"आशा नाम मनुष्याणाम काचिद् आश्चर्य शृंखला,
यया बद्धा प्रधावन्ति मुक्तास्तीष्ठाती पंगुवत"
एखाद स्वप्नं बघणं, त्या स्वप्नासाठी झुरण, तळमळण, आणि ते स्वप्नं कधी ना कधी पूर्ण होईल या एका आशेवर वेड्या सारख त्या गोष्टीच्या मागे लागण, त्या साठी धडपडण, आणि शेवटी त्या गोष्टीला यश मिळण, अत्यंत सुखदायक असतं. लहानपणापासून आयुष्याच्या या प्रवासात कोणती ना कोणती गोष्ट असामान्य घडत गेली किंवा घडवली गेली. आणि या सगळ्यातूनच आपल्यातल असामान्य व्यक्तिमत्त्व विकसित होत असतं अस मला वाटतं.
माझे वडील नेहमी म्हणायचे, माणसाने चालत रहाव, हळू किंवा जोरात हे महत्वाच किंवा गरजेचं नाही तर फक्त चालत राहणे महत्वाच आहे, फक्त कधी थांबू नये...एखाद्या गोष्टीची किंमत ती गोष्ट आपल्याकडे नसल्यावर कळते, आणि अशा अनेक किमती मला खूप जवळून कळल्या आहेत. पण या सगळ्या पलीकडे काहीवेळा असे प्रसंग येतात जिथे सर्व शून्य वाटतं, राख वाटते... पण या राखेतून वर येण्याला महत्व आहे.
दिवाळी संपत आली, डोक्यामध्ये प्रश्न फिरू लागले...सुट्टी संपत आली आहे, काही तरी करायला हवं, कुठे तरी जायला हवं, दिवाळीच्या प्रेशर मधून आता थोडीशी मोकळीक हवी होती. आणि तसा योग जुळून आलाच, भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशीच. मित्रांचा फोन आला, "उद्या जायचय आपल्याला..." मी म्हणालो कुठे? "लोणावळा" समोरून प्रतिसाद आला. मन प्रचंड उत्साहात उसळी मारत होतं. पण वेळ खूप कमी होता, आणि तसे एक दोन प्रोजेक्ट हातात होते, सो विचार केला बघू...रात्री ३.३० वाजे पर्यंत काम आटोपून झोपलो "उठलो तर उठलो, नाही तर नाही" तयारी हि नव्हती झाली. रात्री तसं थोडंफार ठरवून ठेवल होतं त्या प्रमाणे मित्र सकाळी सकाळी घरी उठवायला आला. वेळ तसा फारच कमी होता, पटापट आवरून बॅग भरली आणि तयारी करून निघालो. तसं काय, आणि कस करणार याचं हि नियोजन नव्हतं, शिवाय डेडलाईनच टेन्शन होतच. पण थोडासा चेंज म्हणून मनातून खुश होतो, आणि स्वतःसाठी थोडासा का होईना वेळ देता येईल, शिवाय कॅमेरा होताच जोडीला. ठरल्याप्रमाणे म्हणजे तसा थोडा उशिरानेच पोहोचलो, त्यात गाडी यायला अजून अवकाश होता, मग सोशिअल मिडिया वर अपडेट्स द्यायच्या चढा ओढी सुरु झाल्या, सेल्फिज, फोटोज काढण्यात सगळे गुंग झाले आणि इतक्यात गाडी आली....