आधीचे भाग
स्वित्झर्लंड भाग १ - होहेर कोस्टन http://www.maayboli.com/node/52047
स्वित्झर्लंड भाग २ - इन्टर-लाकेन http://www.maayboli.com/node/52801
स्वित्झर्लंड भाग ३ - एगेल्सी http://www.maayboli.com/node/52810
स्वित्झर्लंड भाग ४ - बोसविल आणि परिसर http://www.maayboli.com/node/52827
स्वित्झर्लंड भाग ५ - बॉटॅनिकल गार्डन http://www.maayboli.com/node/52991
स्वित्झर्लंड भाग ६ - युफ http://www.maayboli.com/node/53065
स्वित्झर्लंड भाग ७ - सुरसी http://www.maayboli.com/node/53248
स्वित्झर्लंड भाग ८ - अर्नीसी ! http://www.maayboli.com/node/53359
स्वित्झर्लंड भाग ९ - आईनसिडऽन आणि इन्नरथाल http://www.maayboli.com/node/54499
स्वित्झर्लंड भाग १० - रिगी http://www.maayboli.com/node/54543
स्वित्झर्लंड भाग ११ - मेन्झबर्ग ! http://www.maayboli.com/node/55213
स्वित्झर्लंड देश छोटुसा असला तरी बघण्यासारख खुप काही आहे. एव्हढ्याशा देशात स्विस जर्मन, फ्रेन्च आणि इटालियन भाषा बोलली जाते असे तीन विभाग आहेत. एक दुसर्यापासुन एकदम वेगळा! तिथले कॅन्टोन्स वेगळे, तिथल योडेलिंग वेगळा, पारंपारीक पोशाख वेगळे, एकच रोष्टी पण ती बनवायची पद्धत वेगळी. आत्तापर्यंत मी फक्त उत्तर , ईशान्य स्वित्झर्लंड आणि काही मधला भाग बघितला होता. फ्रेंच आणि इटालियन आल्प्स अजुन बघायचा रहिलच होतं! जायची तारीख जवळ आली होती आणि हाती तीन वीकेंड शिल्लक होते. इटालियन आल्प्स मधे खुप बर्फवृष्टी झाल्याने तिकडे जाण्याचा मार्ग बंद होता. त्यामुळे फ्रेंच आल्प्स हा एकच पर्याय उरला. या पोराला फ्रेन्च साईडचा बेस्ट पार्ट दाखवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे अस समजुन नकाशे बिकाशे घेऊन मार्था माझ्यासाठी प्लॅन बनवु लागली आणि ले प्लेएत्स्झ ह्या शिखरावर जायचं ठरलं!
हवामान विभागाने हिरवा कंदिल दाखवला. इकडे हवामान विभाग एक आठवडा आधीच सांगतो कि पुढच्या शनिवारी सकाळी ९ पर्यंत बर्फ पडेल , नंतर पुर्ण दिवस सुर्यप्रकाश असेल. आणि आश्चर्य म्हणजे सगळ तसंच होतं. ९ म्हणजे सव्व नऊ पर्यंत तर बर्फ वृष्टी थांबते पण! आमच्याकडे म्हणजे पुणे वेधशाळेने पाऊस पडेल असं सांगितल की खुशाल रेनकोट, छत्र्या, घरात ठेऊन जायचं.
असो. तर प्रवास लांबचा होता दुपारी १२ पर्यंत त्या ठिकाणी पोहोचणे गरजेचे होते. सकाळे ७ ला घरातुन बाहेर पडलो! सारा प्रवास हा जिनिव्हा लेक च्या कडेने होता! सुरेख ऊन पडलं होता. जिनिव्हा तुन पुढे व्येवेऽ या ठिकाणाहुन वर शिखराकडे एक छुटकुली ट्रेन जाते! या बोगद्यातुन आमची ट्रेन व्येवेऽ मध्यी आली!
अजुन शिखराकडे नेणार्या ट्रेन ला जरा वेळ होता तेव्हढ्यात व्येवेऽ बघावं म्हटल!
अगदीच छोटंसं गाव पण त्याला ख्रिस्तपुर्व काळापासुनचा इतिहास! स्टेशनजवळच ऑर्थोडॉक्स आणि स्विस् रिफॉर्म्ड चर्च होतं. त्यातलं पहिलं बंद असल्याने दुसर्याकडे मोर्चा वळवला जे थोडं चढावर होतं!
चढता चढता ऑर्थोडॉक्स चा कळस दिसला!
टेकडीची वाट बांधुन काढलेली आणि वेलीनी सजवलेली!
चर्चच्या जरा खाली असणार्या आवारातुन समोर आल्प्स च्या रांगा दिसत होत्या. लेक च्या सान्निध्यात असल्याने सगळीकडे मिस्ट होती!
