प्रकाशचित्रण
देवराई -४ (रानफुले)
ही रानफुले असल्याने मला यांची नावे माहित नाहीत. यातली अनेक फुले ही अगदी 3/4mm या आकाराची आहेत. जमतील तसे फोटो काढले आहेत. मी नावे शोधतो आहे. जसजशी मला नावे समजतील, मी धागा संपादीत करेन.
प्रचि १
पित्तपापड (Rostellularia crinita)
प्रचि २
Justicia diffusa
अशी पाखरे येती...१
काही गावाकडील तर काही देवराईत दिसलेल्या पक्ष्यांचे फोटो येथे देत आहे. खरे तर फोटो खुप आहेत पण येथे सगळेच देता येत नाहीत आणि निवडक द्यायचे तर त्यासाठी फोटो निवडत बसावे लागेल. ते काही जमणारे काम नाही. त्यामुळे हाताशी येतील ते फोटो देतो आहे. तुम्हाला नक्की आवडतील.
पाबे घाट
खानापूर पासून आत जाणारा रस्ता
रस्त्यातील भात शेती
रम्य परिसर
रम्य परिसर
रम्य परिसर
देवराई - ३
विहंगम देवराई - २
विहंगम देवराई - १
अंधश्रध्दा ही केंव्हाही वाईटच. या बद्दल कुणाचेच दुमत नाही. पण गेले काही वर्ष मी एका अंधश्रध्देची गोड फळे चाखतो आहे. मीच काय आमची सगळी सोसायटी या अंधश्रध्देमुळे खुष आहे.
भुताळी दवाखाना
कोकणातलं साधारण एक दोनशे अडीचशे उंबरठा असलेलं आमचं गाव. बालपण कोकणातच गेलं. त्याकाळी टीव्ही होते पण केबलचा म्हणावा तेव्हडा सुळसुळाट झाला न्हवता. रात्री सगळ्यांची जेवणं आटपली कि आजूबाजूचे सगळे ओटीवर जमायचे आणि गप्पांचा फड रंगायचा. राजकारण, क्रिकेट, गावातल्या घडामोडी आणि लाईट गेलेली असली कि भुतांच्या गोष्टी सांगितल्या जायच्या, भुतांच्या गोष्टी निघाल्या कि दवाखान्याचा हमखास उल्लेख व्हायचा. आडवळणावर असलेला तो दवाखाना तीस चाळीस वर्षे तसाच भकास पडून आहे. हा दवाखाना बांधण्याच्या अगोदर ही जागा गुरांसाठी चारण्याचं माळरान होतं.
बाजार-हाट
काल अचानक बयोचा फोन आला “काका, मी बस स्टॉपवर आहे, न्यायला ये” आणि मला आनंदाचा धक्का बसला. तिचे हे नेहमीचेच आहे. कधी अगोदर फोन करुन येणार नाही. ही बयो म्हणजे माझ्या थोरल्या भावाची मुलगी. तिला या नावाने फक्त मी आणि बाबा हाक मारतो. माझ्या आज्जीला आम्ही सगळे बयो म्हणायचो. आज्जीचं दिसनं, सवयी, काही आवडी आणि चक्क काही लकबी सुध्दा हिच्यात आहेत. त्यामुळे मी तिला बयो नावानेच हाक मारतो. या नावाने हाक मारण्यामागे कुठेतरी आज्जीची हळवी आठवणही असतेच. या नावाने तिला हाक मारली की भावाच्या, वहिनीच्या कपाळावर आठ्या पडतात पण मला आणि बयोलाही हे नाव आवडत असल्याने आम्ही कुणाचा फारसा विचार करत नाही.