उशिरा का होईना आमचा प्रवास सुरु झाला. सकाळचा प्रवास पूर्ण करून आम्ही इच्छित स्थळी म्हणजेच "लोणावळा" मध्ये सुखरूप पोहोचलो. आमची गाडी सगळ्यात उशिरा होती, आमच्या आधी दोन गाड्या आधीच पोहोचल्या होत्या, जवळ जवळ २०-२४ मित्र मैत्रीणींचा ताफा पिकनिक साठी जमा झाला होता, त्यात मी एक. आजूबाजूचा निसर्ग, परिसर बघून प्रवासातला सगळा क्षीण निघून गेला, उरला सुरला थकवा तर तिथला "टायगर" आणि त्याचे प्रताप बघूनच निघून गेला. आडदांड, मदमस्त लाब्रेडोर जातीचं ते बेन कधीच विसरता येणार नाही. बॅगा आपटून पहिला मोर्चा वळवला तो तिथल्या झोपाळ्यावर, मस्त अंग विसावून उंचच उंच झोक्याची मज्जा घेत होतो. प्रत्येकजण आपापल्या मजा लुटायच्या कार्यक्रमात व्यस्त होते, त्या नंतर जेवणाची वेळ झाली. लहान मुलांप्रमाणे गुपचूप फ्रेश होऊन आम्ही जेवणावर ताव मारायला बसलो. झणझणीत मिसळ पोटात सरकवल्यावर आता झोप आली होती, पण नंतर आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी निघालो. मस्त अर्धा पाऊन तास फिरलो, थोडेसे फोटोज काढून झाल्यावर आम्ही पुन्हा घरी आलो. थोडासा वेळ इथे तिथे घालवून संध्याकाळचा सूर्यास्त बघण्यास आम्ही सर्वजण निघालो, तिथे फिरल्यानंतर, प्रत्येक जण आठवणी मनात आणि मी कॅमेऱ्यात टिपत परतीच्या वाटेला लागलो. तिथून आल्यानंतर पुन्हा फ्रेश होऊन संध्याकाळचा नाश्ता आणि गच्चीवर मित्रांची मैफिल झाल्यानंतर, मनाच्या आढ्यातिढ्यावर फुंकर मारणारं एक प्रेमळ अध्यात्मिक सेशन झालं, अर्थात आता गरज होती एका शांत सोबतीची, पण या आग्यावेताळाच्या टोळी मध्ये ती मिळणं जरा मुश्कील होतं. प्रोजेक्ट्स च काम मी सोबत घेतलं होत ते करत बसलो, ते केल्यावर मस्त गरमागरम जेवणावर चोपून ताव मारला. जागा जाऊ नये म्हणून मी आणि माझा मित्र आधीच झोपाळ्यावर जाऊन बसलो. नुकतेच जेवल्यामुळे माहौल तसा त्यातल्या त्यात शांत होता, पण तरीही मज्जा मस्ती चालूच होती. रात्र हळू हळू वाढत होती. झोपाळ्यावर त्या थंडगार वाऱ्याची झुलवी स्पंदने, चेहऱ्यावर झेलत मी झोके घेत होतो. झोक्याचा जोर आणि वाऱ्याचा फेर हळू हळू वाढत चालला होता, त्यांना साथ म्हणून मी हि डोळे बंद करून माझी मान आकाशाच्या दिशेने वळवली आणि डोळे उघडून काळ्याभोर विदीर्ण नितांत पसरलेल्या त्या आकाशाकडे बघू लागलो. त्या मध्ये लुकलुकणाऱ्या ताऱ्यांना बराचवेळ न्याहाळत बरेचशे विचार मनात येऊन गेले, कुठल्यातरी गाण्याच्या आवाजाने तंद्रीतून बाहेर आलो, समोर पूर्ण जल्लोषात खरी पिकनिक चालली होती. काही मोजकी सोडली (मी हि त्या मोजक्यांमधलाच) तर सर्व जण नाचायच्या प्रवाहात धुंद होते.
या सर्वांमध्ये एक विचार मनात रुतून गेला...ताऱ्यांचा. चार वर्षांपूर्वी बघितलेलं स्वप्नं, तेव्हा केलेला निश्चय...का नाही, आता तर कॅमेरा देखील होता. मी तडक उठलो आणि कॅमेरा घेऊन बाहेर अंगणात आलो.