वर आल्यावर प्रचंड मोठं चर्च दिसलं. कुठल्याही तर्हेनी ते एका फोटोत पुर्ण बंदिस्त होणं शक्यच नव्हतं! हा त्यातला पाद्रीबुवा आणि त्यांच्या अनुयायांचा राहण्याचा विभाग!
हे मागचं दार!
ही ख्रिस्ताच्या मागच्या भिंतीवरची खिडकी. त्याला गुगलने हा "कॉन्ज्युरींग" टाईप इफेक्ट दिला
आणि ती खिडकी आतुन!
नेहमीप्रमाणे चर्च मधला सुंदर ऑर्गन!
स्टेनड ग्लास!
अणि त्याचा रंगबेरंगी कवडसा!
चर्चच्या बाहेरच सिमेटेरी होती! इतकी सुंदर की जणु बागच!
तिथली शिशिराच्या पानगळीनंतर उघडी पडलेली झाडे निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभुमीवर कोंदल्यासारखी वाटत होती!
ट्रेन ची वेळ झाल्याचं लक्ष्यात आलं, व्येयेतुन पुढे प्लेएत्स्झ ला गेलो! तिथे या रेस्टॉरंट पर्यंत ट्रेन आणुन सोडते!
हे तिथलं छोटसं स्टेशन!
तिथुन पुढे आपण हवं तिथे हुंदडायचं स्वतःच्या जबाबदारीवर! उजव्या बाजुला बघितलं की समोर आल्प्स आणि मधे जिनिव्हा लेक असा नजारा दिसतो. कोवळ्या ऊन्हामुळे तळ्यावर मिस्ट जमा झाली होती. आपल्याकडे जुन्या चित्रपटांत , स्वर्गाच्या सीन मधे जसे धुवा धुवा दाखवायचे तसं दिसत होतं सगळं!
फरक एव्हढाच की हा खरा स्वर्ग होता!
समोर जी बर्फाने झाकलेली चिंचोळी पायवाट दिसते त्यावरुन मार्गक्रमण सुरु झाले. वाट तशी धोक्याची होती. कारण हिमाचे थर साचुन साचुन गुळगुळीत बर्फ तयार झाला होता. पाय सटकत होता! तोल गेला की डायरेक्ट खाली लेक ऑफ जिनिव्हा आणि मग डायरेक्ट वर अल्टिमेट स्वर्गात! त्यामुळे जपुन चालत होतो!
पायवाटेवरुन वर आलो आणि विस्तीर्ण सपाट माथ्यावर पोहोचलो!
तिथे वर फक्त मी आणि आपल्या चार वर्षाच्या मुलाला स्किईंग शिकवायला घेऊन आलेले एक वडील सोडले तर कोणी नव्हतं!
चहुबाजुला आल्प्स आणि त्यातले वेगवेगळे डोंगर, शिखरे आणि टेकड्या!
कडेने वाढलेली सुरुची प्रचंड झाडे. थंडीत पण हिरवीगार!
समोर जे बुटाचे निशाण दिसताहेत ते माझेच. यावरुन मी तिथे किती फेर्या मारल्या हे तुमच्या लक्ष्यात येईल!
समोर जे छोटीशी तेकडी दिसतेय ना त्यावर एक बेंच होता. त्यावर जाऊन बसलो मी . किती तरी वेळ.
अशावेळी काळाचा हिशोब ही फार क्षुल्लक गोष्ट वाटु लागते. जिथे काळ पोहोचु शकत नाही, अशा एका ठिकाणी येऊन बसल्याच समाधान मिळतं. कोणी म्हणेल की ते क्षणभंगुर आहे, खोटं आहे. पण तिथे असणार्या माझ्या जगात तरी ते शाश्वत सत्य होतं!
नेटवर कुठेतरी वाचलेली ही कविता सगळं सांगून जाते!
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणात आपोआप,
त्याच्या स्मरणाने प्रकाशते मन
उजळते जग क्षणकाली
स्थिरावते पुन्हा चळलेले चित्त
पुन्हा मूळ वाट पायाखाली
बसलेलो तिथेच खाली एक गवतफुल होतं. हिवाळ्यात गवतफुले नसतात. ह्याला कसली उर्मी आली होती काय माहित! हसत खिदळत होतं! निसर्गाचं कुठलंच रुप त्याला गौण नसावं!
निघायची वेळ झाली! समोर एक क्रॉस होता, एव्हढ्या वर पण !"त्याच्या अस्तित्वाच्या खुणा जागोजागी!"
ट्रेन मधुन जाताना पण निसर्गाचं वेगळ दर्शन होत होतंच!
