सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
अस्ति उत्तरस्यां दिशि नाम नगाधिराजः पर्वतोs हिमालय: १ हिमालयाच्या पायथ्याशी
पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गावी जाणे झाले नि कोकण फ्रेश हवा खाऊन आलो.. मागाहुन मुंबईतून आलेले दोस्तलोक्स व त्यांच्यासोबत केलेली यथेच्छ भटकंती !!
प्रची १.
प्रची २. पेटीचे सुर..
थायलँड मधे कोणत्याही शहरात फिरा, जिकडे तिकडे लहान , मोठी मंदिरे विखुरलेली
दिसतात. आत अर्थातच बुद्ध प्रतिमा स्थापित असते. थाय लोकं भलतेच भाविक!! त्यांच्या घरासमोर, सर्व सरकारी कार्यालयांसमोर, रस्त्यांच्या किनार्यावर, इतकचं नव्हे तर अगदी हॉटेल्स, नाईट बार इ, समोरही उदबत्त्या , मोगर्या चे कलात्मक गजरे लावून सुशोभित केलेले लहानसे लाकडी मंदीर असतेच . समोर ठेवलेल्या लहान लहान वाडग्यांतून भात, पाणी , सामिष, निरामिष भोजन ही नैवेद्य म्हणून ठेवलेले असते.
चिंगमाय ला टेंपल सिटी म्हणण्याचे कारण म्हणजे या जेमतेम दोन लाख लोकवस्ती असलेल्या शहरात जवळपास
सर्व मान्यवर वाचकांना मन:पूर्वक अभिवादन! डिसेंबर २०१२ मध्ये उत्तराखंडमध्ये केलेल्या प्रवासाच्या आणि ट्रेकिंगच्या आठवणी इथे शेअर करत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये जिथपर्यंत रस्ता सुरू असेल, तिथपर्यंत फिरायला जावं ह्या विचाराने हा प्रवास केला. उत्तराखंडमध्ये हिवाळ्यामध्ये बद्रिनाथच्या जवळ भ्रमंती करताना अपूर्व असा रमणीय भाग बघता आला. त्याचं हे प्रत्यक्ष वर्णन. .
हिमालयाच्या पायथ्याशी
लहानपणी घरी ,'विचित्र विश्व' नावाचं एक मासिक येत असे.त्यात दुनियाभरातील चित्रविचित्र गोष्टींबद्दल वाचून खूप गंमत वाटायची..पुढे कामानिमित्त देशोदेशी भटकताना बर्याच असामान्य गोष्टीं शी सामना झाला. त्यापैकी विचित्र फूड्स किंवा bizarre foods हे प्रकरण, कधीकाळी डिस्कवरी चॅनेल वर पाहिलेले , अचानक आपल्या डोळ्यासमोर येऊन ठाकले तर कसे वाटेल, याचा मासला इथे देतेय.. यापूर्वी बीजिंग च्या खाऊ गल्ली चे फोटो तुमच्यापैकी काही जणांच्या लक्षात असतील..
कास पुष्प पठार - धावती भेट
केव्हापासून कासला जायचे असे मनात होते. शेवटी या विकेंडला अचानक जायचा प्लान केला. मुलगी बरोबर असल्याने खूप चालता आलं नाही किंवा कुमुदिनी तलावापर्यंतही जाता आलं नाही. पण जे पाहीलं ते फार सुंदर आहे. कासला जायचा रस्ताही खूप मस्त आहे.
यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे असेल किंवा काय माहित नाही फुलांचे गालीचे दिसले नाहीत. कारवी फुलली आहे असे ऐकले पण नेमके आम्ही निघालो तेव्हा ठोसेघर पर्यंत जाताना तुफान पाऊस.समोरचे काहीच दिसत नव्हते त्यामुळे डोंगर दर्यावर फुलली असेल तरी दिसली नाही.
यंदाच्या गणपतीत अंबोली मार्गे मालवणात जाणे झाले. दर सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी या वर्षी अंबोलीत फुललेली दिसली. काही ठिकाणी फक्त टोपलीच होती तर, काही ठिकाणी पुर्ण बहरलेली कारवी दिसली. या आधी २००७ मधे रतगडावर फुललेली कारवी बघितली होती. यंदा मात्र हा कारवी मोहत्सव कॅमेर्यात टिपण्याच भाग्य लाभलं.
प्रचि १
प्रचि २