पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...
गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.
आयपीएल चे सहावे पर्व सुरू व्हायला आता फक्त मोजून एक महीना उरलाय.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... सेट मॅक्सवर काउंटडाऊन कधीचा सुरु झालाय... सहभागी संघ आपापले नवीन कर्णधार जाहिर करु लागलेत... संघमालक आणि स्टार खेळाडू नव्या जर्सीजचे फर्स्ट लूक साजरे करतायत...."कोरबो लोरबो जीतबो", "हल्ला-बोल" वगैरे आरोळ्या घुमू लागल्यात.... नव्या सनरायझर्स बद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.... अश्यात भारतीय संघ ऑसीजविरुद्ध चांगली कामगिरी करत असल्यामुळे लोकांना जरा जास्तीचा उत्साह आलाय...
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात.
ह्या देशाने शेवटी एक कडू बातमी पचवलीच! ही बातमी बऱ्याच लोकांना निरनिराळ्या अर्थाने कडू आहे! कुणाला 'तो' ह्या विषयावर बोलता येणार नाही म्हणून तर कुणाला 'त्याच्या 'वर कीस काढता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'तो' खेळला की आपण हरतो हे ठासवता येणार नाही तर कुणाला 'तो' अंतिम सामन्यात खेळतच नाही हा तर्क लावता येणार नाही म्हणून कडू! कुणाला 'आता कुणाच्या श्रीमंती वर बोलावे' म्हणून तर कुणाला ' त्याच्याकडे इतका पैसा आहे ना .. की पुढच्या अमुक इतक्या पिढ्या ऐत्या बसून खातील' असं आता कुणाबद्दल बोलावे म्हणून कडू!
दोन-चार दिवसांपूर्वीच हे लिहिणार होतो पण इथे मायबोलीवर असे चर्चेचे विषय कुठे मांडायचे ते शोधूनही न सापडल्याने इथेच टाकतोय.
बहुधा चालत असावे, कारण विषय निवडताना त्यात क्रिडा, क्रिकेट अश्या कॅटेगरीही सापडल्या.
पण जर इथे चालत नसेल तर कुठे हे कोणीतरी मला प्रतिसादात सांगा.
-------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------
यंदा १३ ऑक्टोंबर पासुन सुरु होणार्या चॅम्पिअन टी२० स्पर्धेसाठी धागा......
.
टी२० क्रिकेट खेळणार्या देशांमधे विविध क्लब स्पर्धेमधल्या विजेते व उपविजेते संघ या स्पर्धेत एकमेकांविरुध्द भिडतात
यंदा भारता तर्फे :-
आयपीएल विजेता :- कोलकता क्नाईट रायडर, उपविजेते:- चेन्नई सुपर किंग्स,
सेमीफायनलिस्ट :- दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि गतविजेते मुंबई इंडीयन्स
साउथ आफ्रिका तर्फे :- टायटन्स, आणि हायव्हेल्ड लॉयन्स
ऑस्ट्रेलिया तर्फे :- पर्थ स्कॉर्चर्स, आणि सिडनी सिक्सर्स
न्युझीलंड तर्फे :- ऑकलंड एसेस
ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
मार्च महिना लागला कि सगळ्यांना वेध लागायचे ते सुट्ट्या कधी सुरू होतात त्याचे. सगळी भावंडे मग एकत्र जमायचो. बाहेरगावी असलेली चुलत भावंडे देखील यायची. रोज दुपारी वेगवेगळे खेळ रंगायचे. जोडीला आम्हा सगळ्याची स्थानिक मित्र-मंडळी देखील असायचीच. मोठी भावंडे क्रिकेट खेळायची तर छोट्यांना बैठे खेळ आवडायचे.
(निवेदनः या लेखाचा हेतू सचिन तेंडूलकर विरूद्ध इतर हा नाही आहे. सचिन तेंडूलकरचं कर्तुत्त्व मोठं आहेच. या लेखाचा हेतू क्रिकेट या खेळाला इतकं अवाजवी महत्त्व का मिळालं असावं याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यात लपलेलं पैशाचं राजकारण उघड करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे सचिन तेंडूलकर प्रेमींनी तेंडूलकर विरूद्ध हा लेख असा पवित्रा घेऊ नये.)
भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा १५ डिसेंबर पासून सुरू होतोय. सचिन, द्रविड व लक्ष्मणचा हा ऑस्ट्रेलियाचा अखेरचाच दौरा आहे. द्रविड या दौर्यानंतर बहुतेक निवृत्त होईल. या दौर्यात भारत एकूण ४ कसोटी सामने, २ T20 सामने व श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरूद्ध एकूण चार-चार ५० षटकांचे सामने खेळेल. अंतिम फेरीत आलेले २ संघ एकमेकांविरूद्ध एकूण (जास्तीत जास्त) ३ सामन्यांची मालिका खेळतील.
भारताचा कसोटी संघ असा आहे -