व्यसनमुक्ती
योगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग ३ - डॉ. वैशाली दाबके
तुम्ही पहिल्यांदा कधी घेतली?
अनेक लोक दारु पितात, सोडण्याचा संकल्प करतात, काही सोडतात तर काही सुरु ठेवतात. तर काही लोक दारु न पिताच ती न घेण्याचा संकल्प करतात.
तर तुम्ही दारुला हातही लावणार नाही अशी शपथ पहिल्यांदा केव्हा घेतली?
ती तडीस नेली की नाही? नसल्यास का नाही?
(हात लावतच नाही सरळ ओठाने स्पर्थ करुन पितो/पिते, असल्या कोमेन्ट्स टाळता आल्यास उत्तम, आल्यासही हरकत नाही.)
योगात् व्यसनमुक्ति: - आसन - भाग २ - डॉ. वैशाली दाबके
योग आणि व्यसनमुक्ती यांचा विचार करताना सुरुवात आसनाने करावी असे डॉ. वैशाली दाबके यांनी सुचवले होते. त्याचे स्पष्टीकरण त्यांनी त्याबद्दल सविस्तर बोलताना केले. त्यावेळी त्यांनी आसनाचा संबंध शिस्त, तर्कसंगतपणा, स्थैर्य, शांतता, मनाला आत वळविणे यांच्याशी लावला. त्यांनी व्यसनमुक्तीच्या दृष्टीने आसनांचा काय उपयोग होऊ शकतो त्या संदर्भात जे सांगितले ते विशद करण्याआधी व्यसनामुळे नक्की काय घडते हे जर स्पष्ट झाले तर येथे आसनांची मदत कशी होते हे नीटपणे लक्षात येईल असे वाटते.
योग आणि व्यसनमुक्ती - सौ. जयश्री शुक्ल
मध्यंतरी ठाणे पाठपुराव्याला गेलो असताना सर्वप्रथम जयश्रीताईंची ओळख झाली. त्यांचं "योग आणि व्यसनमुक्ती" विषयावर भाषण ठेवलं होतं. विषयाचा आवाका प्रचंड होता आणि वेळ फारच थोडा. तेवढ्या वेळातही जयश्रीताई जे बोलल्या ते फार आवडलं आणि पटलं देखील. त्यांचे भाषण झाल्यावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्या चर्चेत त्यांचे विचार नीट समजून घेता आले. आणि त्याच वेळी वाटले की यांची मुलाखत आनंदयात्रीसाठी घेणे आवश्यक आहे. मुक्तांगणमध्ये योग हा व्यसनमुक्तीवरील उपचारांचा एक भाग म्हणून वापरला जातो. मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट म्हणजे मोठ्या मॅडम यादेखील योगाभ्यास करीत असत.
व्यसन आणि डिप्रेशन, संबंध, कारण व उपाय – डॉ. मैथिली उमाटे
मुक्तांगणला संशोधनासाठी मुलाखती घेत असताना डिप्रेशन आणि व्यसनाचा संबंध लक्षात आला. मात्र त्यावर त्यावेळी फारसे काम करता आले नाही. यावेळी आनंदयात्रीसाठी डॉक्टरांच्या मुलाखती घेण्याचे ठरल्यावर एक विषय “डिप्रेशन” हा घ्यावा असे ठरवले. मानसोपचारतज्ञ डॉ. मैथिली उमाटेंशी यासाठी संपर्क केल्यावर त्यांनी तत्काळ होकार दिला. भेटण्याची वेळ आणि ठिकाणही सांगितले. मॅडम मुंबईच्या प्रख्यात जे.जे हॉस्पिटल आणि वैद्यकिय महाविद्यालयात काम करतात हे मला माहित होते. प्रायव्हेट क्लिनिकमध्ये मुलाखत घेण्याऐवजी सर्वसामान्यांमध्ये मॅडम काम करतानाच त्यांच्याशी बोलावे असे वाटले. त्यालाही मॅडमची हरकत नव्हतीच.
स्मोकिंग अर्थात धुम्रपानाविषयी बोलायचंय !!!
प्रिय माबोकरांनो..
खुप दिवस या विषयावर लिहायचे मनात होते.
आजकाल आपल्याकडे स्मोकिंगचे प्रमाण वाढत चालले आहे.
माझ्या आसपास कित्येक कॉलेजगोईंग आणि त्यापेक्षा मोठी मुलेमुली स्मोक अर्थात धुम्रपान करतांना दिसतात.
त्याचा फार त्रास होतो.. शारीरीक आणि मानसिक सुद्धा..
मानसिक त्रास असा की आपण कुठे चाललो आहोत.. रोज किमान एकदा तरी ह्या ना त्या मार्गाने "धुम्रपान आरोग्यास हानीकारक आहे - Tobacco Kills !!!" हा संदेश कानांवर आदळतोच. आणि तरी धुम्रपान करणे हा एक स्टेटस सिंबॉल बनु लागलेला आहे. पुढे मुले मोठी झाल्यावर त्यांना ह्या विळख्यात अडकण्यापासुन कसे रोखु शकु तेच कळत नाही.
व्यसन
एक मुलगा एका दुकानाबाहेर पडतो.
"ए हीरोss आजचे धरून तीनशे साठ रुपये बाकी आहेत तुझे, किती?" मागून हाक.
"तीनशे साठ."
"हां बरोब्बर तीनशे साठ. तेवढं लवकर द्यायचं बघा."
"शेट, लक्षात आहे माझ्या, देतो."
"दहा दिवस झाले, हेच सांगतय राव."
"देतो, देतो, दोन दिवसात नक्की देतो."
ओशाळलेला चेहरा घेऊन तो मुलगा त्याच्या दुचाकीवर बसून निघून गेला.
