चिंब पाऊस, कॉफीचा मग आणि तू
कितीतरी वेळ बरसणारा तो आणि तुझ्याबरोबर,
तुझ्याच मिठीतून वेड्यासारखी खिडकीतल्या त्याच्याकडे
बघणारी मी...
आताशा बरसणार्या त्याला बघुन, हरवून जाते मी
पण तुला आठवत...भिनते पहाटेची ती निळीभोर वेळ..
समोर दिसणारं चांदणभरलं आभाळ अन् चंद्राची कोर
वार्याच्या अलवार झोताबरोबर घट्ट घट्ट होत जाणारी तुझी मिठी
अन् निश्चिंत मनाने टाकलेले ते उसासे... सलतात कितीतरी!
रिमझिम बरसणार्या त्याला बघुन आठवतोस तू..
अन् रिमझिम सरीसारख्या भेटीतली अनामिक ओढ,
कितीतरी वेळ तुझ्याबरोबर घालवलेले निरव शांततेतले क्षण
शब्दांची गाज रूंजी घालते मनात अन् समोर दिसतोस तू!
त्याची खिडकीबाहेर उधळणारी नक्षी बघुन माझ्या आरक्त
गालावरचं गुलाबीपण वेचणारा तू अन् माझ्या डोळ्यातले
भाव टिपून मला शब्दांतून मनमुक्त बरसू देणारा तू..
मला ऐकून शब्दांच्या जाळ्यात अडकून मैफीलीत रंगलेले आपण..
आठवतो आजही!
खिडकीबाहेर त्याचं चाललेलं थैमान, माझी नजर खिळलेली त्याच्यावरच
पण मन मात्र अडकून पडलेलं त्याचं सयींच्या थैमानात..
तुझ्या प्रत्येक श्वासांच्या, स्पर्शांच्या बदल्यात ती ओढ देऊन,
तुझी जागा रिक्त करून गेलेला तू.. अन्..
अन् आता खिडकीतला तो बरसायला लागतो डोळ्यातूनही..!!!
पावसावरची वेगळी कविता. आवडली.
पावसावरची वेगळी कविता. आवडली.
छान आहे
छान आहे
छान आहे!!!
छान आहे!!!
धन्यवाद पंत, शब्दाली व
धन्यवाद पंत, शब्दाली व नरेश!!!
मस्त आदी. छान लिहिली आहे.
मस्त आदी. छान लिहिली आहे.
मस्तच ! आता गुलाबी थंडी आणि
मस्तच ! आता गुलाबी थंडी आणि कॉफी वर लिही !!
ममा, ओवे धन्स गो!!!
ममा, ओवे धन्स गो!!!
हर्षा, खूप आवडली कविता तुझी
हर्षा, खूप आवडली कविता तुझी ....
कोणाकोणाची याद आली thanks for that