वर्ल्ड कप

झहीर खान निवृत्त!

Submitted by फारएण्ड on 15 October, 2015 - 22:29

क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्‍हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.

विषय: 

उस सिक्सर की गूंज!

Submitted by फारएण्ड on 5 March, 2013 - 05:11

पाक विरूद्ध सचिनने सेन्च्युरियन वर मारलेल्या त्या प्रसिद्ध सिक्सला व त्या विजयाला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. त्याबद्दल काही आठवणी...

गेली अनेक वर्षे भारत-पाक मॅचेस म्हणजे जोरदार टीआरपी असलेले इव्हेण्ट्स झाले आहेत. पण सध्याच्या तुलनेत पूर्वीच्या मॅचेस म्हणजे अमर अकबर अँथनी च्या तुलनेत एखादा युरोपियन आर्ट मूव्ही! काही तुरळक अपवाद वगळता १९८५ पर्यंत फारसे काही इंटरेस्टिंग नव्हते.

विषय: 

टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.

विषय: 

मी मज हरपून ...

Submitted by pahaat on 24 March, 2011 - 14:15

मी मज हरपून ...

"जन गण मन अधिनायक जय हे, भारत भाग्यविधाता ... " या ओळी कधीही कानावर पडल्या तरी चित्तवृत्ती उल्हसित होतात. एकटे-दुकटे फिरताना, दुरून जरी हे सूर कानावर पडले तरी आपण थबकतो, रस्त्यातच ५ मिनिटे उभे राह्तो, मायभूमीची आठवण काढतो, प्रफ़ुल्लित होतो आणि परत आपली वाट धरतो. हेच राष्ट्रगीत जेव्हा एक ४५००० लोकांचा समूह गातो, माझ्या देशाचा विजय व्हावा या साठी अंतिम क्षणापर्यन्त साथ देतो ... तेव्हा ’हरपून’ जाण्याशिवाय काही उरतच नाही !

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - वर्ल्ड कप