खोप्या मधे खोपा.... पिल्लासाठी .....(कुम्भारिण माशीचा मातीचा )

Submitted by जो_एस on 25 August, 2015 - 12:11

खिडकीच्या गजावर हे मातीचं घर करायला सुरुवात केली या माशीनी
मातीचे गोळे आणून त्याना आकार देतानाच स्किल बघण्या सारख आहे .
kb0_.jpgkb1_.jpgkb2_.jpgkb3_.jpgkb4_.jpg

याच्या आत आळी सारख काहीतरी दिसतय्
kb6_.jpg

एक झाल्यावर बाजूला आणि मग वर आजून बांधकाम चालू झालं
kb7_.jpgkb8_.jpgkb9_.jpg

नंतर अधीच्या घरांवर कसले तरी थर देत असते मधेच
हे फोटो मोबाईलनी १,२ इंचा वरून काढलेत्

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! डिटेलमध्ये कॅप्चर केली आहेत तिची कलाकारी. Happy

या माशीला 'कुंभारीण' म्हणतात. घर बांधतानाच वेगवेगळे कप्पे बनवून त्यात अळ्या आणून ठेवते व कप्पे बाहेरुन बंद करुन टाकते. अंड्यांमधून पिल्ल बाहेर येऊन ती स्वतंत्रपणे उडायला लागेपर्यंतची सोय. Happy

निधी मी लिहणारच होती तु सांगितलेली माहिती Happy
छान टिपलेयत .. एवढ्या जवळून..
सांभाळुन जरा..हिचा चावा खुप त्रासदायक असतो..

कुंभारीण माशीच्या घराचे काय सुंदर डिटेलिंग.

खुपच छान, जो_एस. तुमचे फोटो काढण्याचे स्कील पण बघण्यासारखे. >>>>> +१०००००००

लै भारी फोटु आहेत रे ...... Happy

घर बांधतानाच वेगवेगळे कप्पे बनवून त्यात अळ्या आणून ठेवते व कप्पे बाहेरुन बंद करुन टाकते. अंड्यांमधून पिल्ल बाहेर येऊन ती स्वतंत्रपणे उडायला लागेपर्यंतची सोय.

बापरे हे माहित नव्हते. माझ्या घरी ही असली घरटी गच्चीत खुप दिसतात. एकदा घराच्या आत बांधलेले म्हणुन मी ते तोडले. आतुन तिनचार मोठ्या हिरव्या अळ्या बाहेर पडल्या. ते बघुन मला जरा वाईट वाटले. मला वाटले त्या माशीचीच ती पिल्ले होती आणि माझ्या हातुन नुकसान झाले.

फोटो छान घेतलेत. पक्ष्या-प्राण्यांजवळच्या ह्या कलाकुसरीचे खुप नवल वाटते. परवा आमच्या इथल्या टेकडीवर मैनेला हिरव्या लांब गवताचे एकेक पान घेऊन घरटे बांधताना पाहिले. किती मेहनत. आणि किती सुबकपणा... (मुनिया हे नाव मला आवडत नाही म्हणुन मी स्केली ब्रिस्टेड मुनियाला मैना म्हणते Happy )

अभिप्रायाबद्दल धन्यवाद

सांभाळुन जरा..हिचा चावा खुप त्रासदायक असतो..>>>> हो लहानपणी मी अष्याच् पण लाल माशीचा प्रसाद खाल्लाय

घर बांधतानाच वेगवेगळे कप्पे बनवून त्यात अळ्या आणून ठेवते व कप्पे बाहेरुन बंद करुन टाकते. अंड्यांमधून पिल्ल बाहेर येऊन ती स्वतंत्रपणे उडायला लागेपर्यंतची सोय.>>> हो एका डोक्युमेंट्रीत पाहिलं होत . आणि त्या माशा या मातीच्या घराला भोक पाडून आणि बुजवून आतल टेम्परेचर मेंटेन करते
त्या आळ्याना ती मरणार नाही पण बेशुध्द राहील अस रसायन टोचते त्यामुळे त्या आळ्या कूजत नाहीत

मोबाइलने घेतले आहेत हे लिहिलं नसतंत तर शंका देखील आली नसती. >> +१
मोबाईल कुठ्ला ?

आत्ता कधी नव्हे ते ही दिसली..मग काय मी तिनताड उडून घरात पळाली Proud

जो_एस, कुंभारीणीचे घर भन्नाट टिपलेय !
काय सुरेख माशी आहे, एकदम कलरफुल.
फोटो ही अप्रतिम !
मान गये आपकी पारखी नजर को ! आपके सुपर स्कील को !

Pages