काही गावाकडील तर काही देवराईत दिसलेल्या पक्ष्यांचे फोटो येथे देत आहे. खरे तर फोटो खुप आहेत पण येथे सगळेच देता येत नाहीत आणि निवडक द्यायचे तर त्यासाठी फोटो निवडत बसावे लागेल. ते काही जमणारे काम नाही. त्यामुळे हाताशी येतील ते फोटो देतो आहे. तुम्हाला नक्की आवडतील.
पक्ष्यांचे व फुलांचे वेड पुर्वीपासुनच होते पण फोटो काढायला मात्र अगदी नुकतीच सुरवात केली आहे. या फुलांच्या आणि पक्ष्यांच्या अनेक गमतीदार आठवणी आहेत. आजही आठवल्या की ते अगदी जुने दिवस आठवतात. शेताच्या बांधावरुन धावत धावत पकडलेली फुलपाखरे आठवतात. विकत घेवून पुन्हा शेतात सोडलेली पोपटाची पिल्ले आठवतात. पोपटाच्या ढोलीत हात घालून पोपटाने फोडलेली बोटे आणि घरी आल्यावर बाबांनी फोडलेली पाठ आठवते. हे सगळे छंद जोपासण्यामागे निसर्गप्रेम होते अशातला भाग नाही. निसर्गप्रेम होतेच, ते वेगळे करावे लागत नसे त्या काळी, पण महत्वाचे म्हणजे विरंगुळ्याचे साधन नसे. खेळणी नसत हे खरे कारण होते. सशांची, खेकड्यांची बिळे शोधणे, पोपटांच्या ढोली शोधणे, पिंगळे व घुबडे कोणत्या झाडावर बसतात ते शोधणे, सुगरणींची धावपळ निरखने, त्यांची पिल्ले कधी उडून जातात हे पाहून मग ते खोपे घरात आणून लावणे यात सुट्टीचे दिवसचे दिवस जात असत. आजोबांना मध आणि आईला डिंक कधी विकत आणावा लागत नसे. आम्हालाही विरंगूळ्याला वेळ पुरत नसे. या सगळ्या उपद्व्यापात आम्ही पाच सहा मित्र नेहमी आघाडीवर असायचो. शेणाने घरं सारवायचा काळ होता तो. त्यासाठी शेण आणायला गेलो की घरी परतायला संध्याकाळ होई. कारण शेणकिड्यांच्या मागे त्यांचे ते शेणाचा चेंडू ढकलणे पहात आम्ही गुडघ्यावर रांगत रांगत कित्येक दुरपर्यंत जायचो. गुडघ्यांना जखमा व्हायच्या. तेथूनच मग एखादी मुंग्यांची रांग आम्हाला भलतीकडेच घेवून जायची. या सगळ्यात उद्योगात शेण न्यायची आठवण फार उशीरा यायची पर्यायाने घरी यायला दिवेलागण व्हायची. तर असो. फोटोंचा धागा असल्याने जास्त लिहित नाही.
… … एक आठवण मात्र आजही गालावर हसु फुलवून जाते. आम्ही कॉलेजला असताना दिवाळीच्या सुट्टीला घरी यायचो. मित्रांसोबत कसा वेळ घालवायचा हे ठरलेले असे. त्यातच आमच्या मळ्यात जावून पक्षी आणि फुलपाखरे पहाणे हा कार्यक्रम असे. पक्षी फक्त पहायचे, त्यांची नावे कळतीलच असे नसे. त्यांच्या कॅटेगरीजही ठरलेल्या असत. अर्थात त्या पक्ष्यांच्या वागण्या उडण्यावरुन नसत तर कोणता पक्षी किती सुंदर दिसे त्यावर अवलंबून असत. छान, मस्त आणि भार्री. अशी सरळ वर्गवारी असे. त्यातही एखादा पक्षी अगदी क्वचित दिसणारा व सुंदर असे त्याला ‘सेक्सी’ ही कॅटेगरी असे. सेक्सी म्हणजे खुप सुंदर हा शब्द अगदी तोंडात बसला होता. कॉलेजला होतो ना आम्ही त्यामुळे. एक दिवस शेताच्या शेजारील कॅनॉलवर बसुन आम्ही वेळ घालवत होतो. समोरुन मराठी शाळेत नुकत्याच रुजू झालेल्या बाई आल्या. तरुणच होत्या. त्या समोरुन यायला आणि आमच्या एका मित्राला तारवाली भिंगरी दिसायला एकच गाठ पडली. त्या भिंगरीचे रंग पाहून मित्र अगदी आनंदाने जोरात ओरडला “अरे पाखरु पहा हे. आगा गा! सेक्सला अगदी पारावार नाही” त्याचे ओरडणे ऐकूण भिंगरी उडालीच पण त्या बाईंनी आमच्याकडे इतक्या जळजळीत आणि तुच्छ नजरेने पाहीले की सीतामाईला वाटले तसे धरणी दुभंगली तर बरे असे आम्हाला वाटले. आता परवा यात्रेसाठी गावी गेलो होतो तेंव्हा ही तारवाली भिंगरी दिसली आणि हे सगळे आठवले. त्या भिंगरीच्या फोटोपासुनच सुरवात करुयात.