विचार तर आला होता त्या नुसार सज्ज हि झालो पण त्याला तडीस कस नेणार हा भला मोठा प्रश्न पडला होता, डोंगराळ भाग असल्यामुळे काही मोजकीच घरं आणि लाईटीचे खांब होते, ३० ते ४० फुट अंतरा नंतर आ वासून उभा असलेला गर्द काळोख... थोडावेळ त्या अंधाऱ्या दिशेने बघून आवंढा गिळत पुन्हा अंगणात आलो, आणि पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसलो. आता प्रश्न हा होता कि, करायचंच झालं तर कसं? त्या साठी आवश्यक साधने लागणार होती? आणि आता ती कशी उभी करायची? लॉंग एक्स्पोजर चे क्लिक या आधी जेमतेम ४ वर्षापूर्वी केले होते, पण आता? ते हि अडव्हांस टूल सोबत. जिज्ञासेत सरांकडून मिळालेल्या माहितीची उजळणी करत असताना माझा मित्र तिथे आला, काय झालं विचारताच मी म्हणालो, "मिल्की वे..., मिल्की वे शूट करायचाय" फोटोग्राफीची त्यातल्या त्यात आवड असल्याने तो तिथे रेंगाळला, मला हि सोबत मिळाली म्हणून मी हि सुखावलो. मिल्की वे साठी सगळ्यात अंधाऱ्या जागेत जाव लागतं,... मी म्हणालो. एकदम काळ्याभोर जागे कडे बोट दाखवत तो म्हणाला, "ते काय तिथं...". त्या दिशेने बघूनच मी थोडा हबकलो. अतिशय अंधारी जागा, त्यात रुक्ष, राकट, जोडून असलेला भयानक डोंगर आणि कानठळी बसवणारी शांतता. हळू हळू पावलं ओढत आम्ही त्या दिशेने निघालो, प्रकाश हळू हळू निसटत चालला होता, पुढे एक भिंत, भिंतीच्या पलीकडे अंधाराचं साम्राज्य आणि या बाजूला मी आणि मित्र. डोळे भेदणाऱ्या त्या अंधारात काहीच दिसत नव्हत, दोघांची अवस्था गार.,,, आता काय करायचं..? मी विचारलं. मला वाटतं परत जाऊया...मी पुढे म्हणालो. मागे वळून बघितलं इतक्यात ते "टायगर" हावऱ्या सारखं आमच्या दिशेने येताना दिसलं. त्यात पण मित्र धीर करून म्हणाला, जाऊया...आणि आम्ही पुढे निघालो आणि आमच्या पुढे टायगर. अचानक टायगर थांबला आणि त्या भिंतीकडे एकटक बघू लागला. "प्राण्यांना भूतं दिसतात...." मित्राने शंका काढली. आता मात्र परत फिरण्यावाचून पर्याय न्हवता. शिव्या घालत शक्य तितक्या लवकर आम्ही तिथून पळ काढला. चोरा सारखं आम्ही पुन्हा झोपाळ्यावर येऊन बसलो. इथे डान्स पार्टी जोरात रंगली होती. आणि आम्ही तोंड पाडून काहीच न बोलता थोडावेळ तसेच बसून राहिलो. "आता काय...?" एक काम करू ते बघ तिथे थोडासा अंधार दिसतोय...मी म्हणालो. आणि आम्ही लगेच परसदारी गेलो. तिथे बऱ्यापैकी अंधार होता, आणि आजूबाजूला वर्दळ हि होतीच त्यामुळे जवळ जवळ १५-२० मिनिटे आम्ही तिथे अंधारात घालवली. आवश्यक सेटिंग वापरून ६ संभाव्यता लक्षात ठेऊन, वेगवेगळ्या सेटिंग चे ६ अंधाधुंद शटर फायर केले. यात एक अडचण होती फोकस ची. आता नक्की काय झालंय ते पोस्ट प्रोसेसिंग च्या दरम्यान कळेल. पण मन साशंक होतं या साठी कि, या अंधाधुंद ६ फायर मध्ये एक महत्वाचा भाग अफेक्ट करणार होता तो म्हणजे लाईट पॉल्युशन, त्या नंतर स्टेबलाइझेशन, आणि फोकस. उर्वरित भाग आम्ही पोस्ट प्रोसेसिंग वर सोडून दिला आणि कॅमेरा ठेऊन बसलो. पण चळवळ अजून तशीच चालू होती. त्या वर आम्ही रिसर्च चालू केली, वातावरण, क्लाउड पॉल्युशन, लुनार फेज, डार्केस्ट एरिया...