तो.. बागोंमे बहार है?.. है!!!

Submitted by वर्षू. on 21 August, 2015 - 04:23

थायलँड ला ,'लँड ऑफ स्माईल्स' ची उपाधी मिळायला येथील रहिवाश्यांच्या चेहर्‍यावरचे स्थाई स्मित कारणीभूत
असेल नक्कीच, पण येथील फुलंवेडी जनता पाहून ,या देशाला लँड ऑफ फ्लॉवर्स हे नांवही उपयुक्तच वाटतं.
यांना सौंदर्य दृष्टी उपजतच लाभलेली आहे. मुख्य रस्ते तर सोडाच, पण अगदी गल्ली बोळात ही असलेल्या
लहान मोठ्या घरांसमोर, रेस्टोरेंट्स समोर , झालंच तर मोटार गॅरेज समोरही फुलांनी डंवरलेली झाडं
असतात.
येथील फळा,भाज्यांवर कोरलेली सुबक नक्षी, प्रत्येक खाद्यपदार्थ्,पेये फुलांनी सजवून कलात्मक रीतीने पेश
करण्याची कला तर जगप्रसिद्ध आहे.
१२ जुलै ला राणी चा वाढदिवस असतो , हाच इथला मातृदिनही, म्हणून देशभरात साजरा केला जातो. या निमित्ताने तीन दिवस फुलां चे प्रदर्शन भरते..
.. अशी मैलोनमैल प्रदर्शन बघतांना हे पाहू कि ते, इकडे बघू का तिकडे अशी वेड्यागत स्थिती होते.

या प्रदर्शनाची एक झलक..









१०

११

१२

१३

१४

१५

१६

१७

१८

१९

२०
ही फुलंतर अगदी दुपट्यात गुंडाळलेली बाळंच दिसत होती

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वर्षू...
वॉव..
यातल कुठल चांगल अस मला विचारल तर डोळे मिटून डस्टर पिंजर खार खबुतर कराव लागेल..
सुपर्ब फुलं..त्यात ते तु स्वतः पाहिले..जेलस ऑफ यु.. सुखी तू Happy

बहुतेक फुले ऑर्किड प्रकारातील वाटत आहेत. १४ मधले फुल एखाद्या नकट्या नाकाचे, थोडा दीनवाणा चेहरा आणि हात जोडून याचना करणाऱ्या परग्रहवासीसारखे वाटते! Happy

थांकु सर्वांना..

गजानन, इथे खूप निग प्रेमी आहेत ज्यांना सगळी नावंगावं माहीत असतील्,अशी आशा आहे
वीटी.. बरोबरे मोस्टली ऑर्किड फॅमिलीतील आहेत..
अजून खूप्प आहेत फोटोज, निवडताना माझाही गोंधळ उडतोय.. Happy
टीना.. डस्टर्,पिंजर.. Rofl Biggrin अशक्येस तू

मस्तच Happy

दुसर्‍या फोटोतल्या फुलाचा रंग काय सुरेख आहे.

यातली बरीचशी फुलं सिंगापूरच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये पाहिल्याची आठवतायत. तिसर्‍या फोटोतल्या फुलाला बहुधा सिंगापूरच्या राष्ट्रीय फुलाचा दर्जा आहे ना?

अर्रे, किरु?? किती दिवसांनी दिसलास इथे..
वोक्के ललिता, मी पण पाहते माझ्या खजिन्यात आहे का ते..
आत्मधून.. यू आर राईट
सर्वांना थँक्स!!
निंबे.. यस उत्तर बरोबरे,' अरे बाबा है!!! Happy

नाही कुलु, सुवासिक नव्हती..कुठलीच , ही सर्व शोभे ची..

इथे मोगरा मात्र आकाराने मोठा, जास्त सुवासिक वाटला..

बागोमे बहार नही है यार... ये तो खुद बहार का बगिचा है.... बहोत खुब.. तेरी आंखोसे हमने भी बहार के दर्शन कर लिये आज...

Pages