टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बस्स करा क्रिकेटचे गुणगाण आणि वेड

माझ्या मते क्रिकेट हा भारताला जडलेला एक असाध्य रोग आहे जो ईतर सर्व खेळांना पोखरून काढतोय , सडवतोय.

बाहेरच्या जगात ह्या खेळाला जवळपास नगण्य किंमत आहे.

क्रिकेट मुळे ऑलिम्पिकमधल्या / सारख्या खेळां ची आवड निर्माण होण्याआधीच नष्ट होतेय हे आपले दुर्दैव

राजकारणी लोक ही क्रिकेट चा वापर अत्यंत खुबीने करून वादग्रस्त मुद्द्यांना बगल देण्यात यशस्वी होतात आणि आपणच त्यांना यशस्वी होऊ देतो.

मला माहितीये की माझी पोस्ट वरील विषयाला धरून नाहिये पण राहवले नाही म्हणून पोस्टलेय.
बघा विचार करून

क्रिकेट मुळे ऑलिम्पिकमधल्या / सारख्या खेळां ची आवड निर्माण होण्याआधीच नष्ट होतेय हे आपले दुर्दैव
>> प्रफुल्ला तुम्ही लिहिलय हे वादासाठी जरी मान्य केले तरी हे दुसर्‍या खेळाबद्दल होणार नाहि ह्याची छातीठोक गॅरंटी देता येईल तुम्हाला ?

राजकारणी लोक ही क्रिकेट चा वापर अत्यंत खुबीने करून वादग्रस्त मुद्द्यांना बगल देण्यात यशस्वी होतात आणि आपणच त्यांना यशस्वी होऊ देतो. >> प्रफुल्ला तुम्ही लिहिलय हे वादासाठी जरी मान्य केले तरी हे दुसर्‍या खेळाबद्दल होणार नाहि ह्याची छातीठोक गॅरंटी देता येईल तुम्हाला ?

प्रफुल्ल तुझी मतं अतिरेकी आणि एकांगी आहेत.

>> क्रिकेट मुळे ऑलिम्पिकमधल्या / सारख्या खेळां ची आवड निर्माण होण्याआधीच नष्ट होतेय हे आपले दुर्दैव
मान्य आहे की ऑलिंपिकमधे आपण फार काही कर्तृत्व दाखवीत नाही. पण ते क्रिकेट मुळे कशावरून? आज भारतात बुद्धिबळाचे ग्रँडमास्टर पण होतात. क्रिकेटमुळे ते का नाही मेले? किंवा पूर्वी आपण हॉकीमधे सगळ्यांना धुवायचो मग सगळी जनता हॉकीच्याच मागे का नाही लागली? आपल्या इतर खेळातल्या अपयशाचं खापर क्रिकेटवर फोडणं यातच सगळ्यांना मजा येते हे त्याचं खरं कारण आहे.

>> बाहेरच्या जगात ह्या खेळाला जवळपास नगण्य किंमत आहे.
म्हणजे फक्त बाहेरच्या जगात ज्या खेळांना किंमत आहे तेच खेळावेत की काय? अमेरिकेत बेसबॉल प्रचंड पॉप्युलर आहे पण त्यालाही बाहेर कुणी विचारत नाही. हे किमतीचं नाणं चालवलं तर खोखो, कबड्डी पण खेळायला नकोत!

लोकं क्रिकेट जास्त बघतात म्हणून तुम्ही क्रिकेटला दोष देणार का? त्या पेक्षा इतर खेळांबद्दल लोकांची रुचि वाढेल असं आपण काय करत आहात? कारण तसं काही केलं तरच काही अर्थ आहे नाहीतर फक्त क्रिकेटच्या नावानी शंख करुन काहीच उपयोग नाही.

मी पॅकेज घेईन बहुतेक विलोचे. फारच सोयीचे पडते.

१) हॉकी मधे आपण अव्वल होतो........क्रिकेट असुन सुद्धा
२) बुद्धीबळामधे जगात अव्वल खेळाडु भारताचा आहे.............क्रिकेट असुन सुद्धा
३) जागतिक मुष्टीयुध्द (बॉक्सिंग) मधे भारताचा अव्वल खेळाडु आहे.......क्रिकेट असुन सुद्धा
४) टेनिस मधे भारतीय खेळाडुंनी तब्बल ११ वेळा ग्रँडस्लॅम मिळावले आहे......क्रिकेट असुन सुद्धा
५) बॅटमिंटन मधे पादुकोण, गोपिचंद, सायना, ज्वाला सारखे खेळाडु मिळाले........क्रिकेट असुन सुद्धा
६) सुशील कुमार सारखे मल्ल आपल्या भारतात आहे..............क्रिकेट असुन सुद्धा
७) जगातील पहिल्या क्रमांकाची तिरंदाज दिपिका भारताची आहे............क्रिकेट असुन सुद्धा
८) गोल्फ सारख्या श्रीमंत खेळामधे आपला ठसा उमटवणारे जीव मिल्खा सिंग........क्रिकेट असुन सुद्धा
९) महिला बॉक्सिंग ची किंग जगज्जेती खेळाडु मेरी कोम भारताची आहे ............क्रिकेट असुन सुद्धा
१०) स्नुकर आणि बिल्डिअर्स चॅम्प गीत सेठी आणि अडवाणी हे भारताचे आहे.......क्रिकेट असुन सुद्धा
.
.
अजुन माहीती हवी ??... Wink

११ पेक्षा जास्त आहे संख्या... भूपती, पेस आणि सानिया मिर्झानी डबल्स मध्ये मिळवली आहेत ग्रँड स्लॅम विजेतेपदं..

