गेल्या आठवड्यात शण्मुखानंद हाॅलमध्ये एका कार्यक्रमास गेलो होतो. नृत्य, गायन, सत्कार असे विविध कार्यक्रम होते. त्यात सिंधूताई सपकाळांचा सत्कार होता. सिंधूताई अतिशय साधे पातळ नेसून कार्यक्रमास आल्या होत्या. ७२ वर्षांच्या सिंधूताईंना चालण्यास थोडे कष्ट पडतात. स्टेज चढून आल्यावर जवळच त्यांच्यासाठी खुर्ची मांडण्यात आली व ज्या संस्थेतर्फे कार्यक्रम होता त्या संस्थेचे चारही पदाधिकारी आदराने त्यांच्या खुर्चीमागे उभे राहिले. सिंधूताईंनी माइक हातात घेतला व त्या फक्त पुढची १०-१५ मिनिटे बोलल्या. पण एवढ्या वेळात त्यांनी सगळे सभागृह दणाणून सोडले. त्यांनी विनोद केले, काही शेर बोलून दाखवले, जाताजाता हसतखेळत सर्वांना उपदेशही केला. त्यांच्या सर्वांना एकेरीत संबोधण्यामागे त्यांना वाटत असलेली आपुलकी जाणवत होती. त्या मुंबईला आल्या तेव्हा त्यांची स्थिती काय होती व कुठून त्या कुठे पोहोचल्या हे त्यांनी थोडक्यात सांगितले. भाषण संपवून सिंधूताई सर्वांस नमस्कार करून स्टेज उतरू लागल्या तेव्हा उत्स्फूर्तपणे सर्व प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिवादन केले.
सिंधूताई
Submitted by Ravi Shenolikar on 17 September, 2019 - 01:10
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान