दूर देशी..विडंबन
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे.
माननीय सलीलजी कुलकर्णी व संदीपजी खरे यांची माफी मागून, माझ्या एका अत्यंत आवडीच्या त्यांच्याच गाण्यावर माझे विडंबन सादर करत आहे.
तो तिला सोडणार नाही
तीसुद्धा काढणार नाही
तो फेसाळती बिअर आहे
बर्फ त्यात पडणार नाही
साफ करते हेच चुकते
हुळहुळते, सुधरणार नाही
लागली जहाल तहान
पिल्याबगर जमणार नाही
तो जमवतो जाणते ती,
उगा नाटकं करणार नाही
ही वेगळी आग आहे,
(पुन्हा)पिल्याबगर जमणार नाही
आज हवे तळलेले पापलेट
शेंगदाणे खाणार नाही
फुकट किती पितोस मेल्या,
आज पाजणार नाही
वासना ही सोडवेना
(तरी)आज मी काढणार नाही
फेल होने के बाद...(ब्रेकअप के बाद -विडंबन)
मूळ गण्याची लिंक https://youtu.be/oYg9qTGRPmc ड्रॉइंग मध्ये केटी घेणाऱ्या प्रत्येकासाठी
सर :- अरे तुला कळलं का ??
मी :- काय सर ??
सर :- तुला वाईट वाटेल कदाचित पण तू ड्रॉइंग मध्ये फेल झाला आहेस
मी:- पण सर तुम्ही नीट चेक केलात का म्हणजे मी काढलेले चांगले ड्रॉइंग?
सर :- हो पण प्रश्न नंबर टाकायला विसरलास हरकत नाही केटी एक्साम येईल तेव्हा अस करू नको..
मी :- ओके सर
http://www.maayboli.com/node/62618 येथून प्रेरणा घेऊन एक कोणत्याही वृत्तात न बसणारे विडंबन. आम्हांस कोणत्याही वृत्ताची 'मात्रा' लागू पडत नाही, हे वृत्त एव्हाना सर्वांना विदित होण्यास हरकत नसावी. किंबहुना अशा काहीच्या काही कवितेला ते असूही नये. मूळ लेखकाची वैयक्तिक थट्टा करण्याचा ह्यात हेतू नाही. त्यांचे वृत्तकौशल्य व (काही) गजला आम्हांसही फार आवडतात. परंतु तरीही मायबोलीच्या नियमांत हा धागा बसत नसल्यास उडवून टाकावा.
"नका होऊ नव्या आयडींमुळे बेभान स्थळांनो
पुन्हा घालूच आम्ही लाथाळी थैमान स्थळांनो
अबीर गुलाल गाण्याच्या धर्तीवर विडंबन करण्याचा प्रयत्न केला आहे.
बियर हलाल चिकनच्या संग
डिस्को मध्ये नाचण्यात तरुणाई दंग || धृ ||
पब मध्ये कैसे शिरू आम्ही कॅश हीन
उधारही कोणा मागू मंथ एन्ड चा सीन
क्रेडिट कार्ड स्वाईप करुनी घेऊया आनंद ||१||
सनबर्नी गाऊ आम्ही सनबर्नी नाचू
वारुणीच्या पुरामध्ये अंग अंग न्हाऊ
हफीम,चरस,गांजा घेऊन होऊन जाऊ धुंद ||२||
चौका- चौका मध्ये मामा उभे राहती
ड्रंक -न -ड्राईव्ह च्या केस मध्ये पावती फाडती
गुलाबो गांधी देउनी घर ला जाऊ संग ||३||
मोरुच्या मावशीची क्षमा मागून ...
(टीप : कृपया चालीतच म्हणावे )
********************
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्…
सवती मत्सर सोडून करती, धम्माsssल दंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्
तथ्याच्या नाडीवाचून, भपक्याsssचा लेंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम्
काशीबाईच्या भावनांशी, भन्साळीचा पंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम् …
धंद्याच्या झाडाला, कलेsssच्या शेंगा
टांग टिंग पिंगा गं, टांग टिंग पिंगा
टांग टिंग पिंगा गं, टुम् …
आंतरजालीय भोंडले आंतरजालावर 'मुक्त' संचार करत आहेत असे आजच समजले म्हणून वॉटरमार्क टाकून पुन्हा प्रकाशित करतेय.
हे असंच टाइमपास म्हणून लिहिलं होतं कधी तरी. आज वत्सलानं आठवण करून दिली म्हणून रंगीबेरंगीवर टाकतेय.