माणसाला जेंव्हा चाकाचा आणि शेतीचाही शोध लागला नव्हता तेव्हाच त्याने कलेचा शोध लावला होता. जेथे माणूस आहे तेथे कला आहेच. खरंतर 'कला' हे माणसाच्या 'असण्याचे' लक्षण आहे असं म्हटलं तर वावगे ठरु नये. माणूस जसजसा प्रगत होत गेला, त्याची कलाही प्रगत होत गेली. कित्येक नवनविन गोष्टी आल्या, आणि गेल्या देखील. पण कला आणि माणूस यांच्यातले नाते मात्र काळागणीक वाढत गेले, दृढ होत गेले. हळू हळू माणूस पोटामागे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात विखुरला गेला. कालांतराने त्याच्या रंगरुपात फरक पडला. जगण्याच्या शैलीत परिसरानुसार बदल होत गेला. माणसांच्या कळपाचे रुपांतर समाजात झाले.
मायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू आणि पहिला विषय आहे - क्षितिज नवे - प्रेक्षणीय स्थळांची प्रकाशचित्रे.
आयुर्विन पूल, सांगली
आपल्यातल्या बर्याचजनांना वेगवेगळ्या ठिकाणी भेट द्यायला आवडते. शहरं, देश बदलतील तस तश्या संस्कृती बदलतात. खाण्याचे पदार्थ, वेशभूषा, भाषा अश्या बऱ्याच वेगवेगळ्या संस्कृतीचं दर्शन होते. अश्याच तुम्ही पाहिलेल्या सुंदर प्रेक्षणीय स्थळाची प्रकाशचित्र सगळ्यांसाठीच उपलब्ध करुन देऊया.
आमचा सगळा पट्टा तसा सधन. पावसावर होणारी शेती अगदीच नावाला किंवा मग गरजेपुरती. म्हणजे बाजरी, ज्वारी यासाठी. आमच्या वरच्या भागात मात्र पावसाचे प्रमाण जास्त. त्यामुळे तेथे मात्र भातशेतीच प्रमुख. हा भाग म्हणजे माळशेज घाटाचा परिसर. साधारण घाटाच्या अलीकडील, म्हणजे कोळेवाडी, मढ, करंजाळे वगैरे. पिंपळगाव जोगा धरणाच्या बॅकवॉटरच्या कुशीत वसलेली गावे. भात खावा तर याच भागातला. आजी सांगायची “भाताच्या पेजेत वात वळून लावली तर दिवा पेटायचा आणि भात शिजलेला साऱ्या गावाला कळायचे असा सुवास पसरायचा.” अर्थात पिढ्या दर पिढ्या सगळ्याच गोष्टींचा दर्जा घसरत गेला.
मुलांच्या हट्टाला मान देऊन आम्ही एकदाची मनीमाऊ घरी आणली. मुलांनी तिचं नाव ठेवलं झोई आणि पत्नीनं सगुणा.
ती थोडीशी घाबरट आहे, पण गोड आहे. आमचा आवडता टाईमपास म्हणजे खिडकीत बसून बाहेर पक्षी वगैरे बघणे.
तिला मसाज करून घ्यायला फार आवडतो. अगदी ब्रह्मानंदी टाळीच लागते.
टेरेसमध्ये असलेल्या भिंतीवर टांगलेले हे टेराकोट्टाचे वॉल हँगीग पिस आहे. सहज फोटो काढला. जरा बरा वाटला. सगळ्यांबरोबर शेअर करावा वाटला. कॅमेरा आहे iPhone 7+
.
तिरुपती बालाजी दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून भाविक जातात मात्र, दर्शन व राहण्याची सोय न केल्यास ही कुठलीही सहल त्रासदायक ठरते. एकतर तेथील भाषा वेगळी त्यात आपल्याला तेथील लोक सहकार्य करत नाहीत ही एक गोष्ट. मग लोकांना विचारत अथवा ट्रव्हल एजन्सीचे भरमसाठ पॅकेज घेत आपण ट्रिप करतो.यावेळी बालाजी दर्शनासाठी दर्शन, राहण्याची व जाण्या येण्याची सोय आधीच केल्याने दर्शन छान झाले. इतरांना तिरुपती बालाजी सहल सुलभ व्हावी यासाठी हा छोटा लेख....
Just to test if 500pix embed link working here!