प्रकाशचित्रण

एकटीच @ North-East India दिवस - १६

Submitted by सुप्रिया राज जोशी on 2 March, 2020 - 08:01

अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598

52852264_10156893190557778_6237142191467134976_n.jpg

21st फेब्रुवारी 2019

प्रिय वाचकांनो,
एकेकाची नावं डोक्यात येतायत, पण सारी लिहू कशी?

Milky Way (आकाशगंगा)

Submitted by बग्स बनी on 31 January, 2020 - 11:11

"आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला,
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाती पंगुवत"

एखाद स्वप्नं बघणं, त्या स्वप्नासाठी झुरण, तळमळण, आणि ते स्वप्नं कधी ना कधी पूर्ण होईल या एका आशेवर वेड्या सारख त्या गोष्टीच्या मागे लागण, त्या साठी धडपडण, आणि शेवटी त्या गोष्टीला यश मिळण, अत्यंत सुखदायक असतं. लहानपणापासून आयुष्याच्या या प्रवासात कोणती ना कोणती गोष्ट असामान्य घडत गेली किंवा घडवली गेली. आणि या सगळ्यातूनच आपल्यातल असामान्य व्यक्तिमत्त्व विकसित होत असतं अस मला वाटतं.

प्रांत/गाव: 

दिगंतराचे प्रवासी... (रोजनिशी २०२०)

Submitted by .......... on 1 January, 2020 - 09:40

हैराँ हूं मेरे दिल में समाए हो किस तरह...

Submitted by हरिहर. on 26 November, 2019 - 06:53

मला पहाटे चार वाजता उठायची सवय असली तरी कामाला मात्र मी दहा-साडेदहापर्यंत हात लावत नाही. पण परवा सासवडला अत्यंत निकडीचे काम निघाले आणि दहा वाजेपर्यंत पुण्यातही असणे गरजेचे होते. त्यामुळे कधी नव्हे तो माझा पहाटेचा नियम बाजूला ठेवून मला सहा वाजता घर सोडने भाग होते. इतक्या लवकर निघण्याचा हेतू हा होता की सासवड परिसर पक्षिनिरीक्षकांचा आवडता भाग आहे, कदाचित आपल्यालाही काही फोटो मिळतील व अकरापर्यंत पुण्यात येता येईल. रात्री गुगल काढून शोध घेतला आणि एवढ्याशा सासवडमधे कुठे कुठे जायचे याची यादी वाढतच चालली. सासवडजवळील काही भागात रॅप्टर्स पहायला मिळतात. गरुड, ससाणे वगैरे.

शब्दखुणा: 

मांजरप्रेमी????

Submitted by कविता९८ on 15 November, 2019 - 11:56

मी : मम्मी मला पेट हवं
कधी घेऊया??

आई: आता नाही..
दहावी महत्त्वाची आहे.

अडीच वर्षांनंतर
मी : आई आता तर माझी बारावी पण झाली..
आता तरी एक पेट घेऊया ना ग..

आई : काही गरज नाही..
स्वतःच्या पायावर उभी रहा आणि मग घे..

अशा प्रकारे कितीवेळा तरी पेट साठी आईकडून नकारघंटा मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यात ती आली..
मार्च मध्ये तिने पहिल्यांदा घरात पाऊल ठेवलं..
आणि पेट पाळण्याचं स्वप्न चांगलच पूर्ण झालं.

दिगंतराचे प्रवासी...

Submitted by .......... on 14 November, 2019 - 01:39

पक्ष्यांच्या वर्गिकरणाविषयी थोडी माहिती

वाढ आणि रचना ह्यांमधील मूलभूत फरकावर आधारित अशा २७ गणांमधे (Order) पक्षीवर्गाचे वर्गीकरण केले जाते. उदा. कुलिंग गणातील पक्षी (Order Passeriformes) म्हणजे झाडावर राहणारे पक्षी, आणि हेच पक्षी आपल्या जास्त परिचयाचे असण्याचा संभव असतो. पाण्याजवळ आपले जीवन व्यतीत करणारे बगळ्यासारखे पक्षी बक गणात (Order Ciconiiformes) अंतर्भूत होतात तर बदके, हंस ह्यांसारख्या पाण्यात राहणाऱ्या पक्ष्यांचा वर्ग म्हणजे हंस गण (Order Anseriformes)

चक्राताचे संस्मरणीय अनुभव- भाग १

Submitted by वावे on 5 November, 2019 - 06:14
female portrait

गेली दोन वर्षे मी आजूबाजूचे पक्षी उत्सुकतेने बघायला लागले आहे. पक्ष्यांचे फोटो काढायलाही मला आवडतात. पण एक रंगनथिट्टू सोडलं तर खास पक्षीनिरीक्षणासाठी असं कुठे लांबवर जायला जमलं नव्हतं. मायबोलीवर साक्षीने लिहिलेलं चक्राताचं प्रवासवर्णन मला खूप आवडलं होतं. तोपर्यंत मी चक्राता हे नावही ऐकलं नव्हतं. पण साक्षीचे लेख वाचून चक्राताला जावंसं तीव्रतेने वाटायला लागलं. त्यामुळे किकांच्या ऑक्टोबरमधल्या चक्राता कॅम्पबद्दल समजताच, काहीतरी करून हे जमवूयाच असं ठरवलं. माझ्या एका आतेबहिणीचंही माझ्याबरोबर यायचं ठरलं.

थरार - पेंच व्याघ्र अभयारण्य

Submitted by आशुतोष०७११ on 4 November, 2019 - 01:03

गेले वर्षभर पेंच अभयारण्यातल्या वाघांचे फोटो सोशल मिडियावर रोज कोण ना कोण पोस्ट करतच होते. ते बघून मे महिन्यात पेंच वारी करायचीच हा निश्चय झाला होता. फेब्रुवारीमध्येच सफारी आणि हॉटेल बुकिंग करुन ठेवलं. लगेचच मुंबई-नागपूर-मुंबई प्रवासाचंही बुकिंग केलं.

मालवण-तारकर्ली

Submitted by पॅपिलॉन on 9 October, 2019 - 05:45

अलीकडेच कोकणात मालवण तारकर्ली परिसरात फिरून आलो, कोकण म्हणजे भारावून टाकणारा
आणि खोलवर आठवणी देणारा अनुभव आहे. त्यातले हे काही आठवणीचे तुकडे

71918127_10206508422665939_3380768302862172160_n.jpg
~ प्रवास ~

प्रांत/गाव: 

अशी पाखरे येती.....३ (हुर्डा पार्टी)

Submitted by हरिहर. on 24 September, 2019 - 15:00

पक्षी निरिक्षणाचे वेड एकदा लागले की मग काही खरे नसते हे या काही दिवसात अगदी पटले. नेमकी हा छंद जडायला आणि कामांची धांदल उडायला एकच वेळ झाली. स्वतःचा व्यवसाय असल्याने जेंव्हा वाटेल तेंव्हा या छंदासाठी वेळ काढता येत असला तरी दिवस कामाचे असल्याने ते शक्य नव्हते, आणि रोज एकतरी पक्षी दिसल्याशिवाय चैनही पडत नव्हती. अशातच एक शोध लागला की सकाळी चालायला जाताना जर देवराईतील शेताजवळ निवांत बसलो तर सकाळच्या कोवळ्या उन्हात अगदी शेजारी शेजारी बसुन वेगवेगळे पक्षी निवांत नाष्टा करताना दिसतात. अर्थात मग दुसऱ्या दिवसापासुन चालण्याला सुट्टी दिली आणि देवराई जवळ केली.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण