मायबोली माध्यम प्रायोजक असलेल्या "हायवे-एक सेल्फी आरपार" या चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी मिळाली. या प्रिमियर दरम्यान टिपलेले छायाचित्र. एक उत्तम चित्रपटाचा प्रिमिअर पाहण्याची संधी दिल्याबद्दल माध्यम प्रायोजक यांचे मनापासुन आभार.
आवर्जुन सिनेमाघरात जाऊन पहावी अशी कलाकृती, एक आरभाट प्रस्तुत व मायबोली माध्यम प्रायोजक असलेला चित्रपट "हायवे-एक सेल्फी आरपार".
मायबोलीकर भारतीताई आणि घारूअण्णा यांनी लिहिलेले सदर चित्रपटाचे परिक्षण खालील लिंकवर वाचा.
१. ‘’हायवे: एक सेल्फी आरपार’’ : एक चित्रानुभव
श्रीलंकन एअरलाइन्सने जेव्हा नवे रुपडे घेतले त्यावेळी गोव्यात तिचा ग्राऊंड हँडलींग एजंट म्हणून काम बघणार्या कंपनीत मी नोकरीला होतो. त्यांचे लोक मला एकदा श्री लंकेत ये, असा आग्रह करत असत.त्यावेळी मी फारसे मनावर घेतले नव्हते. पुढे मी मालदीवला गेलो होतो, तेव्हा श्रीलंकन एअरलाइन्सनेच गेलो होतो. तिथल्या मर्यादीत तासांच्या ट्रांझिटमधे तसेच विमानातून दिसणार्या दृष्यांमूळे तिथे जायचे तेव्हाच नक्की केले होते.
ते यावेळच्या भारतवारीत साधले.
यंदा म्हणावा तसा पाऊस अजून झालाच नाहीये. नेहमीप्रमाणे किती आतुरतेने वाट पाहत होतो. पठ्या ने कोकणात तळ ठोकला तो तिकडेच रमला अन अजिबात पुढे सरकायच नाव घेत नाहीये. आता तर सगळ्यांच्या तोंडच पाणी च पळवलंय. त्यामुळे सध्यातरी पावसाळी ट्रेक नाहीत कि भ्रमंती नाही कि ते मनमुराद भिजण नाही.
उरल्यात फक्त पावसाच्या आठवणीच ! नशिबाने याआधीच्या पावसाळी भटकंतीची काही चित्रे कॅमेर्यात बंदिस्त केली होती. परवाच त्याची उजळणी करत होतो अन वाटल कि हे सर्व आपल्या मायाबोलीकारांसोबत शेअर कराव. मी काय प्रो फोटोग्राफर वगैरे नाही पण जमेल तस क्लिक करत असतो. तेव्हा आहे ते गोड मानून घ्याव हि विनंती
थायलँड ला ,'लँड ऑफ स्माईल्स' ची उपाधी मिळायला येथील रहिवाश्यांच्या चेहर्यावरचे स्थाई स्मित कारणीभूत
असेल नक्कीच, पण येथील फुलंवेडी जनता पाहून ,या देशाला लँड ऑफ फ्लॉवर्स हे नांवही उपयुक्तच वाटतं.
यांना सौंदर्य दृष्टी उपजतच लाभलेली आहे. मुख्य रस्ते तर सोडाच, पण अगदी गल्ली बोळात ही असलेल्या
लहान मोठ्या घरांसमोर, रेस्टोरेंट्स समोर , झालंच तर मोटार गॅरेज समोरही फुलांनी डंवरलेली झाडं
असतात.
येथील फळा,भाज्यांवर कोरलेली सुबक नक्षी, प्रत्येक खाद्यपदार्थ्,पेये फुलांनी सजवून कलात्मक रीतीने पेश
करण्याची कला तर जगप्रसिद्ध आहे.