Submitted by मी चिन्मयी on 10 September, 2020 - 12:24
बाळंतपणानंतरचा एनिमिया नक्की का होतो? यावर आधीच एखादा धागा किंवा चर्चा झालेय का? असल्यास कृपया लिंक मिळावी.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
धागा वर काढतेय. माहिती
धागा वर काढतेय. माहिती असल्यास सांगा प्लिज.
चिन्मयी, ऍनिमिया आयर्न अन
चिन्मयी, ऍनिमिया आयर्न अन B12 च्या कमतरतेमुळे होतो. पण त्याचे निदान गरोदरपणात होते, तुमच्या डॉक्टर ने तुमची रक्त तपासणी केली नव्हती का? शिवाय आयर्न च्या गोळ्या देतात त्या ही खायच्या असतात. मुख्य म्हणजे ह्या गोळ्या खायच्या एक तास आधी अन दोन तास नंतर दुग्धजन्य पदार्थ खायचे नसतात. कॅल्शिअम अन आयर्न ची गोळी एकत्र खायची नाही, किमान तीन तासाचे अंतर राखायचे असते दोन्ही मध्ये
तुम्हाला काही त्रास होतो आहे
तुम्हाला काही त्रास होतो आहे का? पिल्लू कशी आहे?
पिल्लू अगदी छान आहे VB.
पिल्लू अगदी छान आहे VB.
मला डिलिवरी होईपर्यंत आणि अगदी झाल्यावर परवापर्यंत काही त्रास जाणवला नव्हता. थकवा, डोकेदुखी चालू होती पण ते जागरण आणि पिलूसाठीची धावपळ यामुळे असेल असं वाटलं. परवा अचानक असह्य डोकेदुखी सुरू झाली. अक्षरश: डोकं धरून गडाबडा लोळले. मग फॅमिली डॉक्टरकडे गेल्यावर बीपी १२०/१७० झाल्याचं कळलं. उभ्या जन्मात माझा बीपी कधी ९०/१२० ला टच झाला नाही. त्याखालीच असायचा. त्यामुळे डॉक्टरला शंका आलेय की हे कदाचित anemia चं लक्षण असावं.
ब्लड टेस्ट झाल्यात डिलिवरीच्यावेळी आणि आधीही. त्यात काही प्रॉब्लम दिसला नव्हता. कॅल्शिअम, आयर्नच्या गोळ्याही चालू होत्या आणि योग्य प्रकारे घेतल्या होत्या.
याबद्दल काहीच माहिती नाही म्हणून हा धागा.
चिन्मयी काळजी घ्या. जाईल
चिन्मयी काळजी घ्या. जाईल तेवढे खा प्या.
मग फॅमिली डॉक्टरकडे गेल्यावर
मग फॅमिली डॉक्टरकडे गेल्यावर बीपी १२०/१७० झाल्याचं कळलं. उभ्या जन्मात माझा बीपी कधी ९०/१२० ला टच झाला नाही. त्याखालीच असायचा. त्यामुळे डॉक्टरला शंका आलेय की हे कदाचित anemia चं लक्षण असावं.>>>
मग परत हिमोग्लोबिन चेक केलं का? आणि anemia कन्फर्म झाला का? आणि आता BP किती आहे?
anemia मुळे बीपी वाढणे आणि तेही एवढे हे पहिल्यांदा ऐकले, पण अर्थात मी काही वैद्यकीय क्षेत्रास संबधित व्यक्ती नाही. पण परत एकदा याची खात्री करून घ्या.
Anemia वर नाही, पण हिमोग्लोबिनवर डॉ. कुमार यांचा
हा धागा आहे.
तिथे त्यांना प्रश्न विचारू शकता.
बापरे. काळजी घ्या.आणि ताण कमी
बापरे. काळजी घ्या.आणि ताण कमी घ्या.
डॉक्टर च्या सल्ल्यानुसार सर्व करालच.कदाचित फेरी किंवा तसे एखादे वेगाने हिमोग्लोबिन वाढवणारे आयर्न आयव्ही पण सांगतील.किंवा नुसत्या गोळ्यांनी होत असेल तर गोळ्या.
मुख्य म्हणजे या सगळ्या साठी जे करावं लागेल(आहार,बाळाला सांभाळणे इ.)त्यात कुटुंबाची न लाजता, अपराधी वाटून न घेता मदत घ्या.आता काळजी घेतली तर नंतरचा त्रास वाचेल.
मुलीला दूध पाजत असाल तर पाणी,
मुलीला दूध पाजत असाल तर पाणी, रसीली फळे( नैसर्गिक स्वरूपात), सूप वगैरे घेताय का?
डॉक्टरांकडे नक्की जाच व ओपिनियन घ्या काय कांय रक्त-तपासणी कराव्या त्या.
