गारवा - विडंबन
Submitted by ओबामा on 1 March, 2018 - 20:06
बदलापूर स्टेशनवर पोहोचले. गाडी फलाटाला लागलेलीच होती. तिकिट मिळेपर्यंत सुटणार तर नाही? अशी धाकधूक करत एकदाची तिकिट घेऊन गाडीत चढले. दुपारची वेळ असल्याने गाडीला गर्दी कमी होती. कारण गाडी इथूनच निघत होती आणि महिलांचा डबा होता त्यामुळे गर्दी कमीच असणार होती. पण प्रवासाला निघाले की मला प्रत्येक गोष्टीचे दडपण येते. गाडीत चढले आणि समोरच बसलेल्या डोंबिवलीच्या परिचीत बाई दिसल्या. बाई अगदी प्रसन्न चेहेऱ्याच्या, कानातले नेहेमी वेगळे आणि ठसठशीत घातलेले, डोक्यात आंबाड्यावर फूल, गजरा काहीतरी असणारच! हसतमुख, आपण होऊन पुढे होऊन बोलणार्या!
“अरे तुम्ही कुठे इकडे बदलापूरला?”