तारवाली भिंगरी (Wire-tailed swallow)
प्रचि १
प्रचि २
भरारीची तयारी. ही भिंगरी अगदी नावाप्रमाणेच चंचल आहे. क्वचित बसते. उडताना ही इतकी रंगीत व सुंदर असेल हे लक्षात येत नाही.
माळ भिंगरी. (Red rumped Swallow)
ही पण भिंगरीची प्रजाती आहे.
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
ठिपकेवाली मनोली (Spotted Munia or Scaly brested munia)
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
राखी वटवट्या (Ashy prinia)
प्रचि ९
प्रचि १०
कोकीळा. (Asian koel. Female)
ही देखील गाते पण आवाज तार सप्तकात असतो. नर मात्र खर्जातुन सुरवात करुन हळूहळू तारसप्तकात ओरडायला सुरवात करतो. (हे माझे निरिक्षण आहे. वस्तुस्थिति वेगळीही असेल)
प्रचि ११
प्रचि १२
सुर्यपक्षी. (Purple rumped sunbird)
याचे नक्की रंग मला सांगता येणार नाही. कदाचीत हे रंग विणीच्या काळात बदलत असावेत. मी वेगवेगळ्या रंगाचे पक्षी पाहिले या महिन्यात. हे फोटो देवराईतले आहेत.
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
कोतवाल (Black drongo)
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
प्रचि १९
ब्राम्हणी मैना. (Brahmini starling)
आम्ही भांगपाडी मैना म्हणतो. खरे तर भांग पाड गं मैना असं म्हणायला हवे. कारण हिच्या डोक्यावरचे केस कायम विस्कटलेले असतात.
प्रचि २०
नकल्या खाटीक (Long tailed shrike)
अगोदर मला ही गांधारी वाटली. खाटीकचीच प्रजाती आहे ती. पण तिची पाठ जरा वेगळी आणि गडद रंगाची असते. या खाटीकला देखील गांधारीसारखी पट्टी आहेच डोळ्यावर.
प्रचि २१
श्री व सौ गप्पीदास (Pied bush chat)
याचे नर आणि मादी वेगळे असतात कोकीळसारखे. त्यामुळे ओळखण्यात अनेकदा गडबड होते. नर देखील पांढऱ्या ठिपक्यामुळे दयाळसारखा दिसतो.
गप्पीदास (मादी)
प्रचि २२
गप्पीदास (नर)
प्रचि २३
साळूंकीचा जरा वेगळा मुड. (Common Myna)
प्रचि २४
यांना विसरुन कसे चालेल! यांच्या नावाने मी लहानपणी दुध-भाताचे मऊ घास खाल्ले आहेत.
चिमणी (House sparrow)
प्रचि २५
कावळा (Crow)
प्रचि २६
लाल मुनीया (Strawberry finch)
निव्वळ अप्रतिम दिसतो हा पक्षी. पण ही अगदीच लहान असल्याने दुर्बिण तरी हवीच. नुसत्या डोळ्यांनी ही स्ट्रॉबेरी फिंच आहे एवढेच कळते. पण तिचा बांधणी स्टाईलचा रंग, डिझाईन हे बारकाव्याने नाही समजत.
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
प्रचि ३०
गायबगळा (आणि त्याची गाय देखील ) (Cattle heron)
प्रचि ३१
कापशी घार (Black winged kite)
प्रचि ३२
दुसरा भाग येथे पहाता येईल...
अशी पाखरे येती - २
सीतामाईला वाटले तसे धरणी
सीतामाईला वाटले तसे धरणी दुभंगली तर बरे असे आम्हाला वाटले.

- फोटो छान आहेत.
- पण त्यापेक्षा भिंगरी ची आठवण भाव खाऊन गेली.
- त्या बाईंनी तुम्हा सगळ्यांना ' धू धू धूतला' नाही का?
मस्त .
मस्त .
मस्तच सगळे फोटो
मस्तच सगळे फोटो
दुसरा अनुभव लय भारी
भिंगरीचा अनुभव लय भारी

एका पेक्षा एक सुंदर प्रचि!
मस्त फोटो. दुसरा तर खासच!
मस्त फोटो. दुसरा तर खासच!
कंचा कॅमेरा न कंच लेन्स म्हनायचं?
शालीदा
शालीदा
सगळेच फोटो भार्री आणि भिंगरीचा सेक्सी
फोटो आणी पक्षी जबरी आहेत.
सेक्सी
सेक्सी
लाल मुनियाला आम्ही 'लाल्या' नाव दिलेले
झकास आठवणी आणि झकास फोटो
झकास आठवणी आणि झकास फोटो
छान फोटो.
छान फोटो.
भिंगरी आणि लाल मुनियाचे रंग जबरदस्त आहेत!
भारी! मस्त फोटो.