बाळाला बघण्यात, मी पाणी खुपच कमी प्यायचे , माझी डिलीवरी झाल्याव्रची गोष्ट आअहे हि. दूधही बंद झाले.
मी पाणी खुप कमी प्यायचे, तेव्हा डिहाय्ड्रेशनने असे डोके दुखायचे , मग नुसते ज्यास्तच पाणी प्यायला लागले तर उल्ता त्रास..
उकडलेलं बीट, काकडी, वर चिरलेली कोथींबीर असे मी रोज खायचे. ईलेक्ट्रोलाईटस बॅलेंस व्हायला मदत होते.
सूप, फळे, शहाळं असं घ्यायला लागले तर बरं वाटले.
तर , जर हा त्रास तुम्हाला डिहायड्रेशन मुळेच , असे निदान झाले असेल तर, करून बघा . पण नक्कीच चांगल्या, डॉक्टरकडे जावून चेक करा.
मग परत हिमोग्लोबिन चेक केलं
मग परत हिमोग्लोबिन चेक केलं का? आणि anemia कन्फर्म झाला का? आणि आता BP किती आहे?
anemia मुळे बीपी वाढणे आणि तेही एवढे हे पहिल्यांदा ऐकले, पण अर्थात मी काही वैद्यकीय क्षेत्रास संबधित व्यक्ती नाही. पण परत एकदा याची खात्री करून घ्या.>>>>>>> सहमत.
डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या घ्या.आहारात लाल भाज्या,बीट्,खजूर्,टॉमेटो खात चला.रक्ताल्पता भरून येते.व्हिक्टोफॉलचे सिरप्/टॅब्लेट्स् फक्त आणि फक्त डॉक्त्टरांना विचारून घ्या.
वर्णिता, मानव, मी अनू, झंपी,
वर्णिता, मानव, मी अनू, झंपी, देवकी...धन्यवाद. तुम्ही लिहिलेल्यापैकी काही गोष्टी करतेय, काही नाही.
बाळाला बघण्यात, मी पाणी खुपच कमी प्यायचे , माझी डिलीवरी झाल्याव्रची गोष्ट आअहे हि. दूधही बंद झाले.>>>> असंही असू शकतं. तिच्यामागे २४ पैकी १८ तास जातातच. बाकी सहा तास विखुरलेली झोप गोळा करण्यात जातात.
उद्या सांगेल डॉक्टर ब्लडटेस्टची गरज आहे की नाही.
मला याप्रकाराची अजिबातच माहिती नव्हती. त्यामुळे आधी विचारावंसं वाटलं.
गुगलवर लक्षणं टाकून काय होतं ते सर्च केलं तर भलभलते रोग दिसतात. एका ठिकाणी तर टर्मिनल ब्रेन ट्युमर शब्द दिसला. मग गप्प बसले.
इथे जाणकार लोक आहेत, काही लोक अनुभवी आहेत, त्यामुळे इथे विचारलं.
चिन्मयी, असा डोकं दुखण्याचा
चिन्मयी, असा डोकं दुखण्याचा त्रास मलाही पहिल्या डिलिव्हरीनंतर बाराव्या दिवशी झाला होता.
झालं असं की सी-सेक्शन चालू असतानाच माझं बीपी अचानक प्रचंड वाढलं आणि तेव्हाही प्रचंड डोकं दुखलं. दुखलं म्हणण्यापेक्षा खूप जोरात दाबल्यासारखं झालं. तेव्हा डॉक्टरांनी लगेच उपचार करून बीपी खाली आणलं. मग डिलिव्हरी झाल्यावर थोड्या वेळाने मला कन्व्हल्जन आलं. त्यातून मी बाहेर आले आणि मग काही त्रास झाला नाही. बीपी मात्र जास्त होतं. त्यासाठी त्यांनी गोळ्या दिल्या. मग घरी गेल्यावर एक दिवशी रात्री मी ती गोळी घ्यायची विसरले. आणि मग सकाळी जी जाग आली ती डोकं प्रचंड दाबल्यासारखं दुखल्यामुळेच. तेव्हा मला आठवण झाली आणि बीपीची गोळी घेतली. तरी डोकं दुखायचं थांबेना. मग डॉक्टरांना विचारून क्रोसिन घेतली. तरी काही फरक नाही. शेवटी डॉक्टरांकडे गेलो. बीपी तपासलं तर १४०/९० असं काही तरी होतं. डॉक्टरांच्या मते हे काही खूप जास्त नाही. पण ते कदाचित सकाळी गोळी घेतल्यानंतर कमी झालेलं असेल. मुळात जास्त वाढलेलं असणार. पण डोकं मात्र दुखत राहिलं होतं. मग त्यांनी शिरेतून काही औषध दिलं आणि अखेर डोकेदुखी थांबली. मग मात्र मी बीपीची गोळी कधीच विसरले नाही. Postpartum eclampsia असं म्हणतात बहुतेक याला. दोन तीन महिने बीपीची गोळी घ्यावी लागली होती. मग थांबली. नंतर हा त्रास कधी झाला नाही. दुसऱ्या डिलिव्हरीच्या वेळी मला याची काळजी होती. पण तसं काही झालं नाही दुसऱ्या वेळी. डॉक्टरही सावध होत्या, पण अगदी सुखरूप पार पडलं.
