६-७ दरम्याने. एक GM
बहुदा २००६-७ दरम्याने. एक GM डाएट म्हणून मी नवीन ऐकलेल. ऑफिस मध्ये दोघी तिघींनी केलेला.
७-८ दिवसांचा प्लॅन असतो
१ल दिवस - फक्त भाज्या
२ duwas- फक्त फळ
३ दिवस - भाज्या फळं
४ दिवस - केळी आणि दूध
५diwas- tomatoes Ani थोडासा भात
६ दिवस -
७ दिवस
आणि विशिष्ट पद्धतीने बनविलेले सूप असते ते कितीही घेऊ शकतो.
आता इतक्या वर्षानंतर मला पूर्ण sequence आठवत नाहीये नीट. पण असच crash diet.
त्यात तुमचं वजन/ फॅट्स दोन्ही कमी होतात. पण तुमची भूकच खूप कमी होते. Don ek महिने तरी त्यात जातात पूर्ववत भूक लागायला.
खूप कठीण होत विशेषकरून केळी - दूध आणि tomatoes che diwas.
Won't recommend it to anyone... On त्यावेळी हे एकदम बेस्ट वाटलेल.
७-८ दिवसांचा प्लॅन असतो.
७-८ दिवसांचा प्लॅन असतो. त्यात तुमचं वजन/ फॅट्स दोन्ही कमी होतात. >>
मराठीत त्याला "पी हळद नी हो गोरी" प्लॅन असे म्हणतात.
छान धागा.
छान धागा.
४ दिवस - केळी आणि दूध>> अघोरी उपाय वाटतोय.
ते क्रॅश डायट अगदीच अघोरी वाटते मला..\अक्खा दिवस उसळच खा अन काय काय.
व्यायाम आठवड्यातून ४ दिवस (३/५- वीकडे, १/२- वीकेंड) असा केला तरी नियमित व्यायाम फायदे शरिराला मिळतात असे माझ्या फिटनेस ट्रेनर ने सांगीतले होते. रोज केला तर अ ति उत्तमच.
मागे माबो वर निरजा ने ४आठवडा अन्न तक्ता दिला होता. अजून ही माझ्या फ्रिज वर तो आहे. त्यात १ फळभाजी, पाले भाजी, मुग आमटी, तूर, कोशिंबीर वगैरे असे ओप्शन सकट सर्व आहे.
छान उपक्रम.
छान उपक्रम.
सर्वात वरच्या धाग्याची पारायणे झाली आहेत. हा धागा आणि याचा भाग १ आता वाचतोय.
तुम्ही अनेकांना प्रेरणा देताय हे चांगलं आहे.
एक सजेशन आहे, इथे मायबोलीवर अपडेट देणं नंतर कंटिन्यू राहणारे नाही. त्यासाठी एखादे अॅप किंवा एखादा गुगल ग्रुप असेल तर कळवा. एखादे चांगले अॅप सर्वांनी ठरवून डालो केले तर तिथेही ग्रुप बनवता येईल. फेसबुक पेज सुद्धा चांगला पर्याय वाटतो. जेणे करून ज्यांना फक्त या उपक्रमात रस आहे तेच तिथे भेटत राहतील आणि अपडेटस द्यायलाही वावगे वाटत नाही.
Pages