दिवस संपला! अजुन एक शांत दिवस हाती लागला! समोर तळ्यात सुर्यास्त होत होता. सगळं अस्तित्त्वच सोनेरी झालेलं. मनात कसली तरी हुरहुर होती! आणि कुमार पुरीयाधनश्री आळवत होते "आजरा दिन डुबा, अब तु ध्यान धरीलो रे"
आज एकहि फोतो दिसत नाहिय
आज एकहि फोतो दिसत नाहिय
फोटो दिसत नाहीयेत? मला
फोटो दिसत नाहीयेत? मला दिसताहेत पण!
भारीच फोटो.. त्या आकाशातल्या
भारीच फोटो.. त्या आकाशातल्या रेषा कसल्या आहेत ?
अप्रतिम!!!
अप्रतिम!!!
+१
+१
वा! मस्त.
वा! मस्त.
सुंदरच.. खरं तर तू सांगितलेस
सुंदरच.. खरं तर तू सांगितलेस कि हे फोटो मोबाईलच्या कॅमेराने काढलेत, म्हणून खरे मानावे लागतेय.
स्विस आभाळात या विमानाने आखलेल्या पांढर्या रेघा फार दिसतात
जबरदस्त फोटो, क्लास वर्णन
जबरदस्त फोटो, क्लास वर्णन .....
अप्रतिम!
अप्रतिम!
सारेच फोटो खूप सुंदर आहेत. तो
सारेच फोटो खूप सुंदर आहेत. तो conjuring वाला इफेक्ट पण जमलाय त्या फोटोला ..
वामान विभागाने हिरवा कंदिल
वामान विभागाने हिरवा कंदिल दाखवला. इकडे हवामान विभाग एक आठवडा आधीच सांगतो कि पुढच्या शनिवारी सकाळी ९ पर्यंत बर्फ पडेल , नंतर पुर्ण दिवस सुर्यप्रकाश असेल. आणि आश्चर्य म्हणजे सगळ तसंच होतं. ९ म्हणजे सव्व नऊ पर्यंत तर बर्फ वृष्टी थांबते पण! आमच्याकडे म्हणजे पुणे वेधशाळेने पाऊस पडेल असं सांगितल की खुशाल रेनकोट, छत्र्या, घरात ठेऊन जायचं. फिदीफिदी
या देशांत हवामान स्थिर असते. ट्रॉपिकल एरिया सारखे टर्ब्युलंट नसते. ट्रॉपिकल भागात सतत थर्मल्स तयार होत असल्याने क्षणाक्षणाला हवा मानाचे स्वरूप बदलते. त्यामुळे ते फार दीर्घकाळासाठे प्रेडिक्ट करता येत नाही. त्यामुळे विनोद म्हणून ठीक आहे अन्यथा ते अन्यायकारक होईल हवामानखात्यावर इथल्या....
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो!
नेहमीप्रमाणेच मस्त फोटो!
अप्रतिम, नेहेमीप्रमाणे.
अप्रतिम, नेहेमीप्रमाणे. ___/\___.
कुलुजी आप खुश कर देते हो.
कविता छान, कवीचं नाव कळायला हवं होतं.
गवतफुल बघुन मला 'गवतफुला रे गवतफुला' कविता आठवली.
टेकडीची वाट सुंदर. लेखाचा शेवट सुंदर.
वाह!! एव्हढा एकच शब्द, पुरेसा
वाह!! एव्हढा एकच शब्द, पुरेसा नाहीये माहीतै मला.. पण नि:शब्द झाल्यावर अजून काय करणार!!!!
पोएटिक प्रकाशचित्रं..
सुंदर!
सुंदर!
मनभावन! आभाळातले फर्राटे
मनभावन!
आभाळातले फर्राटे निराळाच इफेक्ट देतायत. शेवटचा फोटो कळस आहे. तिथून परत यावंसं वाटू शकत नाही.
बादवे, अशा सुंदर फोटोजवर वॉटरमार्क्स असायला हवेत.
एकदा मी तुझ्याबरोबर भटकणार आहे. मग त्या प्रवासाचं, ठिकाणांचं, निसर्गाचं माझ्यापाशी एक वर्णन फक्त माझ्यासाठी लिहून ठेवणार. नंतर त्यावरचं तुझं एक्स्प्रेशन वाचणार. एक रंजक एक्सरसाईज होईल आणि खुप मजा येईल
हाही भाग मस्तच! सेल्फोनातले
हाही भाग मस्तच! सेल्फोनातले वाटत नाहीत फोटो!
सर्वांचे खुप खुप आभार! सई
सर्वांचे खुप खुप आभार! सई नक्की जाऊ आपण एकत्र कुठेतरी फिरायला. मजा येईल फोटो सेल्फोनातलेच आहेत. मोठ्या कॅमेर्याचे सेटींग्ज वगैरे बदलत बसावे लगतात फोटो काढताना, तेवढा पेशन्स नसल्याने मी सरळ मोबाईलच्या कॅमेर्यानेच फोटो काढतो!