दोन्ही प्रेग्नन्सींंमधे माझंही बीपी कमीच असायचं. पार अगदी १००/७२ वगैरे.
जर वेगळे आयर्न पदार्थ खायला
जर वेगळे आयर्न पदार्थ खायला प्यायला वेळ नसेल तर बसल्या जागी खाता येईल असे ड्राय ब्लुबेरी, साधे फुटाणे(शक्यतो मीठ नसलेले), साळीच्या लाह्या, गूळ दाणे, खजूर असे जवळ बाळगून पाहिजे तेव्हा खाता येईल.(अर्थात डॉ ना विचारून.)
बाळ लहान असताना जर फार मदत नसेल तर कधीकधी केस विंचरण्या इतकाही वेळ मिळत नाही.
लवकरच ही फेज थोडी स्टेबल होऊन तुम्हाला थोडी विश्रांती मिळेल. हँग इन देअर.
खजूर>> त्यात काळ्या खजुरात
खजूर>> त्यात काळ्या खजुरात अधिक लोह. + काळ्या मनुका.
खजूर>> त्यात काळ्या खजुरात
खजूर>> त्यात काळ्या खजुरात अधिक लोह. + काळ्या मनुका. >>>> आलूबुखारा (dried plums/pitted prunes) पण विसरू नका खायला या बरोबर .
बाजरी, शेवग्याच्या शेंगांचे
बाजरीची भाकरी, शेवग्याच्या शेंगां उकडून, किंचित मीठ टाकून त्याचे पाणी याने पण रक्तवाढीला मदत होते.
बाळाला सांभाळतांना तुम्हांला स्वतःला पण सांभाळायचे आहे. काळजी घ्या एवढेच म्हणू शकते सध्या तरी!
रक्त क्षयावर साधा गावठी व
रक्त क्षयावर साधा गावठी व तरीही शास्त्रीय उपाय
1. गूळ खाणे
2. पालाभाजीला लोखंडी तवा वापरणे , नॉनस्टिक तवा बंद
होमवर्क : MBBS pediatric oral
गूळ व साखर दोन्ही उसापासून बनतात , पण गुळात भरपूर लोह असते व साखरेत अजिबात नसते , असे का ?
उत्तर - कारण गुळासाठी रस मोठ्या लोखंडी काहिलीत उकळतात. साखर निर्मितीत फक्त शर्करा स्फटिक फिल्टर करून घेऊन उरलेले सर्व फेकून देतात.
आता पालाभाजी लोखंडी तवा लॉजिक लावा
डाळींब रक्त वाढवतं
डाळींब रक्त वाढवतं
2. पालाभाजीला लोखंडी तवा
2. पालाभाजीला लोखंडी तवा वापरणे , नॉनस्टिक तवा बंद
+१
रोज एक भाकरी आणि लोखंडी तव्यातली पालेभाजी खायची. त्यासारखे लोह वाढवणारे दुसरे काही नाही. मला pregnancy मध्येच हा शोध लागला.
वावे..तुमच्या मार्गावर चालतेय
वावे..तुमच्या मार्गावर चालतेय मी. Postpartum Hypertension चं निदान झालंय फॅमिली डॉक्टरकडून. नेमका माझा गायनॅक available नाहीये पुढचा आठवडाभर. दुसरा डॉक्टर शोधणे म्हणजे 'अ' पासून सुरूवात. रिपोर्टस् करायचे तर अख्खा दिवस खर्ची घालावा लागतो. तेवढा वेळ बाळ घरी शांत राहणार नाही. काय करावं सुचत नाही.
डोकेदुखी, blur vision च संकट आहे.
पोस्ट पार्टम हायपेरटेन्शन आहे
पोस्ट पार्टम हायपेरटेन्शन आहे तर काळजी घ्या
डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या
डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेत रहा चिन्मयी. डोंट वरी. बीपी नियंत्रणात आलं की त्रास कमी होईल. फॅमिली डॉक्टरच आहेत तर दुसरे डॉक्टर कशाला शोधता?
म्हणजे स्पेशल गायनॅकची गरज
म्हणजे स्पेशल गायनॅकची गरज नाही का यासाठी? तसं असेल तर उत्तमच होईल. फॅमिली डॉक्टर जवळच आहे. फार गर्दीचाही प्रॉब्लम नाही. लवकर होईल ट्रीटमेंट. पण त्यानेच सुचवलं एकदा गायनॅकचा सल्ला घ्या म्हणून. पण ट्रीटमेंट दोन्हीकडे सेम होणार असेल तर मी फॅ. डॉकलाच निवडेन.
सद्ध्या बाळामागे दगदग होतेच, पण इतरही टेंशन्स आहेत. चिडचीड होतेय. आणि परिणामी परिस्थिती अजून बिघडतेय. मानसिक शांतता हरवलेय.
चिनू शक्य असेल तर .. एक दहा
चिनू शक्य असेल तर .. एक दहा मिनिटे ओंकार लाव.. मन शांत होईल.. चीड चीड कमी होईल.सगळे ठीक होईल .. काळजी घे स्वतःची आणि परीची..
म्हणजे स्पेशल गायनॅकची गरज
म्हणजे स्पेशल गायनॅकची गरज नाही का यासाठी? >> तुझे नेहमीचे गायनॅक नाहीयेत म्हणालीस म्हणून म्हटलं की नवीन डॉ. शोधू नको. फॅमिली डॉ आहेतच ना... तुझे नेहमीचे गायनॅक आले की त्यांचा सल्ला घेच.
माझी डिलिव्हरी ज्यांच्याकडे झाली होती त्या डॉ. नव्हत्याच मला त्रास झालेला तेव्हा. मीही फॅमिली डॉ कडेच गेले होते मग. पण ते दोघे डॉक्टर आहेत आणि मिसेस डॉ. गायनॅकच आहेत. फक्त वय झाल्यामुळे सीझर करणं त्यांनी बंद केलं होतं. म्हणून डिलिव्हरी वेगळ्या डॉ. कडे केली होती.
सद्ध्या बाळामागे दगदग होतेच, पण इतरही टेंशन्स आहेत. चिडचीड होतेय. आणि परिणामी परिस्थिती अजून बिघडतेय. मानसिक शांतता हरवलेय.>> हो, समजू शकतं. प्रायॉरिटी स्वत:च्या आणि बाळाच्या तब्येतीला दे. बाकी टेन्शन्स इतरांसाठी सोड. इतर कसलाही विचार सध्या महत्त्वाचा नाही.
चिन्मयी, बरी आहेस ना आता? इथे
चिन्मयी, बरी आहेस ना आता? इथे लिहिलं पाहिजेस असं नाही. आठवण झाली म्हणून विचारलं.
वावे, आता तब्येत बरी आहे.
वावे, आता तब्येत बरी आहे. Postpartum hypertension डिटेक्ट झालं तसंच हृदयाच्या आवऱणाला थोडी सूज असल्याचं पण कळलंय. Left Vertricular hypertrophy असं आलं इसीजीमधे. बाकी ब्लड रिपोर्टस् नॉर्मल असल्याने काळजीचं कारण नाही असं डॉक्टरने सांगितलंय. बीपी जैसे थे असल्याने फक्त बीपीची गोळी चालू केलेय. काही महिने ती घ्यावी लागेल.
मी चिन्मयी, काळजी घे. तुला
मी चिन्मयी, काळजी घे. तुला शुभेच्छा.
माझा ईसीजी काढला नव्हता,
माझा ईसीजी काढला नव्हता, त्यामुळे हा प्रॉब्लेम मला होता की नाही ते माहिती नाही. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या घेत रहा. टेक केअर.
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन पिल्लुची पण
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन पिल्लुची पण .....+1.
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन
चिन्मयी काळजी घ्या तुमची अन पिल्लुची +1111
thank u मी-अस्मिता, वावे, VB,
thank u मी-अस्मिता, वावे, VB, देवकी, किल्ली. काळजी घेतेय.
चिन्मयी काळजी.. घे स्वतःची
चिन्मयी काळजी.. घे स्वतःची आणि परीची.. वेळच्यावेळी..गोळ्या घे.. भरपूर खा. आणि शक्य तितका आराम कर..
हि फेज महत्वाची आहे..स्वतःची
हि फेज महत्वाची आहे..स्वतःची काळजी घ्या, म्हणजे बाळाची पण घेता येईल.
विश्रांती घ्या. कामे पडलीत आणि मी झोपलेय असे वाटू देवू नका. एक जीव सांभाळणं फार कठीण असते. त्यामुळे मनात गील्ट येवू देवू नका. स्वतःच्या तब्येतीला सांभाळून कामे उरका.
vविश्रांती घ्या. कामे पडलीत
vविश्रांती घ्या. कामे पडलीत आणि मी झोपलेय Sad असे वाटू देवू नका. एक जीव सांभाळणं फार कठीण असते. त्यामुळे मनात गील्ट येवू देवू नका. स्वतःच्या तब्येतीला सांभाळून कामे उरका. +१११११११
Njoy the phase