लिएंडर पेस - १३, महेश भूपती - १२, सानिया मिर्झा - २, लिएंडर पेसनी करीयर स्लॅम पण पूर्ण केला आहे..

धन्यवाद हिम्सकुल...............;)

४) टेनिस मधे भारतीय खेळाडुंनी तब्बल ११ वेळा ग्रँडस्लॅम मिळावले आहे....

कधी? कुठे? कोणी?

भारताच हे यश यांच्या पचनी पडलेल दिसत नाही.

Biggrin Biggrin Biggrin

बस्स करा क्रिकेटचे गुणगाण आणि वेड
अहो ज्यांना वेड आहे क्रिकेटचे तेच येतील इथे. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वाचू नका.
तुम्हाला काय त्रास होतो? (नि होत असला तरी whatcha gonna do about it?आँ?!)

तुम्हाला का झोंबल !! वकिल पत्र घेतलय काय ?

बाकी बाजोंचा वरील "प्रश्न" विचारायचा रोख "माहीती नाही आणि ती मिळावी" ईतका सरळ नाही हे स्पष्ट दिसत आहे,

म्हणून असा प्रतिसाद !!

<<अहो ज्यांना वेड आहे क्रिकेटचे तेच येतील इथे. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही वाचू नका.
तुम्हाला काय त्रास होतो? >>
Happy
चालायचेच झक्की.......... हा काही पहिलाच धागा नाही असे झालेला....... Wink

भारताचा नविन शर्ट.............. विश्वचषकासाठी.......... Happy
.
.
new jarsy.jpg

तिरंगा आवडला...... बाकी डिझाईन नाही आवडली.......म्हणजे नाहीच्चे बाकी डिझाईन......

सडक्या मनोवृत्ती प्रतिसादातून दिसत आहेतच, त्यामुळे वेगळे भाष्य करावयाची गरजच नाही. Proud

हिम्स, ग्रॅन्ड स्लॅम मिळवणे आणि ग्रॅन्ड स्लॅम स्पर्धांची विजेतेपदं मिळवणे यात गल्लत तर होत नाहीये ना ?

बाबु.......................ग्रँडस्लॅम म्हणजे काय माहीती आहे का ?????????
.
.विंबल्डन..........यु एस ओपेन ,,,,,,ऑस्ट्रेलिअन ओपन........आणि ४थी..युरोप मधली स्पर्धा...(नाव आठवत नाही) या चार मुख्य स्पर्धेंना ग्रँडस्लॅम म्हणतात........ त्यात जिंकल्यास त्याला ग्रँडस्लॅम म्हणतात...... ४ ही स्पर्धा एका पाठोपाठ एकाच वर्षात जिंकल्याचे फक्त २-३ खेळाडु आहेत त्यात स्टेफी ग्राफ पण आहे........:)

उदयन, बोर्गच्या जमान्यापासून टेनिस बघतोय. ग्रॅन्ड स्लॅम म्हणजे काय ते माहिती नसायला काय झालं ?.

४ थी फ्रेन्च ओपन. Happy

उदयन, ४ ही स्लॅम्स जिंकल्यातर ग्रँड स्लॅम. त्या स्पर्धा नुसत्या स्लॅम आहेत.
(विकि वर माहिती उपलब्ध आहे तरी कशाला उगाच टांग खेचाखेची करताय?, गुमान तिकडे वाचून तरी बोला) बाकी हा बाफं क्रिकेटचा आहे, त्यामुळे आवरा...

शर्टाबरोबर सिक्स प्याकचे पुठ्ठे म्यान्डेटोरी आहेत वाटतं. आपल्या पिलेयरांना तेच बरं पडेल. Proud

<<बाकी हा बाफं क्रिकेटचा आहे, त्यामुळे आवरा... >> +१००
<<शर्टाबरोबर सिक्स प्याकचे पुठ्ठे म्यान्डेटोरी आहेत वाटतं. >> Proud

माझ्या माहितीप्रमाणे चारही एकाच वर्षात पूर्ण केल्या तर ग्रॅन्ड स्लॅम होतो.

बाकिची माहिती गुगलून

(ऑलिंपिक जिंकल्यास गोल्ड स्लॅम होतो)
तीन जिंकल्यास स्मॉल स्लॅम म्हणतात आणि चारही एकाच वर्षात पूर्ण न केल्यास नॉन कॅलेन्डर ग्रॅन्ड स्लॅम म्हणतात. वेगवेगळ्या वर्षात चार पूर्ण केल्यास करीयर स्लॅम म्हणतात.

बादवे ग्रॅन्ड स्लॅम ही टर्म फक्त टेनिसपूरती मर्यादीत नाही.

अवांतराबद्दल क्षमस्व

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/14739176.cms
.
.
सेरेनाचे हे विम्बल्डनच्या महिला एकेरीचे पाचवे आणि कारकिर्दीतील चौदावे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले. जागतिक रँकिंगमध्ये सेरेना सहाव्या , तर रॅदवँस्का तिसऱ्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत या दोघी दोन वेळा आमनेसामने आल्या होत्या. >>>>>>>>>>>>>>>>>
वैद्यबुवा...................चष्मा लावुन वाचा............................... गुमान वाचा जरा मग ........ दुसर्याचे वकिल पत्र घ्या..........:)

मटा च्या भरोश्यावर उड्या? बाकी चष्मा लावून बरोबर गोष्टी चुकीच्या दिसतात का? कैत्तरी आपलं. धड माहिती नसताना उगाच दुसर्‍याची चेष्टा करायची. Proud

विकी वर तुम्ही भरोशा करत आहेत...:अओ: ....:खोखो:
पत्रकार वेडी लोक..............आणि विकीलिक्स वाले बरोबर...........व्वा...... नमस्कार स्विकारावा आमचा.. Wink

Pages