शटर, ISO, W/B, फोर्मेट, वैगेरे वैगेरे माहिती गोळा करत, एक एक जुळणी बांधत एका टेबल वर उजळणी करत बसलो होतो. परंतु या मध्ये काही त्रुटी होत्या. आमच्या कडे ट्राईपौड न्हवता, स्टेबलाइझेशन साठी रिमोट शटर न्हवता, शिवाय त्या दिवशी अमावस्या न्हवती, अमावास्येला अजून ब्राईट फोटोज येतात. सगळं व्यवस्थित प्रीप्लानिंग करत बसलो. शूट ची जागा आणि वेळ ठरली. रात्री ३ वाजता, गच्चीवर. आता वेध होते त्या ६ किल्क्स चे, त्या साठी आधी हीस्टोग्राम चेक करणं गरजेचं होतं, आता आम्ही बाकीचे सगळे झोपण्याची वाट बघत बसलो. रात्रीचे जवळ जवळ १२.३० वाजले. आता फक्कड चहा ची तल्लफ झाली. एव्हाना सगळे दमून बाहेर गवतात बसले होते. आम्ही हि त्यांना जॉईन झालो. ३ ची वाट बघत...
१.३०-२.०० वाजे पर्यंत बाहेर गप्पा मारून आम्ही आत झोपायला गेलो. आता वेळ होती हीस्टोग्राम चेक करण्याची. बोटं पकडून हीस्टोग्राम चेक केला फक्त ०.०१% चा फरक होता. आता पोस्ट प्रोसेसिंग.... अनसक्सेसफुल...खूप मोठा हिरमोड इथे झाला...ताऱ्यांना बघण सोपं आहे त्या पेक्षा कैक पटीने त्यांना कॅमेऱ्यात कैद करणं कठीण. फर्स्ट अटेमप्ट फेल गेला...पण अजून ३ वाजायचे बाकी होते. हळू हळू एक एक झोपत होतं.३.१५ ला आम्ही संध्याकाळची शिल्लक भेळ घेऊन ठरल्याप्रमाणे गच्चीवर गेलो. इथे तर या आधी पेक्षा जास्त बिकट परिस्थिती.... अंधार भूडूक...पण या वेळेला मित्र संख्या १ ची ४ होती. वेगवेगळ्या दिशेने पुन्हा ६ शटर फायर केले आणि या वेळेला मघाशीपेक्षा जास्त यश मिळालं...या वेळेला हवा तसा फोटो आला होता, तारे हि दिसत होते, पण सगळे अनफोकस, ब्लर, वरती पत्रा असल्याने बऱ्याच अडचणी आल्या. अर्धा पाऊन तास घालवल्यावर आम्ही खाली निघून आलो. विचार केला बाहेर जाऊन पुन्हा एकदा क्लिक करू पण झोपेने प्राण सोडले आणि आम्ही तिथेच झोपी गेलो, ब्लर का होईना पन त्या पठडीतला फोटो आला याचं समाधान होतंच... पण त्या पेक्षा जास्त खंत या गोष्टीची होती कि दोन्ही अटेमप्ट फेल....मनाला रुख रुख लागून राहिली. शेवटची संधी होती. कारण दुसऱ्यादिवशी लवकर निघायचं होतं. पण नशिबाने मला अजून एक संधी दिली...दुसऱ्यादिवशी फिरून आम्ही संध्याकाळी आलो, जेवून निघायचं असल्यामुळे बराच वेळ होता. तसं कोणालाच लवकर घरी जायचं नव्हतं. फ्रेश होऊन आम्ही जेवलो आणि पटकन आवरून वरती गेलो. या वेळेला मित्र संख्या होती ८... या वेळेला काही हि करून हि संधी सोडायची न्हवती. रात्री ८.३० च्या दरम्यान पुन्हा दोन वेगवेगळ्या जागेवरून २० शटर फायर केले...आणि कॅमेरा बंद करून गाडीत बसलो.