भारी! मस्त फोटो.
सगळे फोटो सुंदर. लाल मुनिया
सगळे फोटो सुंदर. लाल मुनिया विशेष आवडली.
सुंदर आहेत पाखरे
सुंदर आहेत पाखरे
सगळ्यांचे खुप धन्यवाद! __/\__
सगळ्यांचे खुप धन्यवाद!
__/\__
खूप सुंदर, भिंगरी तर अप्रतिम!
खूप सुंदर, भिंगरी तर अप्रतिम!
फार सुंदर फोटो.
फार सुंदर फोटो.
सगळे फोटो सुंदर. लाल मुनिया
सगळे फोटो सुंदर. लाल मुनिया विशेष आवडली. >>> अगदी अगदी.
खुप छान आलेत सर्वच फोटो !!
खुप छान आलेत सर्वच फोटो !!
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर...
अतिशय सुंदर...
लाल मुनिया... अप्रतिम
गाणं आठवल...
चलत मुसाफ़िर मोह लियो रे
पिंजड़े वाली मुनिया
धन्यवाद दाद!
धन्यवाद दादा!
गाण्याच्या ओळीवरुन हा फोटो आठवला.
पिंजडे वाली मुनीया.

पिंजडेवाली ऐवजी
पिंजडेवाली आणि मुसाफिर ऐवजी

चलत शाली मोह लियो रे
देवराई वाली मुनिया.
देवराई चा हिंदी शब्द माहीत नाही.
पिंज-यातली सुध्दा छान आलीय...
वेगवेगळ्या लकबीतले फोटो घेता
वेगवेगळ्या लकबीतले फोटो घेता हे फार आवडले.
नांदुर माध्यमेश्वर ( सिन्नर पासून वीस किमी वेगळा फाटा, शीरडीचा नाही.) येथेही ट्रिप मारा.
कावळा, चिमणी, सालुन्की,
कावळा, चिमणी, सालुन्की, सनबर्ड आणि कोकिळा सोडली तर बाकीचे पक्षी प्रथम पाहतेय. मस्त फोटोज!! डिंक विकत घ्यायला लागला नाही म्हणजे काय??? तो कसा गोळा करतात जंगलात? आणि हो, ह्या लहानपणच्या आठवणीही लिहा की एकदा.
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो!
नेहमीप्रमाणेच सुंदर फोटो! तुमची देवराई छान आहे..
Sunbird ani Red Avadavat (Red
Sunbird ani Red Avadavat (Red Munia) che photo masta.
>>पोपटाच्या ढोलीत हात घालून
>>पोपटाच्या ढोलीत हात घालून पोपटाने फोडलेली बोटे आणि घरी आल्यावर बाबांनी फोडलेली पाठ आठवते.>> हाहाहा
फोटो तसेच आधीचे मुक्तकही फारच आवडले.
ते शेणकीड्यांचे नीरीक्षण, सशांची, खेकड्यांची बिळे शोधणे, पोपटांच्या ढोली शोधणे, पिंगळे व घुबडे कोणत्या झाडावर बसतात ते शोधणे, सुगरणींची धावपळ निरखणे, त्यांची पिल्ले कधी उडून जातात हे पाहून मग ते खोपे घरात आणून लावणे ................................... निसर्गसमृद्ध अशा परिसरात आपले बालपण गेलेले दिसते.
.
मी देखील झाडोरे घेउन मागे धावत, पिवळी फुलपाखरे पकडलेली आहेत. पक्ष्यांची पिल्ले तर इतकी पाडलेली आहेत. कावळ्यांना रोजच्या रोज पोळी खायला घालणे, पावसाळ्यात साचलेल्या डबक्यांत बेडूकमासे निरखणे हे प्रकार कँटॉन्मेंट भागात केलेले आहेत. आमच्या सोसायटीसमोरच्या उंच टेकडीवरती मेंढपाळ, मेंढ्या चरायला आणत असत. पावसाळ्यात न्हालेला निसर्ग काय वर्णावा. सुगंधाची आणि सौंदर्याची लयलूट.
धन्यवाद सामो!
धन्यवाद सामो!
बालपण रम्य असते तसेच ते क्रुरही असते असं म्हणायला हवे. कारण आज एखादे पक्ष्याचे घरटे दिसले तर उगाच त्याच्या जवळ मी जात नाही, पिल्लांचे फोटो शक्य तितक्या दुरुन काढतो वगैरे पण लहानपणी घरटी शोधून पोपटाची पिल्ले त्यांच्या घरट्यातून काढून आणायचो आणि त्याचे वाईटही वाटायचे नाही. फुलपाखरे तर प्रत्येक प्रजातीची एक पकडून त्यांना पिनने टोचून त्यांचा संग्रह करायचो. असो. पण खुप आनंदाचे दिवस होते ते हे नक्की.
माफ करा. वर प्रचि: ३ मधे Barn
माफ करा. वर प्रचि: ३ मधे Barn Swallow नसुन ती Red-rumped Swallow आहे.