सिंधूताई
गेल्या आठवड्यात शण्मुखानंद हाॅलमध्ये एका कार्यक्रमास गेलो होतो. नृत्य, गायन, सत्कार असे विविध कार्यक्रम होते. त्यात सिंधूताई सपकाळांचा सत्कार होता. सिंधूताई अतिशय साधे पातळ नेसून कार्यक्रमास आल्या होत्या. ७२ वर्षांच्या सिंधूताईंना चालण्यास थोडे कष्ट पडतात. स्टेज चढून आल्यावर जवळच त्यांच्यासाठी खुर्ची मांडण्यात आली व ज्या संस्थेतर्फे कार्यक्रम होता त्या संस्थेचे चारही पदाधिकारी आदराने त्यांच्या खुर्चीमागे उभे राहिले. सिंधूताईंनी माइक हातात घेतला व त्या फक्त पुढची १०-१५ मिनिटे बोलल्या. पण एवढ्या वेळात त्यांनी सगळे सभागृह दणाणून सोडले.