मनात बऱ्याच शंका-कुशंका, बरेच विचार...आता वेध होते ते पोस्ट प्रोसेसिंग चे...बस बाकी काही नको. घरी दुसऱ्यादिवशी अक्षरशः बोटे दुमडुन प्रोसेसिंग ला बसलो. जवळ जवळ २ वेगळ्या वेळी. ४ अयशस्वी प्रयत्न. ३०-३२ क्लिक्स मधून...फक्त आणि फक्त १ फोटो त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आला (पण तो हि थोडासा ब्लर). हेव्ही कलर टोनिंग केल्या नंतर मला माझा पहिला तोडका मोडका का होईना पण इच्छित मिल्की वे शॉट मिळाला...डोळे पाण्याने डबडबले थोडेसे... अत्यानंदित होऊन मी वेड्यासारखा त्या फोटो कडे एकटक बघत राहिलो....
सर्व प्रथम मी त्या व्यक्तींचे आभार मानेन, ज्यांच्या मुळे हा योग जुळून आला. त्या नंतर त्या वाक्तीच ज्याने माझ्यावर विश्वास ठेऊन त्याची किमती वस्तू माझ्या हाती सोपवली. आणि मना पासून आभार त्या व्यक्तीचे ज्याने हा विचार, संकल्पना पूर्णत्वास नेण्यात शेवट पर्यंत साथ दिली, आभार त्या प्रत्येकाचे. आणि आभार त्या सर्वांचे जे या वेळी माझ्यासोबत होते. कदाचित या मध्ये इतकं फारसं इंटरेस्टिंग तुमच्यासाठी काही नसेल, पण माझ्या या आनंदात सहभागी झालात या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. माझ्या साठी हि सर्वात मोठी व्हिक्टरी आहे. आणि हि तर खरी सुरुवात आहे...there is more good stuff yet to come. असंच तुमचं प्रेम दाखवा.
धन्यवाद.!
.
.
शेवटी इतकंच म्हणेन...वही घिसा पीटा..."पिक्चर तो बस अभी चालू हुई है...|"
कारण यश हा प्रवास आहे...अंतिम टप्पा नाही.........
उत्तम!! मस्त क्लिक अन एफर्ट्स
उत्तम!! मस्त क्लिक अन एफर्ट्स!!!
माझ्या टुडुमध्ये आहे हे आयटम, पण आधी लँडस्केपिंग अन वाईल्डलाईफ!!
धन्यवाद रॉनी जी...☺️
धन्यवाद रॉनी जी...☺️
यश हा प्रवास आहे...अंतिम
यश हा प्रवास आहे...अंतिम टप्पा नाही...>> हजार मोदक.
हे आवडलंय
हे आवडलंय
म्हणजे फोटो आणि फोटो मागची कहाणी देखिल
धन्यवाद फिल्मी जी , हर्पेन जी
धन्यवाद फिल्मी जी , हर्पेन जी ..... खूप खूप आभार ☺️
जमलय.
जमलय.
जरा वेळ तारीख लिहाना. बहुतेक वृषभ राशिजवळचा मिल्कीवे आहे. दिवाळी संपल्यावर.
एप्रिल मे मध्ये धनु राशीचा असतो. त्याचा इवेंट एक ग्रुप अम्बीवैलीत करतो अरेंज. पण तुम्ही स्वत: कराच.
-------
करत राहा,लिहीत राहा.