मांजरप्रेमी????
Submitted by कविता९८ on 15 November, 2019 - 11:56
मी : मम्मी मला पेट हवं
कधी घेऊया??
आई: आता नाही..
दहावी महत्त्वाची आहे.
अडीच वर्षांनंतर
मी : आई आता तर माझी बारावी पण झाली..
आता तरी एक पेट घेऊया ना ग..
आई : काही गरज नाही..
स्वतःच्या पायावर उभी रहा आणि मग घे..
अशा प्रकारे कितीवेळा तरी पेट साठी आईकडून नकारघंटा मिळाल्यानंतर माझ्या आयुष्यात ती आली..
मार्च मध्ये तिने पहिल्यांदा घरात पाऊल ठेवलं..
आणि पेट पाळण्याचं स्वप्न चांगलच पूर्ण झालं.
विषय:
शब्दखुणा: